चुकले...

अजब's picture
अजब in जे न देखे रवी...
2 Dec 2017 - 10:30 am

गंध उधळला इकडुन तिकडे, वाऱ्याचे चुकले
निखळुन पडला वरून खाली, ताऱ्याचे चुकले
दूर जाउनी परतुन आली, वाटेचे चुकले
किनाऱ्यावरी विसावली अन लाटेचे चुकले
घाव लागला वर्मी, होते बाणाचे चुकले
तडफडला पण गेला नाही, प्राणाचे चुकले
बुडून गेली वस्ती सगळी, प्रलयाचे चुकले
इतके कुणास अपुले म्हटले, हृदयाचे चुकले...

कविता

प्रतिक्रिया

समयांत's picture

2 Dec 2017 - 1:03 pm | समयांत

भारीच...चुकले!!
आवडले.

चांदणे संदीप's picture

2 Dec 2017 - 1:54 pm | चांदणे संदीप

मस्त लयीत आहे. आवडलीच!

Sandy

प्राची अश्विनी's picture

2 Dec 2017 - 4:32 pm | प्राची अश्विनी

आवडली.

रंग उडाला इकडुन तिकडे, अंदाजच चुकले
निखळुन पडला वरून कुंचला, भानही हुकले
आस लावली ओठांना ह्या, शब्दांना मुकले
मिट्ट रात्रीच्या उजळ प्रकाशी, आभाळही झुकले
निष्प्राण वाटेवरच्या डोळ्यातले रक्तही सुकले
कुठून पाहता मिट्ट रात्रीचे तारेही लुकलुकले
घनदाट निळ्यातील चुकार लेमनी, हळूच शुकशुकले
इतके कुणास अपुले म्हटले, वसंताचे चुकले...
.
लव्हिंग व्हिन्सेंट

सानझरी's picture

4 Dec 2017 - 2:43 pm | सानझरी

आवडली कविता!!

अभिजीत अवलिया's picture

3 Dec 2017 - 11:45 am | अभिजीत अवलिया

अजब आणि अभ्या,
कविता मस्त आहेत.

नाखु's picture

3 Dec 2017 - 11:59 am | नाखु

चक्क प्रेम कविता?
भारीच केलीय, अगदी अलवार

आनंदीत नाखु