काचेपलिकडचं वास्तव!
मॉलमध्ये गेल्यावर माझं हे असं होतं ।
मोहाच्या हट्टापुढे गरजांचं हसं होतं ।।
आतमध्ये शिरताच माझ्या
साधेपणाचे पाश तुटतात ।
साऱ्या सुप्त इच्छांना मग
शक्यतेचे पंख फुटतात ।।
दिपून जातात डोळे, काही दिसेनासं होतं ।
मॉलमध्ये गेल्यावर माझं हे असं होतं...... ।।१।।
चोहीकडे दिसतात मला
जेव्हा वैभवाचे सडे ।
आणि लखलखणारी सुखं
रोखून बघतात माझ्याकडे ।।
कसं सामोरं जावं त्यांना
मला खरंच कळत नाही ।
माझं आणि पाकीटाचं, मत
काही केल्या जुळत नाही ।।