कविता II अजून एक चान्स तू घ्यायला हवा होता II

सिद्धेश्वर विलास पाटणकर's picture
सिद्धेश्वर विला... in जे न देखे रवी...
27 Jun 2017 - 5:28 pm

अजून एक चान्स तू घ्यायला हवा होता

ठाऊक मजला ठिकऱ्या ठिकऱ्या उडाल्यात

निवड चुकली जरी तुझी पहिली

तरी अजून एक हात धरायला हवा होता II

हि वाट नयनांनी खुलते

स्पर्शाने फुलते

रमते मन सदैव त्यात

अचानक सत्य येता बाहेर

अकस्मात होतो मनावर आघात II

अपघात घडतच असतात

अशा फैरी नित्य झडतच असतात

म्हणून मनाची बंदूक म्यान करायची नसते

पुन्हा नव्याने उठून अजून एक फैरी झाडायची असते II

विसरायचे ते सारं काही

आता कशात मन रमत नाही

असं पुन्हा म्हणायचे नाही

पंख छाटलेले नसतात ,असे बंदिस्त अंतरी ते

पुन्हा फुलवून सारे ,घे कवेत आकाश ते

सोड भूत पाश जुने , अजून एक नवा चान्स घे II

सिद्धेश्वर विलास पाटणकर C

कविता

प्रतिक्रिया

डॉ सुहास म्हात्रे's picture

27 Jun 2017 - 5:52 pm | डॉ सुहास म्हात्रे

अहो साहेब, एका चान्सचं काय घेऊन बसलात. डझनांनी (कविता टाकायचे) चान्सेस घेतलेत तुम्ही दोन दिवसांत.

दोन-तीन दिवसांतून एक कविता टाकलीत तर वाचकांना आणि तुम्हालाही श्वास घ्यायला थोडी सवड मिळेल ना. :)

सिद्धेश्वर विलास पाटणकर's picture

27 Jun 2017 - 6:50 pm | सिद्धेश्वर विला...

होय खरंय ते . मी माझ्या जवळजवळ दोनशे कविता मिपावर टाकायचे ठरवलं होत . सुरुवातही झक्कास झाली होती . काही मित्रही लाभले , क्षणात जवळ आले आणि आपलेसे होऊन गेले ..
हेच काळापासूनचे काही सुखद क्षण घेऊन मी आता परतीच्या वाटेवर आहे . मी कालपासून जी मेहेनत घेतली होती कविता पोस्ट करण्याची ती आता फक्त एका कवितेवर आलेली आहे . मिपा मंडळाला मी सांगूनही पाहिले, पण मंडळाने मला व्यक्तिगत संदेश वाचण्यास सांगितला . मी त्यावर गेलॊसुध्द्धा , पण तेथे काहीच नव्हते ....मित्रानो , जोपर्यंत मला माझ्या कविता पूर्वपदावर प्रकाशित मिळत नाहीत किंवा त्यामागील कारण काळात नाही तोपर्यंत मी येथून निरोप घेतलेला बरा.. माझ्यामुळे जर कोणी दुखावलं गेलं असेल तर माफी आणि अल्पावधीत प्रेमाचा धनी केल्याबद्दल आभार .. कळावे लोभ असावा ....
सिद्धेश्वर विलास पाटणकर C

मी माझ्या जवळजवळ दोनशे कविता मिपावर टाकायचे ठरवलं होत

माईलेज किती आहे..?

जेनी...'s picture

27 Jun 2017 - 8:52 pm | जेनी...

काय म्हणता ??? दोनशे ??? आणि त्याहि कविता ??

खरच वाचायला आवडतिल मला :D त्याहि फक्त आणि फक्त पहिल्या पाणावर आणि हो एकदम ओळीने :P :D

सिद्धेश्वर विलास पाटणकर's picture

27 Jun 2017 - 8:46 pm | सिद्धेश्वर विला...

साहेब मायलेज काय विचारताय ,, धूमकेतू म्हणा हवं तर .. अगदी नाही म्हटलं तरी रॉकेट... सुटलो कि असा सुटतो ,, सरळ बनतो गळ्यातलं लॉकेट .... मित्रा ,, माझं बोलणं झालं आहे संपादकीय मित्राशी , मला नियम कळले आहेत .. आता नियमाप्रमाणे भेटू .. काही मोजक्या कवितांसोबत ...

