मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कविता

II हात सोड कटेवरचे , उचल बडव्यांशी लढावया II

सिद्धेश्वर विलास पाटणकर ·

विशुमित 04/07/2017 - 16:03
आशय आवडला... तुझ्या दरबारी विठुराया फक्त लक्षुमीची छाया असे जरी वाटत असले तरी पंढरपूरच्या विठ्ठलाचं असे देवस्थान आहे जिथे प्रत्येकाला पांडुरंगाच्या थेट पायावर डोके ठेवायला मिळते. क्वचितच असे इतर मोठ्या देवस्थानी पाहायला मिळते.

वत्स विशुमिता, पुरे आता का उगा चाळविता ? भावना ज्या लोपल्या अभिप्राय वाचून विखारी लाव्हासम उसळल्या ब जरी भ मी केला फरक त्यात पडेल काय ? "ब"डव्यापासूनच "भ"डवा आला निर्विवाद सत्य ह्हाय मान्य आम्हांसी आमचे उपद्व्याप आम्हीच केले सादर कवनि , सर्वश्रुत म्हणुनी ठेवूनिया आलासी माथा जरी तिथे विटेवरी का उगा बाळगी ताप ? व्यक्त होऊनि आज पासून चातुर्मासारंभ झालेला आहे .. तेव्हा विडी कि दिंडी हे ज्याचे त्याने ठरवावे ... मला या संपूर्ण चातुर्मासात शांत राहायला आवडेल ... ज्याला कुणाला मृदूंग वाजवायचा असेल त्याने ते जरूर करावे ...आम्ही शांत राहण्याचा प्रयत्न जरूर करू पण ... आम्ही जर काही बोललो तर ते या संस्थळी सर्वांसी मान्य व्हावे ... हीच आमची इच्छा आणि तुम्हा सर्वाना आषाढीच्या लाख लाख शुभेच्छा ......

In reply to by सिद्धेश्वर विल…

विशुमित 05/07/2017 - 12:47
""""मान्य आम्हांसी आमचे उपद्व्याप"""" ==>> तुमचा काही तरी गैरसमज झालेला दिसतोय. मला तुमचे नाही, बडव्यांचे उपद्व्याप अभिप्रेत होते. तुमचे चालू द्यात. फक्त थोडे जरा जपून नाहीतर तुमचा पण संक्षी होईल.

माहितगार 05/07/2017 - 18:01
मध्यंतरी बडव्यांच्या नेमणूकांची पद्धत वगैरे बदलली होती त्या बद्दल मिपावर चर्चाही झाली होती. त्यानंतर प्रत्यक्ष परिस्थितीत फरक पडला नाही का ? कि या कवितेतील बडव्यांवरील आक्षेप जुन्या अनुभवावर आधारीत आहे ?

In reply to by माहितगार

अभ्या.. 05/07/2017 - 18:13
उद्गम काहीही असला तरी आता बडवे हे आडनाव झालेले आहे. त्यांच्याकडे वंशपरंपरागत असलेले विठ्ठलसेवेचे अन उत्पात, परिचारक, डिंगरे आदी सेवकांचे रुक्मिणीमातेच्या सेवेचे व नित्योपचाराचे अधिकार सध्या नाहीत. ते सरकारी नेमणुकानुसार होणार्‍या कर्मचार्‍यांचे कर्तव्य आहे. बडवे हे जसे पांडुरंगाला असत तसे बार्शीच्या भगवंताच्या सेवेतही आहेत पण तेथे अद्याप सरकारी हस्तक्षेप नाहीये.

In reply to by अभ्या..

माहितगार 06/07/2017 - 11:37
कवितेतला अनुभव तेथे बराच पुर्वी घेतला आहे, पण सरकारी हस्त़क्षेपानंतर परिस्थिती कितपत बदलू/सुधारू शकली आहे ? याची माहिती नाही म्हणून प्रश्न विचारला

विशुमित 06/07/2017 - 12:00
मला आता पर्यंत फक्त तीनच देवस्थाने भेटली जिथे कोणी हिडीसफिडीस करताना दिसले नाही ते म्हणजे-- अमृतसर, वैष्णोदेवी आणि आपल्या महाराष्ट्रातील शेगाव. इतर तीर्थक्षेत्री ठिकाणी मी फक्त दर्शन करतो बाकी षड्रिपूंकडे लक्ष देत नाही.

भ्रम कैवल्याचा साधला भक्ती नामातच तू बांधला कुणी पहिला रे तुला दगडामध्येच अडकला खांब सोनेरी रुपेरी तरी उभा विटेवरी बडवे मातले ते सारे उगा भक्तांसी छळे ऱे दावुनी कोरी नोट त्यांसी उभे माउली दर्शनासी बनवून माऊलीस दासी बडवे राजभोग भोगती तुझा दरबार पातला, दुर्लभ भक्त दर्शनासी स्वतः समजून ते राजे शिवीगाळ गाभारा माजे कैसी शिस्त नाही जाण कोऱ्या नोटेस फक्त मान तुझ्या दरबारी विठुराया फक्त लक्षुमीची छाया हात सोड कटेवरचे उचल बडव्यांशी लढावया सिद्धेश्वर विलास पाटणकर C

तुफान आलंया !!

