युरोप सहल मार्गदर्शन

प्रमोद देर्देकर's picture
प्रमोद देर्देकर in भटकंती
29 Jan 2022 - 3:34 pm

नमस्कार लोक हो !

सध्या करोना आणि ओमिक्रोनचा धोका असुनही सगळे जग पुन्हा आपापले नित्याचे व्यवहार सुरु करण्याच्या मार्गी लागले आहेत.

या एप्रिल मे मध्ये सहकुटुंब युरोप सहल करण्याचा मानस आहे तेव्हा काय करावे यासाठी हा धागा.

ही वेळ (season) तिथे फिरण्यासाठी चांगली की सप्टें ते डिसेंबर हा काळ अधिक चांगला असतो? खरं तर हा प्रश्न विचारला की कोणती स्थळे तिकडे कोणत्या ऋतुत बघता येतात / बंद असतात ते कळावे म्हणुन.

सर्व प्रथम विमान प्रवास चालु आहे की नाही हे नक्की कसे कुठे पाहायचे आणि तिकीटाचे दर कसे ठरवयाचे, कोठे उतरायचे, हे सर्व कसं पार पडेल याची काळजी लागुन राहली आहे. कारण कोणती ही टुर कं.नी अजुन निटशी माहिती देत नाहीयेत.

अजुन दोन महिन्यांनी नक्की परिस्थीती कशी असेल हे काही सांगता येत नाहीये.

तसेच करोना मुळे बाहेर फिरायला जाणं हे जास्त धोकादायक आणि पहिल्या पेक्षा जास्त खर्चिक असणार की कसं? तुम्हाला काय वाटतंय?

की मी जाणं रद्द करावी आणि अजुन एक वर्ष वाट पहावी?

आग्रीम धन्यवाद.

प्रतिक्रिया

कंजूस's picture

29 Jan 2022 - 5:08 pm | कंजूस

अचानक युअरोप?

सरिता बांदेकर's picture

29 Jan 2022 - 5:32 pm | सरिता बांदेकर

तुमचा प्रश्न आहे टूर कधी करावी.
आम्ही सप्टेंबर एंड ते नोव्हेंबर मिड पर्यंत टूर केली.
त्यावेळी उन्हाळा कमी व्हायला लागतो आणि प्लिझंट ॲटमॅास्फीअर असतं.
आम्ही इकडून टूर कंपनीमधून न जाता तिकडच्या डे टूर केल्या.
कारण आम्हाला स्वत: फिरायचं होतं.
त्या टूरवाले आपल्याला ठिकाणावर घेऊन जातात आणि आपण फिरू शकतो.
म्हणजे मेट्रो, बस , ट्रेननी आपण लोकल टूर करू शकतो. थोडं ॲडव्ह्चर वाटतं. मजा येते.
पण आताच्या परिस्थितीबद्दल काही सांगू शकत नाही.
मी तुम्हाला पाहिजे तर डिटेल सांगू शकते.
आमचा अनुभव

युरोप मधे कोणत्या देशात जाताय?
प्रत्येक देशात कोविड संबन्धात वेगवेगळ्या पॉलीसी आहेत.

प्रमोद देर्देकर's picture

30 Jan 2022 - 7:47 pm | प्रमोद देर्देकर

हो कंकाका सध्या शरीराने कुरकुर चालू केलीये (कंबर (मणक्याचं दुखणं)आणि पाय जाम दुखत असते )तर म्हणत होतो हिंडता फिरता येईल तोवर जाऊन यावं.

सरिता तै तुमच्या सहलीचा एक बैजवार लेख लिहा म्हणजे किती खर्च आला कोणकोणती ठिकाण तुम्हाला पाहता आली ते समजेल.

विजुभाऊ शक्यतो फ्रांस, जर्मनी, इंग्लंड, स्पेन आणि इटली इथे जाण्याचा मानस आहे.

सर्वांना धन्यवाद.

युरोपविषयी मी पुष्कळ माहिती देऊ शकतो. कृपया खालील माहिती द्यावी:
१. कुटुंबात किती आणि काय काय वयाची मडळी आहेत ?
२. त्यांच्या आवडी-निवडींविषयी. युरोप फिरायचे ते मुख्यतः तिकडल्या सांस्कृतिक गोष्टी: उदा. चित्र-मूर्ती-वास्तु कला, नगररचना, ऐतिहासिक स्थळे आणि विविध संग्रहालये हे सर्व बघण्यासाठी. याची आवड कुटुंबातील सर्वांनाच नसेल तर काय करायचे याची स्पष्ट कल्पना आधीच असली पाहिजे नाहीतर नुसती वणवण होऊन कुणाचेच समाधान होत नाही, आणि लाखो रुपये खर्चून नुस्ते दररोज पिज्झा वगैरे खाऊन तब्येत बिघडवून घेणे आणि अनावश्यक वस्तूंची खरेदी करणे हेच पदरात पडून निराशा येण्याची शक्यता असते. त्यातून हल्ली कोवीड वगैरेतील धोका आहेच. त्या दृष्टीने सध्या प्रवास टाळणे बरे. कदाचित प्रत्येक विमानतळावर कोविड चाचणी करावी लागू शकते आणि कुटुंबातील एकादा पॉझिटिव निघाला तर फारच पंचाईत होऊ शकते.
३. एकून किती दिवसांची यात्रा करण्याची इच्छा आहे आणि एकूण बजेट किती आहे.
४. कुटुंबातील किती मंडळी शाकाहारी आणि मासाहारी आहेत.
५. भरपूर पायी चालण्याची (दररोज सुमारे सहा-सात तास) क्षमता सर्वांची आहे किंवा कसे.
एवढे मुद्दे स्पष्ट झाले की एयर बी एन बी वा तत्सम संस्थळांवर रहाण्याच्या जागा सर्चून खर्चाचा अंदाज घेणे वगैरे सुरू करता येईल. खूप विविध देश आणि शहरे लगबगीने धवपळ करत बघण्यापेक्षा कमी जागा निवांतपणे फिरणे बरे.
चौकट राजा यांनी स्वतः योजना आखून युरोप सफर केली होती त्यांच लेख वाचलाच असेल. .

कंजूस's picture

31 Jan 2022 - 6:55 am | कंजूस

विशेष आवड असेल तर तै एक देश/ ठिकाण पाहावं.

ग्रीसची माहिती असलेला धागा आहे का? मेच्या पहिल्या आठवडयात जाण्याचा मानस आहे

चौथा कोनाडा's picture

16 Feb 2022 - 5:33 pm | चौथा कोनाडा

सफर ग्रीसची : http://www.misalpav.com/node/36105

सौन्दर्य's picture

3 Feb 2022 - 4:04 am | सौन्दर्य

ही जाहिरात नाही. आम्ही दोन मित्र सहकुटुंब वीणा टूर्स तर्फे २०१८ला १० दिवसांसाठी युरोप फिरून आलो. एकूण व्यवस्था चांगली होती.

आता सगळं बदललं आहे ना जगात.