अद्द्या's picture

28 Jun 2017 - 1:16 pm | अद्द्या

"संपादकीय मित्राशी"

तोच ना तो अभ्यामोरे

:(

कमाल आहे तुमची :( ... तुस्सी जा रे ओ?? तुस्सी ना जाव :-/

सिद्धेश्वर विलास पाटणकर's picture

27 Jun 2017 - 9:08 pm | सिद्धेश्वर विला...

या रेनिडेमध्ये जेनीची प्रतिक्रिया ,, मतबल सोने पे सुहागा ... जेनी ताई भेटू आपण ... नक्की भेटू ... आपण मला बंधनात जे अडकवलंय ... बांधून राखीचा धागा ...

हाय ... भैय्या मोरे राखी के बंधन को निभाना...
जल्दिसे तेरी दोनशे कविता मिपापे बरसाना .... :D

एक हजारोमे जेनी बहना है
सारी उमर इसे कविता सुनाना है
होउन जाउ द्या एक
भावाभैणीच्या प्रेमावर एक कविता
वहीणी ला व्हीलन दाखवा उदा
असतील कालिंदीच्या तटावर लाख तुझ्या वहीनी
हा भाउ कधीच विसरणार नाही ग तुझी माया
हे बहीणी

जेनी...'s picture

27 Jun 2017 - 10:23 pm | जेनी...

:D

एक काम करा. तुमच्या सर्व (सध्याच्या) कविता (आणि भावी कविता) इथे मेन बोर्डावर टाकण्यापेक्षा ह्या ताईंच्या खरडवहीत टाका. काय म्हणता? :-)

का हो ?? तुम्हाला का बघवेना माझ्या भाउरायाचं असं बोर्डावर बागडणं ?? :-/

जळतात रे दादा तुझ्यावर सगळे ... तुझ्या अश्या अर्थपूर्ण आणि अमेझिन्ग कविता वाचुन :D

मला एक प्रश्न पडलाय
तुमच वय काय असेस ?
सहज हं प्रश्न आणि ते तुम्ही सामान जो शब्द वापरला एका कवितेत तो माझ्या अल्प माहीतीप्रमाणे विदर्भात तरुण पोर प्रेयसी ला किंवा स्पेसीफीक म्हणजे ज्या मुलीवर लाइन मारतात तिला उद्देशुन वापरतात
अजुन तुलनेने कमी वापर म्हणजे पुरुषेंद्रीया साठी
तुम्ही केलेला वापर मात्र परीचयाचा नाही
बाय द वे
मेरा कुछ सामान तुम्हारे पास पडा है या गुलजारी गाण्याचे अनेकरंगी अर्थ नजरेसमोर तरळुन गेले

माझे वांदे केलेत कि हो मारवासाहेब तुम्ही. नेमक्या या आठवड्यातच माझ्या अनवट किल्ले मालिकेत मी सामान गडाची माहिती लिहीणार होतो. आता सामानाचे हे अर्थ वाचून धागा टाकावा कि नको हा प्रश्न पडलाय.

डॉ सुहास म्हात्रे's picture

28 Jun 2017 - 2:05 am | डॉ सुहास म्हात्रे

ज्या लिखाणाने मिपाकडे आकर्षित झालो आणि चिकटून बसलो, ते उस्फुर्त धुमारे परत फुलू लागलेले पाहून अत्यानंद जाहला आहे. :)

या प्रक्रियेत कॅटॅलिस्ट झालेल्या सिविपाC यांना अनेकानेक धन्यवाद !

मारवा's picture

28 Jun 2017 - 8:45 am | मारवा

इंग्रजी सी अकशर हा त्यांच्या नावाचा भाग नसावा
त्यांना कॅापीराइट वाला सी अभिप्रेत असावा
पण तो सी वर्तुळाच्या आत असतो
इथे तो मुक्त असण्याची दोन कारणे संभवतात
एक कवि मुक्तछंद पसंत करत असावे
दोन जसे बहुतेक कवि अव्यवहारी असल्याने दुनियादारी त तरबेज नसतात काहीसे बेफिकीर....
बाय द वे चान्स घेणे चा एक अर्थ मुल जन्माला घालण्याचा निर्णय घेणे असा ही होतो
त्या अर्था ने.....

डॉ सुहास म्हात्रे's picture

28 Jun 2017 - 2:49 pm | डॉ सुहास म्हात्रे

वैयक्तिक नाव कसे लिहायचे याचे सर्व हक्क त्या नावाच्या मालकाकडे सुपूर्द असतात असे आम्ही समजतो... त्यामुळे त्यांनी जसे लिहिले त्याचेच लघुरूप बनवले. कोण जाणे त्या Cमध्ये काही गूढगंभीरगुप्त अर्थ असायचा... कविच्या मना कोणी जाणले आहे का? ;) :)

अत्रुप्त आत्मा's picture

28 Jun 2017 - 9:58 am | अत्रुप्त आत्मा

अजून एक तांब्या भरायला हवा होता

ठाऊक मजला जिलब्या जिलब्या पडल्यात
२००ची भूक जरी ही तुझी पहिली

तरी पाच भोकांचा एक तांब्या धरायला हवा होता II
टू बी कंटिनिव.. ;)
===
पीठेश्वर खलास आटणकर-C©~नवोन्मेषी jilबी प्र सारक संघ.

