Trekkers' group माहीती हवी
नमस्कार मंडळी
Trekking चा एखादा व्हॉट्स अप ग्रुप असेल तर लिंक कोणी शेअर करू शकेल का. मी पुण्यात राहतो. पुण्याच्या आसपास ट्रेकिंग ला जाणाऱ्या हौशी लोकांबरोबर ट्रेक करायचे आहेत.
नमस्कार मंडळी
Trekking चा एखादा व्हॉट्स अप ग्रुप असेल तर लिंक कोणी शेअर करू शकेल का. मी पुण्यात राहतो. पुण्याच्या आसपास ट्रेकिंग ला जाणाऱ्या हौशी लोकांबरोबर ट्रेक करायचे आहेत.
परिणती असो वा नियती
पानगळीत पाने गळती
पण, झाड उन्मळून पडता
हा दोष कुणाच्या माथी?
बहरून सळसळणारे
झाड आपुल्या ताली
जमिनीवर पडते तेव्हा
ना त्याला उरतो वाली
कोमेजून करपून जातील
कोवळी फुले त्यावरची
वेळीच छाटणी करवून
रूजवात करा फुटव्यांची
वादळ नवे येण्यापूर्वी
मोकळ्या करा पखाली
रूजणाऱ्या अंकुरांना
घ्या मायेच्या हाताखाली
- संदीप चांदणे (मंगळवार, ११/०५/२०२१)
पुण्यावरून अदृष्य कॅमेरा मँन सह.......
हा फ्लडलाईट सेरिज कनेक्शनवर लावला आहे. बल्ब आणि फ्लड आलटून पालटून लागायचं कारण काय? बल्ब ४० वॅटचा आहे. सप्लाय २३० व्होल्ट. फ्लड १५० वॅटचा आहे.
मागील आठवड्यात ३ दिवस पावनखिंडीत जाउन आलो. मस्त ट्रिप झाली. पावनखिंड आणि परिसर तर सुंदर आहेच. शिवाय ३-५ दिवसांच्या सहलीसाठी एकदम झक्कास जागा आहे. पावन खिंड (किंवा घोडखिंड) कोल्हापूरनजीक अंबाघाटात आहे. पुण्याहुन कराड - मलकापूर मार्गे अंदाजे चार - साडे चार तास लागतात. पावनखिंडीत २ दिवस मस्त मजा करता येते. एक दिवस पन्हाळ्याला जाउन येता येइल. पन्हाळगड तिथून एक सव्वा तासाच्या अंतरावर आहे. मार्लेश्वर देखील एका तासाच्या अंतरावर आहे. शिवाय गणपतीपुळे / रत्नागिरी दोन - अडीच तासात पोचता येते. विशाळगड देखील तासाभराच्या अंतरावर आहे (थोडे कमीच). पण तिथे काही फार पाहण्यासारखे नाही.
वाहावतो चांदणचुरा
तुझ्या उंबर्याशी
दाटतो गहिवर
मंद श्वासांशी||
चालतो अनवट वाटा
पैंजणांच्या लयीने
ऐकतो ह्रदयभाषा
नयनांच्या तीराने||
उधळतो चांदणफुले
गुंफलेल्या हातांनी
झेलतो चंद्रमरवा
गंधाळलेल्या मिठीने||
मिटते रात्र मंदफूल
गवाक्षी झुले वारा
पडते प्राजक्तभूल
रंगला चांदणचुरा||
-भक्ती
सेवानिवृत्ती नंतरच्या गोष्टी ज्यांनी माझे मन प्रफुल्लित ठेवलं त्यांपैकी एक म्हणजे मराठी कवीता. शाळेत असताना कवीता फक्त टक्के वाढवण्यासाठी वाचल्या. त्यातील थोड्या लक्षात राहील्या बाकी आयुष्यात टक्के टोणपे खाताना विस्मृतीत गेल्या.
मिपाकरांना नमस्कार. तुमच्या सगळ्यांच्या प्रोत्साहनाने व आशिर्वादाने मी हिरवी स्वप्ने/Green dreams नावाने यू ट्युब चॅनेल चालू केले आहे. यामध्ये निसर्गातील फुला-पानांच्या, पक्षांच्या गमती जमती, मला टिपता येईल ती माहिती, बागकाम या विषयांचा समावेश असेल. खाली तीन भाग देत आहे. तुम्हाला आवडतील अशी आशा आहे.
इथे तुम्ही बुलबुलचे बाळंतपणचे दोन लेख माझे वाचलेले आहात. या वर्षीच्या जन्मोत्सवाची थोडक्यात कथा खालील भागात आहे.
https://youtu.be/aA6k1AgPocY
मी एका रेडिओ स्टेशन वर काम करत होते. तिथं माझे नियरेस्ट बाॅस-म्हणजे माझ्या पोस्टच्या फक्त एकच स्तर वरचा असलेले बाॅस होते. त्यांना आपण क्ष म्हणू. आमच्या दिल्ली ऑफिस मधून एकदा एक ७/८पानी बाड आलं. इंग्रजी भाषेत. त्यात भारताच्या प्रगतीचा आढावा घेणारा मजकूर होता. ते 'क्ष'नी मला दिलं. म्हणाले,"बाई याचं भाषांतर करा. अर्जंट आहे. एअरवर घालवायचंय."