कविता

कविता :: II बॉस हा नेहमी बॉस असतो II

सिद्धेश्वर विलास पाटणकर's picture
सिद्धेश्वर विला... in जे न देखे रवी...
29 Jun 2017 - 3:17 pm

बॉस हा नेहमी बॉस असतो

तुमचा काय न आमचा काय

एकदम झक्कास असतो

आपल्या खाली वात लावून

उजळतो कार्यालय सारे

अन लख्ख प्रकाश टाकतो

बॉस हा नेहमी बॉस असतो

तुमचा काय न आमचा काय

एकदम झक्कास असतो II

नको वाईट वाटून घेऊ

दुः ख समजतंय मला , मित्रा

तू देखील आमच्या सारखाच येतोस कामावर

बुडाखाली लावून पत्रा

टक टक आवाज होई पत्र्याचा

पत्रा निनादत राहे

गरीब मेहनती कामकरूस

तो ठोकुनी निरखुनि पाहे II

बॉस वरचा क्लास असावा

पाहताक्षणी तो उर भरावा

कविता

आयुष्याची गाडी

माम्लेदारचा पन्खा's picture
माम्लेदारचा पन्खा in जे न देखे रवी...
28 Jun 2017 - 9:48 am

रिकामी दिसली एक गाडी
त्यात जाऊन बसलो मी
आता मजा येईल प्रवासाची
म्हणून स्वतःशीच हसलो मी

कधी वाटलं गाडीला थांबवावं
कधी सुसाट पळवावं तिला
पण आयुष्य नामक चालकाने
माझा पूर्ण भ्रमनिरास केला

मी नेईन तसंच जायचं तू
म्हणालं मला माझं आयुष्य
कसला हट्ट करायचा नाही
विचारायचं नाही कधी भविष्य

घडवीन तुला सफर मी आता
एका वेगळ्याच जादुई दुनियेची
कुठे फार थांबायचं नाही आपण
आणि घाईही नाही करायची

आलास जसा जन्माला
सगळे रंग तू बघून घे
लक्षात नाही यायचा खेळ हा
हे पहिल्यांदा समजून घे

अभय-लेखनकविता माझीप्रवासवर्णनकवितामुक्तकजीवनमानप्रवास

माझ्या गावाचा पाऊस..

अत्रुप्त आत्मा's picture
अत्रुप्त आत्मा in जे न देखे रवी...
27 Jun 2017 - 7:24 pm

माझ्या गावाचा पाऊस
आडंरानी आडंवनी..
https://scontent-lax3-1.xx.fbcdn.net/v/t1.0-0/cp0/e15/q65/s600x600/18922033_105872673352925_8587622378336631223_n.jpg?efg=eyJpIjoidCJ9&oh=519629344698b21dc06628f17fbe1306&oe=59D981D6
फुले अंगांगी हो त्याच्या
रूजे थेंब पानोपानी..

भावकविताशांतरसकविता

कविता II अजून एक चान्स तू घ्यायला हवा होता II

सिद्धेश्वर विलास पाटणकर's picture
सिद्धेश्वर विला... in जे न देखे रवी...
27 Jun 2017 - 5:28 pm

अजून एक चान्स तू घ्यायला हवा होता

ठाऊक मजला ठिकऱ्या ठिकऱ्या उडाल्यात

निवड चुकली जरी तुझी पहिली

तरी अजून एक हात धरायला हवा होता II

हि वाट नयनांनी खुलते

स्पर्शाने फुलते

रमते मन सदैव त्यात

अचानक सत्य येता बाहेर

अकस्मात होतो मनावर आघात II

अपघात घडतच असतात

अशा फैरी नित्य झडतच असतात

म्हणून मनाची बंदूक म्यान करायची नसते

पुन्हा नव्याने उठून अजून एक फैरी झाडायची असते II

विसरायचे ते सारं काही

आता कशात मन रमत नाही

असं पुन्हा म्हणायचे नाही

कविता

घराला मनांचा उबारा करु!

सत्यजित...'s picture
सत्यजित... in जे न देखे रवी...
27 Jun 2017 - 6:48 am

नको तेच ते तू दुबारा करु
हवा देउनी मज निखारा करु!

भिजू दे मला तू मिठीशी तुझ्या
पुन्हा पावसाला इशारा करु!

नको मोकळे केस झटकून तू
इथे चांदण्याचा पसारा करु!

खुले केस पाठीवरी सोड ना
खुळ्या मोगऱ्याचा पिसारा करु!

तुझ्या पाउली चंद्र उतरेल तो
कसा मी मला सांग तारा करु!

सखे लाट अनिवार होवून,ये
अता थेंब-थेंबा किनारा करु!

शमावी क्षणातच जिथे वादळे
घराला मनांचा उबारा करु!

—सत्यजित

gajhalgazalमराठी गझलशृंगारकवितागझल

मेरे मरदको काम पे है जाना आणि काडीचा सरडा

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जे न देखे रवी...
25 Jun 2017 - 3:57 am

काडीचा सरडा

ही कविता वाचल्यानंतर खालील दोन छायाचित्रे पाहिल्यास कवितेची परिणामकारकता वाढते.

