मोरया

रवि बदलापूरेकर's picture
रवि बदलापूरेकर in जे न देखे रवी...
31 Aug 2017 - 10:01 pm

मोरया
मोरया मोरया
ओमकारा मोरया
मोरया मोरया
गणपती बाप्पा मोरया

भरली सुखाची ओंजळ
बाप्पा तुझ्या आगमनाने,
जाहलो मी धन्य
देवा तुझ्या दर्शनाने

तू गजराज, तूच गणनायक
तू विघ्नहर, तूच विनायक,
तू सुखकर्ता, तू दु:खहर्ता
मोरया तू मंगलमूर्ती मोरया तू

दिसे सारे ब्रह्मांड तूज नयनी
वसे चारीधाम तूझ्याच चरणी,
चराचरातील रूप तुझे
देई भक्तांना दर्शन आपुले

चुका भक्तांच्या घेई तू उदरा
येता शरण देई तूच आसरा,
धरी तू छताची सुख सावली
अशी तू माझी माय माउली

आला सोडूनी तू कैलास
सोबतीला तुझ्या मुषकराज,
कसे थांबवू सांग तुला तू
आईबाबांचा बाळ सुकुमार तू

तू गजराज, तूच गणनायक
तू विघ्नहर, तूच विनायक,
तू सुखकर्ता, तू दु:खहर्ता
मोरया तू मंगलमूर्ती मोरया तू

मोरया मोरया
ओमकारा मोरया
मोरया मोरया
गणपती बाप्पा मोरया

माझी कविताकविता

प्रतिक्रिया

ज्योति अळवणी's picture

2 Sep 2017 - 11:02 pm | ज्योति अळवणी

_/\_