अभिजात सुमारांची बहुश्रुत दिंडी
लॅपटॉपी कीबोर्डाचे चटचट अहिर्निश टाळ
निष्क्रिय मत-मतांतरांचे डब्ब दुतोंडी मृदंग
वैचारिक साठमारीचे गुगलपुष्ट निर्दय घोडरिंगण
जितं मया च्या एकेकट्या भेसूर आरत्या
तिथे सुदूर चंद्रभागेकाठी
काळाभोर त्याच्या अट्टल दगडी मौनातल्या शयनी एकादशीत
कल्पांतापर्यंत अकिम्बो
प्रतिक्रिया
9 Jul 2017 - 3:30 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
वैचारिक साठमारीचे गुगलपुष्ट निर्दय घोडरिंगण
लैच आवडले. जबरा.
-दिलीप बिरुटे
9 Jul 2017 - 3:38 pm | अभ्या..
आह्ह, खत्तरनाक.
11 Jul 2017 - 9:26 am | अनन्त्_यात्री
धन्यवाद!