सिद्धेश्वर विलास पाटणकर's picture

28 Jun 2017 - 1:27 pm | सिद्धेश्वर विला...

धन्यवाद माझ्या बंधुभगिनींनो .... अतृप्त आत्म्याने जो प्रसाद दिधले , त्याने तांब्याला अजून भोक पडले ... कधी मोदकराव करतात डराव डराव , कधी मारवा देते नवा गारवा ... हर्शाळले मन माझे असे कि ... अश्या बंधूभगिनीनीचा नेहेमी मिळो आढावा ....

सिद्धेश्वर विलास पाटणकर's picture

28 Jun 2017 - 1:32 pm | सिद्धेश्वर विला...

जेंन्नीताई जेंन्नीताई तू कि नाही मला जीन वाटलीस , या शुष्क दिव्याला , तुझ्या अभिप्रायाने घासलेस , शब्द बाहेर आले आणि दोनशे कवितांची माळ बनली ... मिपाला माळ जाड वाटली , तुला मात्र एका ओळीत वाचविशी वाटली .... तुझी थोर पुण्याई फळाला आली ... जेंन्नीताई जेंन्नीताई तू कि नाही मला जीन वाटली.... प्राध्यापकांची छडी मिपावर पडता ... अर्धी माळ गायब झाली .... तुझी प्रतिक्रिया आली .... अन परत शब्दांनी उचल खाल्ली... जेंन्नीताई जेंन्नीताई तू कि नाही मला जीन वाटली....

प्रमोद देर्देकर's picture

28 Jun 2017 - 2:45 pm | प्रमोद देर्देकर

जल्ला ambujaa सीमेंट , एम.सिल सगला संपला काय.

अत्रुप्त आत्मा's picture

28 Jun 2017 - 3:57 pm | अत्रुप्त आत्मा

@एम.सिल››› =)))))

अय्या कित्ती छान कविता केलिय माझ्या दादाने ...

वाचा हं सगळ्यानी :D

धर्मराजमुटके's picture

28 Jun 2017 - 5:09 pm | धर्मराजमुटके

फुलों का तारोंका सबका कहना है !
एक हजारो में 'जेनी' का भईया है !
सारी उमर इसे कविता करना है !

सिद्धेश्वर विलास पाटणकर's picture

28 Jun 2017 - 5:16 pm | सिद्धेश्वर विला...

जेनी ताई , जेनी ताई , इतका वेळ तुम्ही कुठं होता बाई .... कविता वाचलीत जरी तुम्ही ... हे दुसऱ्याला सांगायचं नाही ... जेनी ताय जेनी ताय, आता कविता गेली उडत ... इथेच देत बसुया अभिप्राय ... जेनी ताय जेनी ताय.. दादा म्हणतेस ना मला.... चल तर मग झुलवूया प्रतिक्रियांचा झुला ... जेनी ताय जेनी ताय..इथे चालतील दिले तरी शंभर अभिप्राय ....जेनी ताय जेनी ताय..अजून काय नाय अजून काय नाय ... तुझा दादा

=))

पॉप लिरिक्स .. यो यो जेनी ताय ... ज ज जेनीताय =))

सिद्धेश्वर विलास पाटणकर's picture

28 Jun 2017 - 5:30 pm | सिद्धेश्वर विला...

भर पावसात मी अभिप्रायांनी भिजतो आहे .... हातात वॉटरप्रूफ मोबाईल , मिपा आणि तुम्ही ... मी मस्त आनंद घेतो आहे ... हे शरीर जरी शहारले त्या मुसळधार धारांनी.... असंख्य भेटतील पुन्हा या मिपाच्या कट्ट्यावर , जेनिवाणी भगिनी .... बंधूहि असतील , कुणी शहाणे , कुणी दिवाने .... मी सोडणार नाही तुम्हाला इतक्या सहज ... द्या तुम्ही लाख बहाणे .... भर पावसात एक चूक घडली .... माझ्या भगिनीची .... अचानक भेट झाली ..... शब्द शब्दाना भिडले असे कि .... हि कोसळणारी धारहि बोथट झाली .... तो ढग तरी मला सांगत होता .... वेड्या हा तुझा रस्ताच नाही ... इथे जाशील तर इथेच राहशील ... ह्या प्रांताचा अनभिषिक्त सम्राट तू .... घेत जा असेच अभिप्राय ... दुर्लक्षित कर सारे .... मी ऐकले नाही त्याचे ... कारण ... कारण ... मला माझे बंधू भगिनी आहेत प्यारे .... तुम्हा सर्वांचा दादा

डॉ सुहास म्हात्रे's picture

29 Jun 2017 - 12:09 am | डॉ सुहास म्हात्रे

मी सोडणार नाही तुम्हाला इतक्या सहज ... द्या तुम्ही लाख बहाणे

हे प्रेम आहे की धमकी ?! ;)

अभिजीत अवलिया's picture

28 Jun 2017 - 6:08 pm | अभिजीत अवलिया

तुमचा पूर्वीचा आयडी काय होता ?

