|| विठ्ठल अभंग ||
कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने मी लिहिलेला अभंग ...
विठ्ठला रे विठुराया रे
पूजितो मी तुला
चातुर्मास समाप्त आजि
आलो दर्शनाला ||धृ ||
सावळे सुंदर रूप गोजिरे
पाहतो मी डोळा
विटेवरी उभा हात कटेवरी
तुळशीहार गळा ||१ ||
दामाजीसाठी तू महार होसी
जनाबाई चे दळण दळसी
तुकारामांच्या गाथा तू तारिसी
संत सज्जनांचे रक्षण करिसी ||२ ||
कार्तिकी एकादशी वारी येई
भक्त मंडळींना दर्शनाची घाई
पांडुरंगा तुझी अर्धांगी रखुमाई
विठुमाऊली तू जगाची आई ||३ ||