ह्रदयातुनी
धावत्या पायास माझ्या
लाभु दे आता विसावा
भाबड्या माझ्या मनाला
श्रावणाचा साज यावा
अंतरी आहेत ज्याही
वेदना जाव्या विरुनी
लाभुनी हळुवार माया
घावही यावे भरुनी
शोधतो आहे निवारा
त्या रुपेरी काळजाचा
वाटते यावा जरासा
गारवा आता सुखाचा
अंतरी वाहे झरा जो
माझिया ह्रदयामधुनी
अमृताचा गंध त्याला
ओंजळीने घे भरुनी
उगवु दे सूर्यास पुन्हा
जाळुनी अंधार सारा
संपण्या आता उन्हाळा
बरसु दे श्रावणधारा