ही कविता 'सुसंगती सदा घडो सुजाण वाक्य कानी पडो ' ह्या कवितेच्या चालीवर म्हणता येते.
दीपावली आजि असे घरोघरी दिवे लागले
कंदील पणती माळा तयांचे तेज हे फाकले ||१ ||
धनत्रयोदशी धन्वंतरी पूजा महत्त्व कळे
आयुर्वेदाचा देव हा आयुष्य आपणासी मिळे ||२ ||
नरकासुरासी संहारी श्रीक्रुष्ण जनांसी तारी
दुष्टांचा मारक हरी सुजनतारक श्रीहरी ||३ ||
प्रभातकाळी उठुनिया लावू सर्वांगासी चंदन
अभ्यंग स्नान करूसुगंधीउटणे तैल लेवून || ४ ||
लक्श्मीपूजा असे घरी धनवर्षा होऊ दे दारी
हिशेब जुन्या चोपड्या तयांचे पूजन मी करी ||५ ||
प्रतिपदाबली पाताळी डोई वामन चरण
विक्रम समवत्सर होई नववर्ष तू जाण ||६ ||
दिवाळी फराळ करू ताटामध्ये मिष्टान्न असे
करंज्या शेव चिवडा चकल्या लाडू अनारसे || ७ ||
भाऊबीज ओवाळिती बहिणी आपुल्या बंधुला
रक्षण करतो तुझे बहिणीला भ्राता वदला ||८ ||
दिवाळी सण सौख्याचा दारापुढे काढा रांगोळी
शुभेच्छा देतो सर्वांना म्हणूया शुभ दीपावली || ९ ||
-- शब्दांकित (वैभव दातार )