✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

उबुंटू/लिनक्सवर गमभन प्रणाली वापरून मराठी लेखन कसे करावे?

उ
उपाशी बोका यांनी
Tue, 01/25/2022 - 11:42  ·  लेख
लेख
उबंटूवर ऑफलाइन (म्हणजे ब्राउजर न वापरता) मराठी लिहायचे असेल तर मला त्रास झाला आहे. iTrans (m17n) ही प्रणाली त्यातल्या त्यात "गमभन"च्या जवळ जाणारी आहे. बाकी इतर KaGaPa phonetic, inscript (m17n), phonetic (m17n)आणि हिंदी बोलनागरी वापरून मराठी लिहिणे खूपच कठीण आहे आणि पटपट लिहिणे तर जवळपास अशक्य आहे, विशेषतः मायबोली आणि मिसळपावसारखी "गमभन"ची सवय असेल तर. गमभन आता लिनक्सवर कसे आणायचे ते आता कळले आहे. त्याची माहिती पुढीलप्रमाणे. $cd /usr/share/m17n $sudo cp mr-itrans.mim mr-gamabhana.mim मग mr-gamabhana.mim ही फाइल एडिट करा. $sudo edit mr-gamabhana.mim (सूडो वापरणे महत्वाचे आहे. File must be owned by root.) महत्वाचे म्हणजे पुढील बदल हवेत. (पहिली ओळ ही फक्त कॉमेंट आहे) ;; mr-gamabhana.mim -- Marathi input method with ITRANS method (input-method mr gamabhana) तुम्हाला जमत नसेल तर मी माझी फाईल पाठवू शकेन. (अजून १००% टेस्ट केलेली नाही, पण बर्‍यापैकी बदल केले आहेत ते व्यवस्थित वाटले) नंतर रिबूट करा. सेटिंग्ज => रिजन्/लँग्वेज मध्ये जाऊन Marathi (gamabhana(m17n)) इंस्टॉल करा आणि मग LibreOffice Writer मध्ये लिहून बघा. ही माहिती उपयोगी पडेल असे वाटले, म्हणून इथे देत आहे. धन्यवाद.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
12329 वाचन

💬 प्रतिसाद (14)

प्रतिक्रिया

उपयुक्त माहिती

वामन देशमुख
Tue, 01/25/2022 - 13:22 नवीन
उपयुक्त माहिती.
उबंटूवर ऑफलाइन (म्हणजे ब्राउजर न वापरता) मराठी लिहायचे असेल तर मला त्रास झाला आहे.
धाग्याच्या मुख्य विषयाशी कदाचित विसंगत वाटणारा भाग पुढे लिहित आहे - मी शक्यतो ब्राउझर आधारित प्रणाल्या वापरतो. १. थोडेसे काही लिहायचे असेल तर गूगल इनपुट टूल्स - २. दीर्घ आणि एका बैठकीत ना होणारे लिखाण करायचे असेल तर गूगल डॉक (एकेकाळचा उबुंटू चाहता) वामन
  • Log in or register to post comments

चांगली माहिती आणि कृती

निनाद
Fri, 03/25/2022 - 08:55 नवीन
चांगली माहिती आणि तुम्हाला जमत नसेल तर मी माझी फाईल पाठवू शकेन. म्हणजे मार्ग काढून लगेच कृती करून शिवाय मदतीची तयारी केली हे खास आवडले आहे.
  • Log in or register to post comments

बघतो टाकून

गामा पैलवान
Fri, 03/25/2022 - 19:15 नवीन
उपाशी बोका, माझ्या कुबुण्टु कृतकयंत्रावर टाकून पहातो. धन्यवाद! :-) आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments

मराठी भाषा स्पेल चेकर हवा आहे.

शशिकांत ओक
गुरुवार, 06/16/2022 - 07:35 नवीन
मराठी भाषा स्पेल चेकर ची सुविधा ऑफिस सूट, गूगल ड्राईव्ह वर उपलब्ध आहे का?
  • Log in or register to post comments

मनोगत.कॉम

श्रीरंग_जोशी
Fri, 06/17/2022 - 01:06 नवीन
मनोगत.कॉमवरचा शुद्धीचिकित्सक या बाबतीत उपयुक्त आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शशिकांत ओक

येस . तो एक नंबर आहे .

अत्रुप्त आत्मा
Wed, 06/22/2022 - 10:47 नवीन
येस . तो एक नंबर आहे .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

जरा

कर्नलतपस्वी
Sat, 06/25/2022 - 19:53 नवीन
जरा उलगडून सांगता का! माझे मराठी लेखन खूप अशुद्ध आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

मनोगत.कॉम

श्रीरंग_जोशी
Sat, 06/25/2022 - 20:19 नवीन
मनोगत.कॉम हे २००४ साली सुरू झालेले व एकेकाळचे आघाडीचे मराठी संस्थळ आहे. मिपाचे संस्थापक व सुरुवातीच्या काळातले बहुतांश सक्रिय मिपाकर हे पूर्वीचे मनोगतीच होते. मनोगत.कॉमवर किमान १६-१७ वर्षांपासून ऑनलाईन शुद्धिचिकित्सक (स्पेलचेकर) उपलब्ध आहे. त्यासाठी मनोगतचे सदस्य असावे लागते. त्यावर सदस्य होण्याची प्रक्रिया मिपासारखीच आहे. माझ्यासह अनेक मिपाकर मिपावर लेख किंवा मोठ्या प्रतिक्रिया प्रकाशित करण्यापूर्वी त्या मनोगत.कॉम व टंकून व तिथल्या शुद्धिचिकित्सकाद्वारे तपासून व गरज असल्यास दुरुस्त्या करून इथे प्रकाशित करतात. तुम्ही तिथे सदस्यत्व घेऊन पहा. काही तांत्रिक अडचण आल्यास इथे लिहा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कर्नलतपस्वी

म्हणजे कुठे?

