वस्तरा हरवला आहे म्हणून
माझा वस्तरा हरवला आहे म्हणून
उगाच रडण्याभेकण्याचे नाटक कुणी करू नये
तसंही चंद्राला भिंगातून पाहताना
मला ओतावे लागते घागरभर पाणी
मग छाटलेली काठी घेऊन
हाकारावी लागतात गाढवं मैलोनमैल
बघून घेईन मी एकेकाला
ज्यांनी पळवले आहेत माझे रद्दीचे पेपर
पेन्सिलीला टोक करून
माझी शेवींग क्रीम पळवली आहे ज्यांनी
कॅलेंडरवर लिहिलीय मी त्यांची तारीख
आता चाललोच आहे तर
जरा फाट्यावर जाऊन येतो
बाकी वस्तरा हरवला आहे म्हणून
रडण्याभेकण्याचे नाटक कुणी करू नये
-रानातला वेडा