कविता

पावसामुळे काय काय

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जे न देखे रवी...
8 Oct 2017 - 11:20 pm

पावसामुळे काय काय

तुझी झाली ओली अर्धी साडी
अन माझाही भिजला पुर्ण खांदा
एकाच छत्रीमुळे झाला वांधा

वरतून दणका जोरदार पावसाचा
साथीला गोल गोल टपोर्या गारा
भसकन शिरला त्याचवेळी छत्रीमध्ये वारा

आणीक खोल फसला माझा चिखलात पाय
धुमाकूळ घालून उलटे केले वार्याने छत्रीला
तू ही गेली दुर निघूनी हातामध्ये दांडा आला

प्रश्न:
अ) सुचनेनुसार उत्तरे लिहा.

१) पावसामुळे कुणावर परिणाम झाले? वाक्यात उत्तर लिहा.
२) पावसामुळे कसे परिणाम झाले? सचित्र उत्तर लिहा.

ब) रिकाम्या जागा भरा.

हास्यकविताविनोदमौजमजा

कधितरी...

अनन्त्_यात्री's picture
अनन्त्_यात्री in जनातलं, मनातलं
7 Oct 2017 - 4:11 pm

अमेरिकन कवी थॉमस एस. जोन्स यांची "sometimes" ही एक अल्पाक्षरी कविता.

बालपणी ध्यानी, मनी, स्वप्नी उराशी बाळगलेल्या व पुढे जगरहाटीच्या तडाख्यात नामशेष होऊन स्मरणमात्र उरलेल्या आपल्या महत्वाकांक्षांबद्दलचं हृदयस्पर्शी भाष्य म्हणजे ही कविता!

ही मूळ कविता व तिच्या भावानुवादाचा माझा प्रयत्नः

ACROSS the fields of yesterday
He sometimes comes to me,
A little lad just back from play—
The lad I used to be.

कविताआस्वादभाषांतर

चंद्राचा पाढा

बेसनलाडू's picture
बेसनलाडू in जे न देखे रवी...
5 Oct 2017 - 1:41 pm

चंद्र एके तुझा चेहरा चंद्र दुणे अन डोळे दोन
चंद्र त्रिक डोळ्यांतिल काजळ, भिवयांची वर चंद्रकोर
चंद्र चोक वेणीत केवडा, चंद्र पाचा चपलाहार,
चंद्र सक ओठावरचा तिळ, साता चंद्र हसू मधाळ
निरीनिरीतुन लगबगणारी चंद्र आठा बोटे आठ
खांद्यावरती पदर विसावे नव्वे चंद्र चोळीगाठ
भांगेतिल कुंकू लावण्याने मुसमुसलेला चंद्रोदय
गालावरच्या खळीत लाली चंद्र दाहे ज्योतिर्मय

सर्वाना कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

कलाकविताजीवनमान

सख्या, कसे? कुठून रोज, आणतोस चांदणे?

सत्यजित...'s picture
सत्यजित... in जे न देखे रवी...
4 Oct 2017 - 3:36 pm

हळूच सोडतोस केस..माळतोस चांदणे...
सख्या, कसे? कुठून रोज, आणतोस चांदणे?

अधीर ओठ साधतात मौनही कसे तुझे?
किती अरे, उरात खोल पेरतोस चांदणे!

बनून स्वप्न चोरतोस झोप रोजचीच तू...
विचारताच, चोर कोण? सांगतोस..चांदणे!

उनाड चंद्रमा बनून हिंडतोस रात्रभर
पहाट-वेळचे, टिपूर मागतोस चांदणे!

नभात लक्ष तारका उधाणतात कैकदा
मिठीत केवढे कसून घुसळतोस चांदणे!

मधाळ चांद, वितळतो..रसाळ रात वाहते...
असे कुण्या सुरांत रे! पुकारतोस चांदणे!

—सत्यजित

gajhalgazalमराठी गझलशृंगारकवितागझल

मराठी कवींच्या कवीतेतील स्त्रीरूपाची काव्यसृष्टी

शरद's picture
शरद in जनातलं, मनातलं
3 Oct 2017 - 7:42 pm

मराठी कवींच्या कवीतेतील स्त्रीरूपाची काव्यसृष्टी

लोकसत्ताच्या दि. २३ सप्टेंबरच्या "चतुरंग"च्या पुरवणीत विन्दा करंदीकर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त "मराठी कवींच्या कवीतेतील स्त्रीरूपाची काव्यसृष्टी" असा विषय घेऊन अनेक साहित्यिकांनी निरनिराळ्या कवींवर लेख लिहले होते.त्यांची यादी पाहिली तरी हा आढावा किती विस्तृत होता त्याचा अंदाज येईल.

कविताआस्वाद

वासफुलं

Swapnaa's picture
Swapnaa in जे न देखे रवी...
3 Oct 2017 - 12:16 am

वासफुलं

काळोख्या अंधारांत
अचंबनेच्या वळणात,

वेदनांच्या आवाजांत
जळणाऱ्या दिव्यांत,

कळ्यांच्या बाजारांत
पैश्यांच्या व्यापारांत,

शृंगाराच्या पसाऱ्यात
वासनेंच्या डोळ्यांत,

विकृतीच्या प्रहारांत
अश्रुंच्या पुर्णविरामात......

कवी - स्वप्ना

कविता माझीकविता

हे बहुरुपी

अनन्त्_यात्री's picture
अनन्त्_यात्री in जे न देखे रवी...
30 Sep 2017 - 8:25 pm

हे बहुरुपी मृत्यो

एकदाच सांग, थांबवून इथल्या समुद्राची गाज
कोणतं रूप घेऊन घिरट्या घालतोयस आज?

उघड्या मॅनहोल मधली जलसमाधी प्रलयी?
की पुलावरच्या गर्दीची चिरडती घुसमटघाई?

कळत नाही, दोष देऊ कुणा ?
या बजबजपुरीचा बकालपणा ?
की तुझा निरंतर मायावीपणा ?

मुक्त कविताकविता

मन

दिनेश५७'s picture
दिनेश५७ in जे न देखे रवी...
26 Sep 2017 - 10:12 pm

मन विचाराचे घर
मन कृतीचे आगर
मन अथांग सागर
मन मधुर साखर

मन आभाळीचा रंग
मन आत्मरंगी दंग

मन देहाचा आरसा
मन मायेचा वारसा
मन चंचल चंचल
मन कधी अविचल

मन मोकाट मोकाट
मन कधीचे मुकाट
मन धावे सैरावैरा
मन माळावरला वारा

मन गरीब पामर
मन कधी अनावर
मन वेडेही भासते
मन मनात हासते...

कवितामुक्तक

देवीची शेजारती

वैभवदातार's picture
वैभवदातार in जे न देखे रवी...
25 Sep 2017 - 12:55 pm

|| देवीची शेजारती ||

नीज अंबे अर्पितो तुजला शेज फुलांची
अंबे शेज फुलांची
पुरले मनोरथ घ्यावी आरती भक्तांची ||धृ.||

पूजन केले तुझे आम्ही नवविधा भक्ती
अंबे नवविधा भक्ती |
ज्ञानदीपातूनी प्रगटल्या आज आत्मज्योती || १ ||

षड्रिपूंचा पंखा करुनि वारा घालितो
अंबे वारा घालितो |
पंचप्राण एकवटून शेजारती गातो || २ ||

दया क्षमा शांती यांचा नाजूकसा शेला
अंबे नाजूकसा शेला |
सगुण साकार रूपावरी मी प्रेमे पांघरला ||३||

कविता