जंगल (२०१७)
आमच्या बाबांना survival story based सिनेमे आणि डॉक्युमेंटरीजची भारी आवड. बाबांजवळ बसून The Edge, The Poseidon Adventure सारखे कित्येक सिनेमे मी रात्री जागू जागू पाहिलेले. पुढचे २-४ दिवस त्यातले अस्वल किंवा भेसूर चेहरे स्वप्नात येऊन दचकवून परत जागरण घडवायचे तो भाग वेगळा. कितीही घाबरीफाईड झालं, तरी परत पुढचा सिनेमा बघायला मी मोठ्या उत्साहाने तयार असायचे. कारण बाबांच्या मागे लपून बसून तर बघायचे असायचे. तेव्हा सर्वांत सेफ जागा म्हणजे बाबांच्या मागे. तिकडे टीव्हीवर एखाद्या अस्वलाने किंवा मगरीने कोणावर तरी हल्ला करण्यासाठी आ.. केला की दुसरा आआआं.. माझा असायचा.