मिपाकर 'चौकटराजा' यांना भावपूर्ण श्रद्धांजली

चित्रगुप्त's picture
चित्रगुप्त in जनातलं, मनातलं
20 Nov 2021 - 3:39 pm

आज दिनांक २० नोव्हेंबर, २०२१ रोजी सकाळी ५:२० वाजता, आकुर्डी पुणे येथे आपले प्रिय मिपाकर चौकटराजा (अरूण बर्वे) यांची प्राणज्योत मालवल्याचे समजले. मृत्यूचे कारण कोविड असल्याचे समजले.
गेली काही वर्षे मी कायप्पावर त्यांचेशी नियमितपणे संपर्कात होतो. ते पियानोवर ओपी नय्यरची गाणी वाजवून रेकॉर्डिंग पाठवायचे, अलिकडे स्मूलवरही बरीच गाणी गात असत. मिपावर त्यांनी उत्तम दर्जाचे लिखाण केलेले असले तरी अलिकडे काही काळापासून ते मिपावर येताना दिसलेले नाहीत.

समाजबातमी

उर्दू शायरीमधील "हर्फ गिराना" आणि हिन्दी चित्रपट संगीतावर त्याचा परिणाम

धष्टपुष्ट's picture
धष्टपुष्ट in जे न देखे रवी...
20 Nov 2021 - 1:14 pm

मराठी वृत्तबद्ध कवितेत एखादे अक्षर लघु आहे का गुरु यामध्ये संदिग्धता नसते, पण त्याचा कधीकधी जाचही होऊ शकतो. उर्दूमध्ये "हर्फ गिराना" या सवलतीमुळे त्यात लवचिकता, कधी कधी संदिग्धता आणि म्हणूनच रोचकता आली आहे.
.
या लघुलेखात आपण २ गोष्टी पाहणार आहोत
१. हर्फ गिराना काय प्रकार आहे
२. तो कधी कधी नीट न समजल्यामुळे चित्रपट संगीतात कसा घोटाळा होतो

कविता

तुझ्या घरातले अनारसे

चॅट्सवूड's picture
चॅट्सवूड in जे न देखे रवी...
19 Nov 2021 - 6:02 pm

तुझ्या घरातले अनारसे
कधी खायला मिळतील?

माझ्या घरातले लाडू
आता कधीही फुटतील!!

तुझ्या त्या गोड शंकरपाळ्या
मला चहा बरोबर चालतील

आमच्या चिवड्यांचे डबे
आता रिकामेच राहतील

तुझे ते चिरोटे (२)
कायम लक्षात राहतील

माझ्या त्या कडबोळ्या
वातड होऊन जातील

तुझ्या या फराळाला
घरातले ही 'दात' देतील

उन्हात टेरेसवर वाळवून
वर्षभर पुरवून खातील...

प्रेम कविताकविता

प्राकृतिक चिकित्सा दिवस : योग, यज्ञ आणि प्राकृतिक चिकित्सा स्वर्णिम युगाकडे वाटचाल

विवेकपटाईत's picture
विवेकपटाईत in जनातलं, मनातलं
19 Nov 2021 - 12:10 pm

माणसाचे शरीर पंच तत्व - माती, पाणी, अग्नि, वायु आणि आकाश (मन) पासून बनलेले आहे. शरीरात या तत्वांचे संतुलन बिघडले की माणूस आजारी पडतो. हे संतुलन प्राकृतिक तत्वांच्या सहाय्याने ठीक करणे म्हणजे प्राकृतिक चिकित्सा. भारतात प्राकृतिक चिकित्सा वैदिक काळापासून आहे. आयुर्वेद चिकित्सा प्रणालीत शरीरातील कफ, पित्त आणि वात या त्रिदोषांचे संतुलन प्राकृतिक तत्वांद्वारे केले जाते. योग, यज्ञ आणि आयुर्वेद ही प्राकृतिक चिकित्सा पद्धतीचा एक भाग आहे. गतकाळात सतत होणार्‍या विदेशी आक्रमण आणि युद्धांमुळे या पद्धती सामान्य जनतेपासून दूर गेल्या.