होती शुष्क एक काडी झाडावरती
तुटूनी पडली खाली धरणीवरती

जणू ओढावले तिचे मरणचकी
वय होवोनी मातीत मिळाली

वेगळी झाली मग तिचे व्हावे काय?
धुळ मातीत मिळोनी कुजूनी जाय

प्राण जावोनी वृक्षापासोनी झाले शरीर वेगळे
पण धरेवरी पुनर्जन्म झाला मिळाले रूप निराळे

डोके छोटे वरती बघे मान उंचावूनी
पुढील पाय लांब केले खाली रेटूनी

लांब शेपटी आदळली खाली जमिनीवरती
उडीचा पवित्रा केला मागील पाय आखडूनी

हास्यकविताविनोदमौजमजाछायाचित्रण

निळा प्रवासी

विशाल कुलकर्णी's picture
विशाल कुलकर्णी in जे न देखे रवी...
24 Jun 2017 - 7:16 pm

अजाण पक्षी सुजाण वारा
उन्मुक्तावर स्वच्छन्द पहारा
चुकवून अव्यक्तांच्या नजरा
उनाड पाऊस, अवखळ गारा

काळ्या डोही कातळपाणी
हिरवे असुनी रान अधाशी
वेशीवरती उभा थबकुनी
अवकाशीचा निळा प्रवासी

गंध मातीचा, धरा बहरली
पानोपानी ओजही सजले
डोळ्यांत कुणाच्या नीर निळे
हिरव्या तेजाने डोळे निवले

ये रे, ये रे ... अनंत याचना
जलदांचे अवगुंठन सरले
कोसळू लागल्या रेशिमधारा
धरतीचे मग मी पण सुटले !

© विशाल विजय कुलकर्णी

माझी कविताकविता

...असे आजोबा!

हृषीकेश पतकी's picture
हृषीकेश पतकी in जे न देखे रवी...
24 Jun 2017 - 11:08 am

काल उघडले कपाट तेव्हा
पुन्हा भेटले मला आजोबा |
असण्याहूनही नसण्यामध्ये
नवे वाटले मला आजोबा ||१||

शुभ्र साजि-या वस्त्रांमधूनी
होते लपले असे आजोबा |
इंचघडीतून अलगद ज्यांनी
आम्हा जपले असे आजोबा ||२||

पुस्तकातल्या श्लोकांमधला
सुस्पष्ट असा तो ध्वनी आजोबा |
पत्ररुपाने अक्षर होऊन
अन् भिडणारे मनी आजोबा ||३||

कधी हास्याची झुळूक आणि
कधी गोष्टींची लाट आजोबा |
आकार आम्हाला देताना
शिस्तीचा परिपाठ आजोबा ||४||

भावकविताकविता

वाघोबा वाघोबा किती वाजले

श्रीगुरुजी's picture
श्रीगुरुजी in जे न देखे रवी...
21 Jun 2017 - 3:03 pm

वाघोबा वाघोबा किती वाजले

वाघोबा वाघोबा किती वाजले,
पाऊस न येताच राजीनामे भिजले|

वाघोबा वाघोबा किती वाजले,
म्याव म्याव च्या डरकाळीने घसे बसले|

वाघोबा वाघोबा किती वाजले,
भूकंपाच्या धमकीने हसू फुटले|

वाघोबा वाघोबा किती वाजले,
आदिलशहा* येताच शेपूट घातले|

वाघोबा वाघोबा किती वाजले,
यांच्या मर्कटलीलांनी केजरीवाल लाजले|

वाघोबा वाघोबा किती वाजले,
धाकल्याच्या चतुराईने थोरले बिथरले|

वाघोबा वाघोबा किती वाजले,
बनियासमोर** लोटांगण घातले|

vidambanकाहीच्या काही कविताकविताविडंबन

नजरोंको चुराकर वो...

सत्यजित...'s picture
सत्यजित... in जे न देखे रवी...
21 Jun 2017 - 4:00 am

नजरोंको चुराकर वो,इस तौर से चलते हैं
कुछ हमभी मचलते हैं,कुछ वो भी मचलते हैं

मुमकिन है महोब्बतभी,गर चांद वो ला दो तो
ये चांदके 'टुकडे' तो,बगियामें टहलते हैं

जुगनूंकी तरह यादें..हमको यूं जलाती है
शम्मोंको बुझाकर हम,पुरजोर पिघलते हैं

इनकार तो था लेकिन,नजरें वो झुकायें थे
ये दौर है दुनियाका..पलभरमें बदलते हैं

इन फूलोंकि दुनियामें,हम 'भंवरे' के मानिंद
इस फूलसे निकले तो,उस फूल पे चलते हैं

—भंवर गुनगुन

(हिन्दीतील माझा पहिला प्रयत्न!)

gajhalgazalकवितागझल