फिझा ·
तुफान आलंया !! हिरव्यागार शेताचा मालक मी जरी सोबत होती फक्त रणरणती सावली , खळाळत्या नदीला ना ओंजळभर पाणी भरलेली विहीर तर कधीच आटली , ठिगळ लावतच जगतो मी शेतकरी ते तरी किती पुरणार...धरणी सुद्धा फाटली …पण उजळेल आता तिची कुस ……उद्या पडेलच की पाऊस …!!! एक सर झाली की पेरणी करेन , गुरांबरोबर चार दिस मीही राबेन , तरारेल मग शेत जोमाने , डाव सगळा मांडेन मी नव्याने, भुईला करून टाकेन हिरवं शिवार , बैल गाडीवर मग होईल सवार , .....कापडं नवीन घालेन, असेल माझाच कापूस .....उद्या पडेलच की पाऊस !!! मातीत मिसळले बरेच आधीच हाय खाऊन , प्रश्न सुटतील का पण अशी आत्महत्या करून , विठू उभा राहील पाठी

II बळीराज किंकर अख्नंडीत माझे II

सिद्धेश्वर विलास पाटणकर ·
छन्दीष्ट्य वातावरणी जर्जर धारा हि सारी जरब कायम असे दिनकराची दुर्भिक्ष्य ते जान्हवीचे पाणी II यति नग सारे काष्ठ मांडी हाट सारा त्रागा मरुत वाही रिक्त अंबार सारे II कंगाळ बळीराज करी मख घेउनि नांगर हाती अर्ध्वयु अवतरती स्वअभ्युदयासि II अक्षर आरोहण अर्ध्वयु ते साधे अनृत अनुज मानुनी बलीराजासी उध्रुत उधम इंद्रजाल सारे बळीराज किंकर अख्नंडीत माझे II सिद्धेश्वर विलास पाटणकर C

भेटी लागी जीवा . .

माम्लेदारचा पन्खा ·

पिशी अबोली 04/07/2017 - 23:28
सुरेख!! पावसाच्या स्वामी स्वरूपानंदांची एक सुंदर रचना आहे-'उदारा जगदाधारा' ने सुरू होणारी. लहानपणी म्हणत असू, ते आठवलं एकदम हे वाचून..

पिशी अबोली 04/07/2017 - 23:28
सुरेख!! पावसाच्या स्वामी स्वरूपानंदांची एक सुंदर रचना आहे-'उदारा जगदाधारा' ने सुरू होणारी. लहानपणी म्हणत असू, ते आठवलं एकदम हे वाचून..
परब्रम्ह उभे ठाकले समोर साक्षात कैसे मी मग सावरावे आता देहभान दाटलेला कंठ,डोळा पाणी आर्त हरपली केव्हाच अवघी भूक तहान मागणे भौतिक सुखे हे मूर्खलक्षण अशाश्वत गोष्टींचे काय करु कळेना तूच निर्मीलेल्या जगी कंठतो जीवन तरीही का तुझा परीसस्पर्श होईना सद्य परिस्थिती देवा तुझिया समोरी काय तुला मी वेगळे असे आळवावे दाता आहेस तू, एवढेच द्यावे मला तुझ्या चरणाची मी फक्त धूळ व्हावे !

अन् फुलांचे देह ओले पेटवावे तू!

सत्यजित... ·

एस.योगी 04/07/2017 - 12:22
एवढा असतो रुमानी कोणता शेवट? पत्र माझे चुंबनांनी चुर्गळावे तू! _/\_ _/\_

एस.योगी 04/07/2017 - 12:22
एवढा असतो रुमानी कोणता शेवट? पत्र माझे चुंबनांनी चुर्गळावे तू! _/\_ _/\_
बागडावे वाटले की बागडावे तू... मी फुलांना पाहिले की आठवावे तू! मी पिसे पिंजून माझी बांधले घरटे पाखरा,अलवार या घरट्यात यावे तू!