कंजूस
Sat, 06/25/2022 - 21:30 नवीन
मोठ्या प्रतिक्रिया प्रकाशित करण्यापूर्वी त्या मनोगत.कॉम व टंकून व तिथल्या शुद्धिचिकित्सकाद्वारे तपासून व गरज असल्यास दुरुस्त्या करून इथे प्रकाशित करतात. लेखन कुठे द्यायचे? कुणाला प्रतिसाद लिहायचा आणि पूर्वावलोकन करायचे? 'शुद्ध लेखन चिकित्सा' असे बटण येत नाही/ दिसत नाही./ त्याचा चौकोन सापडला नाही. (सभासद लॉगिन करून शोधले. )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

मला सहजपणे वापरता येतंय

श्रीरंग_जोशी
Sun, 06/26/2022 - 09:44 नवीन
मनोगतवर लॉगिन केल्यावर लेखन करावे पर्याय वापरल्यास मिपा सारखेच विविध प्रकारचे लेखन करता येत आहे. ते करताना टेक्स्ट एडिटरच्या वर ग म भ असे लिहिलेला व त्याखाली टिकमार्क चे चिन्ह असलेल्या आयकॉनवर क्लिक केल्यास शुद्धिचिकित्सक उघडत आहे. हाच पर्याय इतर कुणाच्या लेखनावर प्रतिक्रिया देतानाही उपलब्ध दिसत आहे. कदाचित तुमचे मनोगत सदस्यत्व अर्धवट असावे. हरकत नसल्यास कृपया नव्याने सदस्यत्वाचा अर्ज करुन पहा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

प्रॉब्लेम कळला.

कंजूस
Sun, 06/26/2022 - 11:02 नवीन
टेक्स्ट एडिटरच्यावर कोणतेही फॉरमँटिंग आईकॉन येत नाहीत. मोबाईल डेस्कटॉप पेज, सर्व ब्राउजर वापरून पाहिले. एकूण माझे शुद्ध मनोगत इतरांना सांगण्याचा योग दिसत नाही. शिवाय लेखांचे प्रतिसाद उघडलेले दिसत नाहीत ही मोठी उणीव आहे. मनोगतचे अपग्रेडेशन बरोबर झालेले नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

धन्यवाद

कर्नलतपस्वी
Sat, 06/25/2022 - 20:24 नवीन
त्वरीत प्रतीउत्तर दिल्याबद्दल आभार
  • Log in or register to post comments

लेखाचा विषय वेगळा आहे हे माहिती आहे.

कंजूस
Sun, 06/26/2022 - 20:32 नवीन
संगणक प्रणालीतील उबंटू मराठी टाइपिंग. अवांतर आहे पण मोबाईलवर नोटमध्ये लिहितो त्याची फाईल कशी बनवायची शोधताना दोन text editor Android apps सापडले होते. १) Text Editor plain notepad by the simple apps (( https://play.google.com/store/apps/details?id=dev.tuantv.android.texteditor )) २) QuickEdit text editor by Rhythm Software ((https://play.google.com/store/apps/details?id=com.rhmsoft.edit )) यांचे संगणक सॉफ्टवेर आहेत का माहिती नाही.
  • Log in or register to post comments

ऑफलाईन मराठी टायपींगसाठी अनेक

पाषाणभेद
गुरुवार, 07/07/2022 - 16:35 नवीन
ऑफलाईन मराठी टायपींगसाठी अनेक पद्धती आहेत. उपाशी बोकाने वर सांगितल्याप्रमाणे मिसळपावसारखी "गमभन"ची सवय असेल तर मराठी लिहिणे खूपच कठीण आहे आणि पटपट लिहिणे तर जवळपास अशक्य आहे. वरील धाग्यात बोकाने कळफलकचा कोड बदल केला असावा असे दिसते. मराठीबोला.कॉम च्या वेळी मराठी टायपींगसाठी मला असले अनेक प्रकार करावे लागले होते. तर मंडळी, मी त्यातल्या त्यात ऑफलाईन टाईप करण्यासाठी दोन सोप्या पद्धती कोणत्या ते आपण पाहू. तिसरी पद्धत ही मोबाईलवर टायपिंग करणे हे गमभनच्या जवळपास जाणारी प्रणाली आहे. त्यात "मराठी- अक्षरांतरण" हा कळफलक निवडल्यास तुम्ही मोबाईलमध्ये गमभनसारखे टाईप करू शकाल. फक्त अर्धा "र" म्हणजे वा"-या"ने सारखी अचूकता ज्यांना अपेक्षित आहे त्यांनी इग्नोर मारावे. (किंवा तो अर्धा र दुसरीकडून कॉपी पेस्ट करावा.) पद्धत १)... (मराठी टायपिंगचा बरेच जण कंटाळा करतात. ते सोपे आहे हे समजण्यासाठी निराळा धागा काढला आहे. तसेच त्या धागात एचटीएमल कोड असल्याने तो प्लेन टेक्स्ट मध्ये काढावा लागला. पुढील माहिती तेथे वाचावी.)
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा