युरोप सहल मार्गदर्शन
नमस्कार लोक हो !
सध्या करोना आणि ओमिक्रोनचा धोका असुनही सगळे जग पुन्हा आपापले नित्याचे व्यवहार सुरु करण्याच्या मार्गी लागले आहेत.
या एप्रिल मे मध्ये सहकुटुंब युरोप सहल करण्याचा मानस आहे तेव्हा काय करावे यासाठी हा धागा.
ही वेळ (season) तिथे फिरण्यासाठी चांगली की सप्टें ते डिसेंबर हा काळ अधिक चांगला असतो? खरं तर हा प्रश्न विचारला की कोणती स्थळे तिकडे कोणत्या ऋतुत बघता येतात / बंद असतात ते कळावे म्हणुन.