कविता

II शहराकडून "बा" चा फून आला II

सिद्धेश्वर विलास पाटणकर's picture
सिद्धेश्वर विला... in जे न देखे रवी...
10 Jul 2017 - 1:53 pm

शहराकडून "बा" चा फून आला

केल्या केल्या विचारू लागला

कोण टाकून गेला

लेंडूक आपल्या शेतामंदी ?

म्या म्हटलं

माझ्याशिवाय हाय कोण इथं ?

तुमास्नी ह्ये कोण बोललं तिथं ?

"बा"ने घपकंन हासडून शिवी

लावली गाडीस चावी

निघाला परतीस गावाकडं

म्या बी धावलो धपाधप

लेंडूक शोधाया शेताकडं

घेता वास चहूकडं

नाक साफ चोंदून गेलं

च्या मारी माझ्या अपरोक्ष

कोण ह्ये शेत शिंपून गेलं ?

घेतली कुदळ फावडी हाती

कराया खाली वर माती

फुलं पसरली चहुकडं

जागोजागी लावली उदबत्ती

कविता

दिंडी

अनन्त्_यात्री's picture
अनन्त्_यात्री in जे न देखे रवी...
9 Jul 2017 - 3:13 pm

अभिजात सुमारांची बहुश्रुत दिंडी
लॅपटॉपी कीबोर्डाचे चटचट अहिर्निश टाळ
निष्क्रिय मत-मतांतरांचे डब्ब दुतोंडी मृदंग
वैचारिक साठमारीचे गुगलपुष्ट निर्दय घोडरिंगण
जितं मया च्या एकेकट्या भेसूर आरत्या

तिथे सुदूर चंद्रभागेकाठी
काळाभोर त्याच्या अट्टल दगडी मौनातल्या शयनी एकादशीत
कल्पांतापर्यंत अकिम्बो

मुक्त कविताकविता

परीक्षा

माम्लेदारचा पन्खा's picture
माम्लेदारचा पन्खा in जे न देखे रवी...
9 Jul 2017 - 12:37 pm

परीक्षेला बसवलं आहेस तू अशा देवा
किती पानं लिहितोय तरी वेळच संपत नाही
इतकी अवघड परीक्षा काय ही कामाची
हजारदा वाचला तरी तुझा प्रश्नच कळत नाही !

परीक्षेचं वेळापत्रक तरी आधी सांगायचं असतं
कोणालाही असं थेट पेपरला बसवायचं नसतं
अभ्यासक्रम वेगळा आणि हे प्रश्न भलतेच आहेत
गोंधळ झाला तरीही वर मार्क मिळवायचे आहेत ?

मागे एकदा दिला होता मी धैर्याचा एक पेपर
त्याचं काय झालं पुढे ते कळलंच नाही नंतर
आता चालू आहे सहनशक्तीची अफाट चाचणी
करतोस तरी कशी तू असल्या प्रश्नांची जुळवणी ?

अभय-काव्यकविता माझीमाझी कविताकवितामुक्तक

झाली...पहाट झाली!

सत्यजित...'s picture
सत्यजित... in जे न देखे रवी...
9 Jul 2017 - 5:46 am

रानात पाखरांची..चर्चा अफाट झाली
उगवेन सूर्य आता ही रात्र दाट झाली!

फांदीवरुन कानी येतात सूर काही
मी ऐकतो भुपाळी जी चिवचिवाट झाली!

गेला चुकून ताफा येथून राजशाही
इतक्यात राजरस्ता ही पायवाट झाली!

आता नव्या युगाची कविता नवी लिहूया
भरपूर आजवर नुसती काटछाट झाली!

फिरतोय स्वप्नवेडा..किरणे धरुन हाती
निद्रिस्तश्या जगाची,झाली..पहाट झाली!

—सत्यजित

gajhalgazalमराठी गझलरतीबाच्या कविताकवितागझल

मराठी माणसा झोपलाच राहा

अरूण गंगाधर कोर्डे's picture
अरूण गंगाधर कोर्डे in जे न देखे रवी...
8 Jul 2017 - 10:32 pm

मराठी माणसा झोपलाच राहा
पॅसे मिळविण्या मात्र तत्पर राहा
घरिदारी अन बाजारीही
जातीपातीचे राजकारण करी

नको तेथे अध्यात्म लावुनी
विसरुनी जा तू दिव्य लक्ष्मी
हरलास जरी जीवनी तू
अध्यात्माचे धडे गिरवी तू

वास्तवाचे भान सोडुनी
नवा मार्ग शोधू नको तू
मिळणाऱ्याचा द्वेष करी तू
बाणा आपुला सोडू नको तू

बदलू अथवा पेटू नको तू
आस प्रगतीची ठेवू नको तू
जुने सारे संत पकडुनी
कीर्तन भंडारे करी तू

मंदिरांपुढे रांग लावुनी
वेळ आपुला व्यर्थ दवडी तू
वाद घाल तू जयंत्यांवरी
शासकीय तिथी दिनांकांवरी