उगवता सूर्य आणि तो

अनिकेत कवठेकर ·
उगवत्या सूर्याला पाहून तो छद्मीपणानं म्हणाला तुझं उगवतं रूप फार फसवं आहे मित्रा सकाळच्या किरणांना कोवळं म्हणण्यापेक्षा दुबळं म्हटलं पाहिजे कारण मी तुझं हे शतकानुशतकाचं राहाट गाडगं पाहून कंटाळलोय संध्याकाळी मावळताना हसलेलं आणि उगवताना वैतागलेलं पाहिलंय तरीही तुझा उदयच लोकांना का आवडतो अस्त का नाही? उगवत्याला दंडवत मावळत्याला का नाही? सूर्य म्हणाला ज्याच्याकडं काम असतं त्यालाच जग हात जोडते काम संपत आलं की लगेच त्यालाच रद्दीत काढते मग रक्त आटवलं तरी जग दखल घेत नाही तुम्ही नष्ट झालात तरी जगाचं आडत नाही कामाचा सूर्य थकल्यावर लोक पाठ फिरवतात कामचुकारपणा जपण्यासाठी नव्या सूर्याला कवटाळतात

भूमिपुत्र आणि काळी आई

अनिकेत कवठेकर ·
आकाशाकडे डोळे लावून बसलेल्या त्याच्या सुकल्या डोळ्यांनाही भिजवेल एवढं पाणी त्याला द्यायला सरकार तयार नव्हतं त्याला दिलेल्या अश्रूंचाही कोटा त्यानं खर्च केला होता कधी मरणारं जित्राब पाहून कधी सावकाराला जमीन विकून तर कधी हातातोंडाशी आलेलं पिक अवकाळी पावसानं झोडपलेलं पाहून अपयशाच्या पहिल्या पायरीवरच जगत त्याच्या अनेक पिढ्या काळ्या मातीत मिसळल्या पण त्या समिधांनीही भूदेवता प्रसन्न झाली नाही की लक्ष्मी देवतेने भरभरूनवआशीर्वाद दिला नाही सावकार रूपी लक्ष्मीपुत्रांच्या दावणीला मात्र त्याचं नशीब बांधलं गेलं ते कायमचंच अंधार्या भविष्याच्या सात-बार्यावर मात्र त्याच्या आर्त वेदनांचं गोंदण झालं कधी भूमिही

व्याकुळकथा

अनिकेत कवठेकर ·
तो शुद्धीवर नव्हता तेव्हा कोणीतरी त्याला नकळत जमिनीवर उतरवलं आणि अनोळखी टापूमध्ये त्याची पावलं त्याच्या इच्छेविरूद्ध पडू लागली आजुबाजूच्या अनोळखी लोकांनी त्याच्या रडण्याचा आनंद घेतला तो ओळखीचा संकेत समजून त्याने तो प्रदेश आपलाच असण्याचा समज करून घेतला पहाटवेळच्या आश्वासक आवाजांतून आणि स्पर्शांतून दररोजच्या सूर्योदयांच्या विभ्रमांतून याच्याही डोळ्यांमधीळ काळ्या बाहुल्यांच्या पडद्याआडच्या मनात काही इंद्रधनुष्यं दबा धरून बसली सूर्य जसा जसा वर येऊ लागला तसे पहाट स्वनांच्या इंद्रधनुष्यांमागे याची अबोध पावलं प्रारब्धाच्या वार्याबरोबर अलगद पडू लागली आणि मोठी होऊ लागली सूर्य माथ्यावरून जसा कलू लागला

भरारी

अनिकेत कवठेकर ·
..आणि त्याचं विमान त्या सवयीच्या झालेल्या रन-वे वरून पुन्हा भरारी घेत उंचच उंच आकाशी झेपावलं विमानाच्या वेगानं मन मात्र पुढं सरकायला तयारंच नव्हतं त्याच्या उमलत्या काळाच्या आठवणी, त्याच्या पावलांना चालतं करणारे आश्वासक हात त्याच्या वेगाला मूकपणे वाखाणणारे डोळे त्याच्या वेड्या साहसांनंतरही मायेने त्याचे अपराध पोटात घेणारी मनं.. त्याच्या इंद्रधनुष्याकडे जाणार्या रस्त्यावर ढगासारखी आड येत होती तेवढ्यात सर्रदिशी वीज लखलखून त्याला भविष्यकाळ दाखवून गेली मग त्यानंतर समुद्रात पाऊस पडला सोडलेला देश अंधुकसा दिसू लागला त्याला सूर्य दिसावा म्हणून त्याच्या देशानं स्वत:ला अंधारात ठेवणं पसंत केलं.

अविनाशीत्व

अनिकेत कवठेकर ·
ग्रीष्माच तप्त ऊन , पुरातन काळ्याशार मंदिराचा रणरणता प्रदक्षिणा मार्ग गावोगावच्या आबाल वृद्धांनी श्रद्धा , भक्ती , उपचार , सोपस्कार आणि दृढ विश्वासावर जागृत ठेवलेलं देवस्थान पूजा , आरत्या , फेर्या , लोटांगणे यांनी तापलेल्या वास्तवाला शमवण्यासाठी देवाला दिलेली हाक देवाने ऐकली बहुतेक. कारण ..