सुंदरी काय आहे तुझ्या मनांत?
का अशी वागतेस तू कोड्यांत?
कधी राग,कधी अनुराग,
कधी प्रेम, कधी आग
कधी हो, कधी नाही
कधी घरी विचारते,कधी माहीत नाही,
तू तर रोज सखे भेटतीस,
सुंदरी काय आहे तुझ्या मनांत?
का अशी वागतेस तू कोड्यांत?
*
कधी मधाळ हास्य,कधी भृकुटी भंग
कधी भांड भांड भांडतेस,
तर कधी गळ्यात पडून रडते
कधी स्वत:च खर करतेस,
तर कधी माझं चुकलं म्हणतेस,
सुंदरी काय आहे तुझ्या मनांत?
का अशी वागतेस तू कोड्यांत?
हे कोड कधी उलगडेल का?
तिच मन कधी कळेल का
प्रतिक्रिया
20 Aug 2017 - 1:06 pm | धर्मराजमुटके
खरंच ! अवघडै ! मल्तातर कायी क्ळ्तचच नाही
20 Aug 2017 - 5:48 pm | Swapnaa
छान..