कविता माझीकविता

II नऊची ती बस खास होती II

सिद्धेश्वर विलास पाटणकर's picture
सिद्धेश्वर विला... in जे न देखे रवी...
7 Jul 2017 - 2:54 pm

नऊची ती बस खास होती

आतुर व्हायचो उठताक्षणी

कधी एकदा गाठतो

नटून थटून आलेली महाराणी

लगबग चालू असे नेहमी

आईची ती सारखी बडबड

आताच लागला कामाला

तर एवढी तुझी फडफड

जणू गावात लग्न

अन कुत्र्याची हडबड II

तुका झाला होता

तिच्यासाठी जीव माझा

ज्ञानेश्वर सोपान अंतरी ते

कपाळी सदैव तिच्या नावाचा टिळा होता II

लाली पावडर लावून

रोज धावायचो

बघायचे राहून गेलेच

तर रिक्षातल्या आरशात

थोबाड बघायचो

दोन रुमाल नेहमी खिशात

सदैव दिमतीला असायचे

कविता

ये,बैस ना जराशी...

सत्यजित...'s picture
सत्यजित... in जे न देखे रवी...
7 Jul 2017 - 10:18 am

ये,बैस ना जराशी,कर बात चांदण्याची
दररोज येत नाही ही रात चांदण्याची!

हिणवून काल मजला,गेलाय चंद्र रात्री
दे दाखवून त्याच्या औकात चांदण्याची!

कळतेय ना मलाही,होतो उशीर आहे
कवळून जा उराशी तादात चांदण्याची!

येतेस तू अताशा,स्वप्नात रोज माझ्या
स्वप्नांत भेट होते साक्षात चांदण्याची!

स्वप्नांत चांदण्याच्या,गेल्या कितीक राती
घेवून रात ये तू दारात चांदण्याची!

आलीस ना छतावर झटकून केस ओले?
शहरात होत आहे बरसात चांदण्याची!

—सत्यजित

gajhalgazalमराठी गझलरतीबाच्या कविताशृंगारकवितागझल

भवताल

चंद्रकांत's picture
चंद्रकांत in जे न देखे रवी...
7 Jul 2017 - 9:35 am

भवताल

भंजाळलेला भवताल, भरकटलेली माणसे
आणि अस्वस्थ वर्तमान
नियतीने निर्धारित केलेलं प्राक्तन की,
स्वतःच आखून घेतलेली वर्तुळं

संस्कृती केवळ एक शब्द नाही
प्रदीर्घ वाटचालीचा इतिहास सामावलेला आहे त्यात
माणसाच्या अस्तित्वाचा
पण तोही आक्रसत चाललाय एकेक पावलांनी

कुठून कुठून वाहत येणारे प्रवाह
अथांग उदरात साठवत राहिला शतकानुशतके
कोरत राहिला अफाट काळाच्या कातळावर लेणी
सजवत राहिला साकोळलेल्या ओंजळभर संचिताला
क्षणपळांची सोबत करीत चिमण्यापावलांनी पळत राहिला
सुंदरतेची परिमाणे शोधत

कविता

शिवस्तुती

अरूण गंगाधर कोर्डे's picture
अरूण गंगाधर कोर्डे in जे न देखे रवी...
6 Jul 2017 - 4:40 pm

आदिदेव महादेव नटभैरव नटरंग
करी तांडव आंदोलन होई भयकंपन

नटराज पंचवदन अतिरुद्र महांकाल
दशहस्त काळाग्नी रुद्र गळा सर्पाभरण

महातत्व महाप्रचंड जाळितसे मदन वदन
विरक्त महायोगी महागुरू जगत्कारण

भूतगण शिवगण पूजिती मायेसहित गजानन
भावभोळा शिवशंकर होई वरदायक

देई शुद्ध भक्ती मुक्ती आम्हां तारक
गंगाधरसुत म्हणे होई मज आश्वासक

रौद्ररसकविता

II तो स्पर्शच नवा होता II

सिद्धेश्वर विलास पाटणकर's picture
सिद्धेश्वर विला... in जे न देखे रवी...
6 Jul 2017 - 4:05 pm

तो स्पर्शच नवा होता

का कुणास ठाऊक

भासे हर एक भेटीची, अपूर्वाई

उमजे ना मज कारण

का तो कायम हवा होता II

चुकून लागलेल्या धक्क्याने

भवताली दाट धुके झाले

सुचले नाही क्षणभर

मन कायमचे मुके झाले

भर ग्रीष्मात मज बाधला

प्रेम शिशिराचा गारवा

कारण , कारण ..... कसं सांगू तुम्हाला

तो स्पर्शच नवा होता II

शुष्क होते मन माझे

सत्वास मी जागलो

का जाणे सैरभैर

धक्क्यापरी वागलो

हळू हळू अंतराने

रंग घेतला नवा

पालवी ती जागोजागी

देठही तो हिरवा

कविता