एक कविता
अरे ,
उधार माग ,
देतो ना चार करकरीत नोटा
कधी देणार परत असं न पुटपुटता ...
अरे,
हिशोब माग ,
देतो मुकाट सगळ्या सोळभोगाचा इत्थंभूत ,
पण उंबरठ्यावर अडकण घालून ,
एक गाणं दे ,
एक गाणं दे
असा, धोशा लावणाऱ्या दिवसाला
कसं माघारी पाठवायचं ??