ध्रांगध्रा - ११

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in जनातलं, मनातलं
12 Jan 2022 - 10:14 pm

काही का असेना शिवासाठी काम झालंय हे महत्वाचं. मंदीर आहे हे निश्चित झाले. आणि तिथे कस्म जायचं ते समजलंय . या क्षणी आम्हाला या पेक्षा कसलीच माहिती नको आहे.
त्या माणसाला तिथेच सोडून आम्ही उजवी कडची वाट धरतो
मागील दुवा ध्रांगध्रा-१० http://misalpav.com/node/49772
"बघ काम झालं आपलं. आता थोडाच वेळ. ते देऊळ पाहू." देऊळ कुठे आहे ते समजल्यामुळे महेश खुशीत आलाय.
" गंमत आहे ना... या गावची. सकाळपासून भेटलेल्या सगळ्या माणसांचे चेहरे अगदी एकसारखे. हुबेहुब. कसलं भारी ना" शिवा खुशीत आल्यामुळे माझ्याही डोक्यावरचे टेन्शन थोडे कमी झालंय.
" त्याचं काय असेल.... ते सगळे जण एकाच घरातील असतील.एकाच घरातल्या लोकांचे चेहरे सारखे असू शकतात" शिवा तर्क शास्त्र सोडत नाही.
" अरे पण मघाशी नवरा बायको भेटले होते ते.....त्यांचेही चेहरे एकसारखे ? भावंडांचे चेहरी एकसारखे समजू शकतो. पण नवराबायकोचे ही चेहरे एकसारखे? "
खरंंच की हे लक्ष्यातच आलं नाही. नवराबायकोचे चेहरे एकसारखे होते. .....बरोबर रे. पण मग ते नवराबायको नसतील. बहीण भाऊ असू शकतील की" महेशचा हा बिनतोड मुद्दा मला खोडता येत नाही.
" धमाल ....काय मजा येत असेल नाही.त्या सगळ्यांचे चेहरे सारखे. म्हणजे बघ जुळ्या मुलांमुळे गोंधळ उडतात. हे ना त्यापेक्षाही धमाल. आपल्या वर्गात मनीष आणि शिरीष होते ना जुळे. मास्तरांची जाम मजा यायची दंगा मनीष ने केलेला असायचा. शिक्षा शिरीष ला मिळायची. दिसायला कसले एक सारखे होते ते. आपण सगळेच फसायचो. मला वाटते त्यांचे आई वडील सोडले तर इतर कोणालाच त्याच्यातला शिरीष कोण आणि मनीष कोण हे नकी सांगता येत नसेल." महेश सांगत होता. माझ्या डोळ्यासमोर जुळ्यांच्या एका जोडीने उडणारा गोंधळ उभा राहीला. ते दोघेच होते. इथे आख्खं गाव तसं आहे.
"म्हणजे बघ महेश समजा . समजा हं आख्खं गाव एकाच चेहेर्‍याचं असेल तर कोण कोणाच्या घरातल आहे हे कसं समजणार! कोणाशी मैत्री केली आहे आणि कोणाशी मारामारी केली ते कसं कळणार! " माझ्या मनात चक्र सुरु झालं.
अरे ते सोड आपण जिच्यावर लाईन मारतो ती हीच हे कसं ठरवणार. आणि भाजी मंडईत इकडे तिकडे झाले तर आपला नवरा कुठला हे सोबत आलेल्या बाईने ओळखायचे कसे?....... डॉक्टर कोण आणि पेशंट कोण हे नर्स ने कसे ठरवायचे. हॉटेलात कुठल्या गिर्‍हाईकाने काय ऑर्डर केले हे वेटरला कसे कळणार?
" बास बास बास शिवा....... माझं तर्कशास्त्र संपलं." महेश कपाळाला हात लावून हसतोय. त्याचं हसू बघून मलाही हसू आवरत नाही.मी पोट धरून हसतोय.
रस्त्याला आता माणसे दिसायला लागलीत. चालताना. इकडे तिकडे जाताना. एकटी दुकटी तर काही तीनचारच्या घोळक्यात.काहींच्या हातात रिकाम्या टोपल्या. कुणाच्या डोक्यावर गवताचा भारा. पुरूष पायजमा शर्ट, स्त्रीया हिरव्या लाल तपकिरी अशा गडद रंगाचे लुगडे नेसलेल्या. लहान मुले हाप चड्डी शर्ट मुली परकरपोलके नेसलेल्या. त्या सगळ्यात अंगावरची जीन्स हाप शर्ट कॅप यामुळे आम्ही वेगळेच जाणवतोय. अजूनतरी लोकांचे लक्ष्य आमच्या कडे गेलेले नाहीये. ते आपल्याच नादात आहेत.
मघाच्या प्रसंगामुळे आम्ही अजाणतेपणी दिसणार्‍या प्रत्येकाचे चेहरे न्याहाळतोय. खरंच विश्वास बसत नाही.पण प्रत्येकाचा चेहेरा हुबेहूब दुसर्‍या सारखा. त्या झेले आण्णां सारखा. वयाचा काय फरक असेल तेवढाच. झेलेआणांचा आयुष्यभर काढलेल्या फोटोंचा जिवंत अल्बंम बघतोय असंच वाटतय
समोरून तीन मुली येताहेत. तिघींचे चेहरे अगदी एकसारखे.
मी महेशकडे पहातो. तो माझ्याचकडे पहातोय. आम्हाला पुन्हा एकदा हसू फुटतं. अक्षरशः गडाबडा लोळत हसावं इतकं. आमच्या हसण्यामुळे लोकांचे लक्ष्य आमच्याकदे जातं. अगोदर जाह्ले तसेच. आम्हाला पहाणारा प्रत्येकजण दचकतो. आणि आमच्यापासून वेगाने दूर जातो. धावत चालल्यासारखा.भरलेला गजबलेला रस्ता अवघ्या दोनतीन मिनीटात रिकामा झालाय. लोक काही वेगळे वागत आहेत हे आम्हाला जाणवतंच नाही. बरं आहे म्हणा एका अर्थाने. पुढे काय होणार आहे या बद्दल आम्ही अज्ञान आहोत.
आम्ही एकसारख्या दिसणार्‍या माणसांमुळे काय गमती होत असतील याच्याच गप्पात मशगुल आहोत. शाळेत अशीही गणवेशामुळॅ मुलं सारखी दिसतात. इतकी की त्यांना न्यायला आलेल्या पालकांचा गोंधळ उडतो.मुलेच आपल्या पालकांना शोधत त्यांच्या जवळ जाऊन उभी रहातात. पण एखाद्याची प्रेयसी आणि तीची मैत्रीण , बहीण या सारखाच दिसत असतील आणि एकाच वेळी त्या सगळ्या समोरून येत असतील तर काय धमाल उडत असेल ना. आणि तशीच मजा एखाद्या मुलीचा प्रियकर , त्याचा भाऊ काका मित्र समोरून आले तर? लग्नात मानपान करताना गोंधळ उडत असेल. मानपान जाऊ देत. नवरा नवरीला आपण ज्याला हार घालायचा तो नक्की कोण हे ठरवता येत नसेल.
हे सगळे इमॅजीन करणेही खूप धमाल आहे. त्या सगळ्या गोंधळावर एखादी कार्टून सिरीयल तयार होईल. मला कल्पनांवर कल्पना सुचताहेत. समजा कॉलेजची पिकनीक गेली किंवा काही मित्र फॅमिलीसह कुठे फिरायला गेले तर कोण भाविजी कोण वहिनी हेच समजणार नाही. यांच्या घरात एक पासपोर्ट असेल तरी भागेल.
आम्ही हसत खिदळत चाललोय. आसपासची वस्ती विरळ होतेय. जवळजवळ गावाबाहेर आलोय. समोर एक मोकळं माळरान आहे.
" अरे कुठे गेलं मंदीर.....! त्या पानटपरीवाल्याने दाखवलं तसं इथेच असायला हवे मंदीर. त्यानं आपल्याला थाप मारली." समोर काहीच दिसत नाही. महेशला धक्का बसलाय.
" तसं नसेल रे. तो बघ तो एक उंचवटा दिसतोय का. तिथपर्यंत जाऊन पाहूया कदाचित पुढे कुठेतरी असेल. माझ्या बोलण्यावर शिवा काहीच व्यक्त होत नाही. तो त्यां उंचवट्याच्या दिशेने जाउ लागतो. उअम्चवटा म्हणजे उगंच डोंगराला घडी पडलेली असावी तसा थोडा वर आलेला भाग आहे. त्याच्या पलीकडे काही नसावं असं वाटतय. महेश तिथे पोहोचला सुद्धा.
" शिवा. शिवा. अरे हे बघ. इकडे बघ. हे काय आहे" महेश उत्सूकतेने ओरडतोय. उत्सूकता की काय समजत नाही. पण ती तीस पावले मी धावत जातो. डोंगराला वळ्या पडाव्या तसं वर आलेलं ते टेकाड गाठतो.महेश मला हात करून दाखवतो.
डोळ्यावर विश्वास बसत नाहीये
क्रमशः

कथाविरंगुळा

प्रतिक्रिया

चौथा कोनाडा's picture

12 Jan 2022 - 10:21 pm | चौथा कोनाडा

आख्खा गाव झेलेअण्णासारखा, सगळ्यांचे चेहरे शेम टू शेम !
बाबौ, आता काय होणार ? वळ्या वाल्या टेकाडावरून काय दिसणार ?
उत्सुकता वाढत चाललीय !
|| पु भा प्र ||

शित्रेउमेश's picture

13 Jan 2022 - 10:12 am | शित्रेउमेश

जाम भारी.....

श्वेता२४'s picture

13 Jan 2022 - 3:43 pm | श्वेता२४

पु.भा.प्र.

विजुभाऊ's picture

14 Jan 2022 - 8:23 pm | विजुभाऊ

पुढील भाग
ध्रांगध्रा - १२ http://misalpav.com/node/49783