सिद्धेश्वर विलास पाटणकर's picture

28 Jun 2017 - 6:15 pm | सिद्धेश्वर विला...

मला काळाला नाही आपला अभिप्राय ... मुळात आय डी कुठला ते सांगा ...

जेनी...'s picture

28 Jun 2017 - 7:00 pm | जेनी...

अरे दादा ते तुला डुआयडी म्हणतायत :-/

चल आता त्यांच्यावरहि एक कविता कर पाहु ..

:P :D

सिद्धेश्वर विलास पाटणकर's picture

28 Jun 2017 - 7:05 pm | सिद्धेश्वर विला...

हे जेनी ताय, कुठं होतीस बाय ... चाल सांग पाहू आता हे डू आय डी काय ... हे जेनी ताय ... लवकर सांग पाहू बाय .... माझ्याकडं येळ कमी हाय ... सांगशील ना बाय ... काय ग जेनी ताय ....

तुमचा दादा

सिद्धेश्वर विलास पाटणकर's picture

28 Jun 2017 - 7:10 pm | सिद्धेश्वर विला...

अडाण्याला गोत्र नसते ... शहाण्याला गात्र .... मूर्खांची गिनती करू नये ..गल्लोगल्लीत सापडतील पात्र ...

जेनी ताय आणि बाकी सर्व भाय ...आता बाय बाय ... पाऊस काय थांबायचा नाय .... मोबाईल वॉटरप्रूफ आहे मी नाय ... शुभसंध्याकाळ आणि शुभरात्री ...उद्या भेटू पुन्हा सर्व ठेवा तुम्ही खात्री ...

तुमचा दादा

अत्रुप्त आत्मा's picture

28 Jun 2017 - 7:23 pm | अत्रुप्त आत्मा

काय त्या भळाभळ बुळूक बुळूक जिल्ब्या पडतात! =))
डबडे नाही.. तर अख्खं पिंप घेऊन वावरात बसलायत वाट्टं. =))

जव्हेरगंज's picture

28 Jun 2017 - 9:04 pm | जव्हेरगंज

:D

खाकी गोळी द्या गुर्जि दादाला :D

दुर्गविहारी's picture

29 Jun 2017 - 11:26 am | दुर्गविहारी

मेलो हसून हसून !!! जळ्ळी ती स्माईली काय टाकायला जमेना. सहसा कवितेच्या वाट्याना मी जात नाही.पण ईथे प्रतिक्रियेचा दंग बधून आलो आणि अपेक्षेप्रमाणेच मिपाकरांनी केलेल्या चिंध्या दिसल्या. जेनीताईनी तर धमाल आणली. आता जेनी ताई आणि सिद्धेश्वर विलास पाटणकर C यांची भाउ बहीणिची मैफल येत्या राखी पौर्णिमेपर्यंत तरी चालावी. तोपर्यंत दोनशेचा स्टॉक काय संपत नाही.
आता सिद्धेश्वर साहेबांच्या आधीच्या कविता वाचणे आले.

सतिश गावडे's picture

29 Jun 2017 - 11:33 am | सतिश गावडे

आता सिद्धेश्वर साहेबांच्या आधीच्या कविता वाचणे आले.

त्यांना जन्नत नसीब झाली.

सतिश गावडे's picture

29 Jun 2017 - 11:34 am | सतिश गावडे

त्यांना म्हणजे सिद्धेश्वर शास्त्री यांच्या कवितांना.

काय सांगताय ? कब हुआ ये नापाक झमेला ?
पण तुम्ही हे म्हणताय तोपर्यंत त्यांनी तिकडे दोन कविता प्रसवल्यासुध्दा. ईतक्या सहजासहजी माघार घेण्यार्‍यातले नव्हेत ते.

पूर्वी एक रातकिडा इंद्रसेन की कायसा आयडी होता, प्रत्येक उत्तर कवितेत देत असे. तीच ही वाईन नव्या बाटलीत आली असं वाटलं.

-भरभर लिहीतो मी कवनी