"ती सध्या कुठे सापडेल"
~~~~~~~~~~*****~~~~~~~~~~
ती अडथळ्यांमध्ये
मार्ग काढताना सापडेल,
ती परीक्षां
जोमाने देताना सापडेल,
ती प्रसंगांना
तोंड देताना सापडेल,
ती सगळ्यांसाठी
दाणापाणी मिळवताना सापडेल,
ती घरच्यांमध्ये
रमताना सापडेल,
ती निस्वार्थ
हसताना सापडेल,
ती मैत्री
निभवतांना सापडेल,
ती निसर्गचित्र
टिपताना सापडेल,
ती कला कौश्यल्यात
भरारी घेताना सापडेल,
ती लिखाणातून
व्यक्त होताना सापडेल,
ती पशु,प्राण्यांना
माया करताना सापडेल,
ती एकटेपणात
मोहरताना सापडेल,
ती आयुष्य
धैर्याने जगताना सापडेल,
ती खंबीरपणे
सावरताना सापडेल....
कवी-स्वप्ना..
प्रतिक्रिया
23 Jul 2017 - 7:07 pm | एस
चांगली कविता.
24 Jul 2017 - 5:05 pm | Swapnaa
धन्यवाद