(हलगी)

ज्ञानोबाचे पैजार's picture
ज्ञानोबाचे पैजार in जे न देखे रवी...
3 Nov 2021 - 10:44 pm

पेरणा

किरणकुमार यांची बासरी तर आमची हलगी

हलगी..

शाम वर्ण तो शोभत होता, सुडौल काये वरी
ठुकमत ठुमकत समोर आली, सुंदर ती नारी

वस्त्र राजसी, पदर भरजरी, गळ्या मधे साज
पुढे चालता पैंजण करती, छुमछुम आवाज

प्रथम दर्शने नार देखणी, नजरेत भरली
त:क्षणी मी तिला मनोमन, होती की वरली

मोहक पुष्पे खोवून होता,अंबाडा सजला
मोह अनामिक कसा सुटावा? सांगाकी मजला

आठवताना रुप आपुले, मेख जाणवे खरी
सापळ्यावरी हडकांच्या या का, भुलेल ती नारी?

अदभूतकोडाईकनालगरम पाण्याचे कुंडनागद्वारबालकथाकृष्णमुर्ती

नारळ पुराण

मालविका's picture
मालविका in पाककृती
3 Nov 2021 - 10:40 pm

ही कोणतीही पाककृती नाही पण अनेक पाककृतींमधला एक महत्वाचा घटक असलेल्या नारळाचं हे वर्णन म्हणून या सदराखाली लिहिते आहे.

माहेर नि सासर दोन्ही कडून कोकणस्थ आणि कोकणातच रहात असल्याने नारळावर जरा जास्तच प्रेम. कधी कधी हे प्रेम इतकं उतू जात की नवरा वैतागून म्हणतो," आता नाश्त्याला नारळाची भजी, जेवायला नारळाची पोळी नि भाजी,प्यायला नारळाचं सरबत केलंस की पुण्य मिळेल"

पायातली वहाण..

Jayagandha Bhatkhande's picture
Jayagandha Bhat... in जनातलं, मनातलं
3 Nov 2021 - 11:20 am

पायातली वहाण...

तुला फक्त येते,
श्रीखंड अन् पुरी..
आवडत नाही तुला,
राईस अँड करी..
आम्ही जातो केळवणाला,
तू बस घरी..
कसं आहे, पायातली वहाण,
जरा पायातच बरी...

येऊ का रे ऑफिसला..?
मारते एक फेरी..
क्रेडिट आणि डेबिट मधलं,
कळतं का काहीतरी..?
घरी बस तुझी तिथेही,
कटकट नको भारी..
पायातली वहाण तू,
पायातच बरी..

कविताविचार

क्रोनोनॉट अरुण

भागो's picture
भागो in जनातलं, मनातलं
2 Nov 2021 - 9:54 pm

अरुण रेडिओ वरची क्रिकेटची कॉमेंटरी ऐकण्यात अगदी रंगून गेला होता. खाली सोसायटी कंपाउंड मध्ये त्याचे मित्र गल्ली क्रिकेट खेळण्यात दंग होते. ते त्याला खेळण्यासाठी सारखे बोलावत होते. पण तो गेला नव्हता. त्याला भारत पाकिस्तान गेम मध्ये जास्त रस होता. शेवटची ओवर चालू होती. पाकिस्तान जिंकणे आता शक्यच नव्हते. हा गेम संपला की तो मित्रांच्या बरोबर खेळायला जाणार होता. इतक्यात आतून बाबा आले. आज बाबा ऑफिसला गेले नव्हते. त्यांना जबरदस्त सर्दी झाली होती. थोड अंग गरम झाल्यासारखे वाटत होते.
“ झाली की नाही तुझी मॅच?” बाबांनी थोड्या चढ्या आवाजांत विचारले.

कथा

डॉक्टर ननवरे यांचे अद्भुत टाईम मशीन

भागो's picture
भागो in जनातलं, मनातलं
2 Nov 2021 - 10:31 am

(माझी ““पॉपकार्न परत आले” ही कथा “ऐसी अक्षरे” च्या २०२१ दिवाळी अंकात आली आहे. ही कथा त्या कथेचा दुसरा भाग)
Statutory Warning
Throughout this book(story), the author sometimes attempts to use humor to explain certain concepts in a light-hearted manner. However, the author is not professional comedian, and thus cannot assure the desired effect. Be assured, however, that the author does not intend to offend any dead, alive, zombie, or otherwise undecided cats in superposed status
Exploring Quantum Physics Through Hands-On Projects

कथा

हस्तर परीक्षण :- theeran ,पोलिसांच्या धकाधकीच्या आयुष्याचे रडगाणे ना गाता केले वर्णनं

हस्तर's picture
हस्तर in जनातलं, मनातलं
1 Nov 2021 - 10:32 pm

हस्तर परीक्षण :- theeran ,पोलिसांच्या धकाधकीच्या आयुष्याचे रडगाणे ना गाता केले वर्णनं

मित्रांनो पहिलीगोष्ट म्हणजे चित्रपटाचे नाव टायटल मध्येच आहे ,तुनळीचा दुवा https://www.youtube.com/watch?v=xE_yyR0Zjsg आहे
मागील परीक्षण पण action नामक चित्रपटाचे होते ,मला वाटले लोकांना कळेल

आपण सिंघम दबंग बघतीले पण वास्तवात तसे नसते

चित्रपटप्रकटन