(बघ जरा पोळीत माझ्या काय आहे….)

Primary tabs

गबाळ्या's picture
गबाळ्या in जे न देखे रवी...
9 Dec 2017 - 1:44 am

प्रेर्णा - http://www.misalpav.com/node/41514

अनंत यात्री - प्रथम तुमची क्षमा मागतो. आज विडंबनाचा मूड आहे. या नादान बालकाला क्षमा करून तुमच्या अनंत यात्रेमध्ये सर्वांसोबत मलाही सामावून घ्याल अशी अपेक्षा करतो.

बघ जरा पोळीत माझ्या काय आहे….

भू नकाशा लांघणारे चित्र आहे
टोचण्याला चांगलेची शस्त्र आहे
तप्तसूर्याने जळाले सर्वत्र आहे
सक्तीच्या खाण्यात गलीत गात्र आहे
कवळी शाबीत गळती नेत्र आहे
शत्रूला कापेल ऐसे अस्त्र आहे
अंत ना आदि असे अजस्त्र आहे
प्राण लवकर घोटणारा मंत्र आहे

बघ जरा पोळीत माझ्या काय आहे….
घ्या मला टोळीत तुमच्या हे ध्येय आहे ....

कविता माझीकाहीच्या काही कविताजिलबीफ्री स्टाइलभावकवितामाझी कवितामुक्त कवितारतीबाच्या कवितावाङ्मयशेतीभयानकअद्भुतरसकविताविडंबनशब्दक्रीडाविनोदपारंपरिक पाककृतीपौष्टिक पदार्थमराठी पाककृती

प्रतिक्रिया

एस's picture

10 Dec 2017 - 12:25 am | एस

चांगला प्रयत्न आहे.

मिपावर विडंबन टाकताना त्याचे शीर्षक कंसात द्यावे असा प्रघात आहे. उदा. [बघ जरा पोळीत माझ्या काय आहे….]

गबाळ्या's picture

10 Dec 2017 - 1:02 am | गबाळ्या

आणि सुचने बद्दल आभारी. पुढच्या वेळी नक्की लक्षात ठेवीन.

अनन्त्_यात्री's picture

10 Dec 2017 - 9:56 am | अनन्त्_यात्री

पोळी जरा आहे कच्ची | परी विडंबनाची उबळ सच्ची |
म्हणौनी नाही धरित गच्ची | येरू कधीही कुणाची||
नवकवींचा कळिकाळू | विडम्बकांसी कनवाळू |
पैजारबुवा निर्मळू | गुरू तयांसी करावे ||

ईश्वरदास's picture

10 Dec 2017 - 12:14 pm | ईश्वरदास

आओ कभी चव्हाटे पे,
हमे भी थोडा सुच्या है,

बघ जरा चोळीत माझ्या,
ईधर टाक्या तो चावेमगे मेरको.

पक्षी's picture

11 Dec 2017 - 7:24 pm | पक्षी

छान