धोरणलेख

तोंड भरून बोला !

कुमार१'s picture
कुमार१ in जनातलं, मनातलं
18 Nov 2021 - 2:25 pm

गंमती वाक्प्रचारांच्या : भाग २

भाग-१ इथे
...................................................................................................................

भाषाआस्वाद

लोगो...

चिनार's picture
चिनार in जनातलं, मनातलं
17 Nov 2021 - 11:43 pm

लोगो..

'अ' कंपनीला 'ब' कंपनीने टेकओव्हर केलं. 'अ' कंपनी तशी जुनी पण गावठी. 'ब' कंपनी एकदम आंतेर्रराष्ट्रीय! काही तांत्रिक कारणाने 'अ' कंपनीच नाव बदलता येणार नव्हतं. त्यामुळे ती ब कंपनीची ग्रुप कंपनी म्हणून ओळखल्या जाणार होती. कागदी टेकओव्हर पूर्ण झाल्यावर हळूहळू प्रत्यक्षात कब्जा करणं सुरू झालं.रोजच्या रोज पॉलिसी,प्रोसेस, कल्चर, इथिक्स, कॉम्पलायन्स वगैरे शब्दांचा भडिमार सुरू झाला. मग कंपनीचा लोगो या विषयावर गाडी आली.

मुक्तकविरंगुळा

इतिहासाचे डिटेक्टिव

केदार भिडे's picture
केदार भिडे in जनातलं, मनातलं
17 Nov 2021 - 7:25 pm

आपण इतिहासात जसजसे मागे जाऊ तसे त्या त्या काळाची कहाणी सांगणारी साधने बदलत जातात. अधिक मागे गेले की एक काळ असा येतो की लिहिलेले असले तरी नेमके काय लिहिले आहे हे वाचता येत नाही किंवा त्यातही काळाच्या ओघात शिल्लक राहिलेले अपुरे असते. अजूनही मागे जावे तर लिखित साधने अगदीच सापडेनाशी होतात. अशावेळी इतिहास जाणून घेताना आपल्याला डिटेक्टिवच्या भूमिकेत शिरावे लागते. अनेक घटना या लिखितपूर्व काळात घडलेल्या असतात आणि एखाद्या गुन्हेगाराप्रमाणे आपला ठसा मागे ठेऊन जातात. गुन्हेगार कधी हाताचे ठसे मागे ठेवतो, बुटाचा ठसा सोडतो, एखादा केस किंवा पार्किंगमध्ये गाडीच्या चाकाचे ठसे मागे ठेऊन जातो.

इतिहासतंत्रलेख

D I Y घरगुती दुरुस्ती

कंजूस's picture
कंजूस in तंत्रजगत
17 Nov 2021 - 12:29 pm

DIY
घरगुती दुरुस्ती

माइक्रोवेव अवनची panel buttons काही बंद पडलेली. पण स्टार्ट बटन चालत होते. तसंच काम भागत होते. पण परवा तेही बंद पडल्यावर रिपेरिग करणे आले. आता आठ दहा वर्षांनी नवीन panel सर्वच मॉडेल्सची मिळतीलच असं नाही.
यूट्यूबवर काही विडिओज पाहिले. मग उघडून फॉल्ट सापडला. बटणाच्या वायरी प्रिंटेड सर्किटमधून एका कनेक्टिंग रिबनने जोडल्या आहेत . त्याच्या लीडस आणि बटण यांमध्ये ब्रेक सापडला. जंपर वायर जोडल्या आणि सर्व बटन्स चालू झाली.
फोटो

अवघाचि संसार -रजायना,सास्काचवेन,कॅनडा

राजेंद्र मेहेंदळे's picture
राजेंद्र मेहेंदळे in जनातलं, मनातलं
17 Nov 2021 - 12:23 pm
मांडणीप्रकटन