कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने मी लिहिलेला अभंग ...
विठ्ठला रे विठुराया रे
पूजितो मी तुला
चातुर्मास समाप्त आजि
आलो दर्शनाला ||धृ ||
सावळे सुंदर रूप गोजिरे
पाहतो मी डोळा
विटेवरी उभा हात कटेवरी
तुळशीहार गळा ||१ ||
दामाजीसाठी तू महार होसी
जनाबाई चे दळण दळसी
तुकारामांच्या गाथा तू तारिसी
संत सज्जनांचे रक्षण करिसी ||२ ||
कार्तिकी एकादशी वारी येई
भक्त मंडळींना दर्शनाची घाई
पांडुरंगा तुझी अर्धांगी रखुमाई
विठुमाऊली तू जगाची आई ||३ ||
चंद्रभागा तरी स्नान जे करिती
त्यांची सर्व दुःखे पापे नष्ट होती
षड्रिपूंपासूनि मुक्त ते होती
टाळ मृदुंगांचा गजर करिती ||४||
अठ्ठावीस युगे उभा विटेवरी
दुष्टांसी दंडूनी सुष्टांसी तारी
नमितो वैभव आलो तुझ्या दारी
घ्यावे दीनासी या तुझिया पदरी ||५||
--शब्दांकित (वैभव दातार )
प्रतिक्रिया
31 Oct 2017 - 12:04 pm | सूड
अरे वा अरे वा, आता त्रिपुरारी पौर्णिमेलाही होऊन जाऊ द्या काही फक्कड!!
31 Oct 2017 - 8:44 pm | माम्लेदारचा पन्खा
पिच्छा काही सोडूू नका !
31 Oct 2017 - 10:17 pm | चौथा कोनाडा
अठ्ठावीस युगे उभा विटेवरी
दुष्टांसी दंडूनी सुष्टांसी तारी
नमितो वैभव आलो तुझ्या दारी
घ्यावे दीनासी या तुझिया पदरी ||५||
प्रसदिक रचना !
.. नमितो वैभव... व्वा, सुंदरच !
अशाच प्रसादिक पुढिल अभंगांच्या प्रतिक्षेत !
3 Nov 2017 - 9:43 am | ज्ञानोबाचे पैजार
सावळे सुंदर रूप गोजिरे
पाहतो मी डोळा
विटेवरी उभा हात कटेवरी
तुळशीहार गळा
मस्तच लिहिले आहे. विठुरायाची मुर्ती डोळ्यासमोर उभी राहिली.
वर सूडकाका म्हणतात तसे त्रिपुरी पौर्णिमेवर पण एखादी फक्कड कविता येउ दे.
(खुदसे बाता... पैजारबुवा तुम्ही फक्त गटारीवरच कविता लिहित बसा.... अशा कविता लिहीण्यासाठी तुम्हाला पुढचा जन्म घ्यावा लागेल)
पैजारबुवा,