वंडर वूमन आणि ग्रीक पुराणातील व्यक्तिरेखा!

निमिष सोनार's picture
निमिष सोनार in जनातलं, मनातलं
8 Nov 2021 - 10:57 am

मार्वल कॉमिक्स किंवा डीसी कॉमिक्स असो, ते त्यांच्या सुपरहीरो चित्रपटांमध्ये ग्रीक पौराणिक कथांचा स्मार्ट वापर करतात. मार्व्हलच्या थॉर प्रमाणेच, डीसीने वंडर वुमन सुपरहीरो तयार करण्यासाठी झ्यूस आणि एरेस या ग्रीक देवतांच्या कथेचा वापर केला.

मार्वलमध्ये कॅप्टन अमेरिका हा सुपरहिरो आहे ज्याचा संदर्भ इतिहासातील युद्धामध्ये आहे आणि तसेच काहीसे वंडर वूमनमध्ये पण आहे. परंतु तरीही दोन्ही व्यक्तिरेखा तोडीच्या आहेत आणि दोन्ही कथेत एकमेकांची कोणतीही कॉपी नाही (ढाल आणि सैनिकांचे आयुष्य किंवा ताकद वाढवणे यासारखे वैज्ञानिक प्रयोग वगळता!)

चित्रपटआस्वादसमीक्षा

स्पायडरमॅन: घरचा, घरापासून दूरचा आणि घरचा रस्ता हरवलेला!

निमिष सोनार's picture
निमिष सोनार in जनातलं, मनातलं
8 Nov 2021 - 10:42 am

"अवेंजर्स" या अमेरिकन सुपरहिरो चित्रपट सिरीजला पुढे नेणाऱ्या 2019 साली आलेल्या "स्पायडरमॅन: फार फ्रॉम होम" या चित्रपटात पीटर पार्कर युरोपमध्ये सहलीवर जातो तेव्हा व्हेनिसमध्ये एका वॉटर मॅनचा हल्ला होतो तेव्हा चेहऱ्याऐवजी जादूचा गोळा असणारा कुणीतरी (मिस्टेरिओ) त्याच्यावर हिरवा गॅस सोडून कंट्रोल करतो. 2011 साली मी लिहिलेल्या जलजीवा कादंबरीत असलेले जलजीवा मला आठवले. या चित्रपटात त्या पाणी मानवांना इलेमेंटल्स म्हटले आहे. माझ्या कादंबरीतील जलजीवा पण असेच आहेत फक्त त्यांची व्युत्पत्ती वेगळ्या पद्धतीने होते. असो. मूळ चित्रपटाकडे वळू.

चित्रपटआस्वादसमीक्षा

तेजस्विनी दिवाळी

निमिष सोनार's picture
निमिष सोनार in जे न देखे रवी...
8 Nov 2021 - 10:37 am

प्रकाशमान प्रसन्न सकाळी...
लक्ष लक्ष दिव्यांच्या ओळी...
आसमंत सारा लख्ख उजळी!

घेऊनी सौभाग्य मानवजातीच्या कपाळी...
दूर सारूनी संकटाची छाया कभिन्न काळी!

हटवूनी निराशेची भेसूर काजळी...
मनासी देई आकांक्षेची झळाळी!

साजरी करूया...
आशेची, समृद्धीची, आरोग्याची...
संपन्नतेची, मानवतेची, प्रगतीची...
संकटनाशिनी दिवाळी!
तेजोमयी दिवाळी!!
तेजस्विनी दिवाळी!!!

- निमिष सोनार, पुणे

कविता

मिपाकट्टा@नाशिक ०७/११/२०२१

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जनातलं, मनातलं
7 Nov 2021 - 10:33 pm

मिपाकट्टा@नाशिक ०७/११/२०२१

आज दिनांक 07/11/2021, रविवार, नाशिक मध्ये मिपाकरांची छोटी भेट (मीनी कट्टा) आयोजित केला गेला. त्याचा हा वृतांत.

आपणास माहित असेलच की मिपाकर नाशिककरांनी गेल्याच महिन्यात मिपाकट्टा@नाशिक ०३/१०/२०२१ साजरा केला होता.

समाजजीवनमानप्रवासविचारबातमीअनुभवविरंगुळा

गाथा

अनन्त्_यात्री's picture
अनन्त्_यात्री in जे न देखे रवी...
7 Nov 2021 - 12:10 pm

तुकारामाच्या गाथेने
जेव्हा पछाडले मला
तेव्हा ज्ञानोबा नावाचा
एक मांत्रिक शोधला

भ्रम रिंगण तोडून
ज्ञानोबाने केली शर्थ
कानामध्ये सांगितला
गहनाचा गूढ अर्थ

त्याची बहीण मुक्ताई
सार्‍या मांत्रिकांची माय
सूर्य गिळण्या ही मुंगी
नभ उल्लंघून जाय

"गाथा बुडवून टाक"
मला मुक्ताई दटावे
गाथा तरंगून येते
अंतर्यामी तिला ठावे

गाथा रक्तात भिनते
गाथा वज्रलेप होते
शब्द रोकडे बोलत
पुन्हा पुन्हा पछाडते

मुक्त कविताकविता

विवेकाच्या वाती

चंद्रकांत's picture
चंद्रकांत in जनातलं, मनातलं
6 Nov 2021 - 10:06 pm

आयुष्य नावाच्या वर्तुळाभोवती प्रदक्षिणा घडत असतात. कोणत्याही जिवांच्या जगण्याची तऱ्हा याहून वेगळी नसते. ते काही नियतीचं देणं नसतं, तर निसर्गाने आखून दिलेला नियत मार्ग असतो. श्वासांची स्पंदने सुरात सुरू असली की, जगण्याचा सूर सापडतो. सूर सापडला की आयुष्याचा नूरही बदलतो. इहतली जीवनयापन करणाऱ्या प्रत्येकाच्या विस्ताराच्या परिभाषा वेगळ्या असतात. परिमाणे निराळे असतात, तसे परिणामही. विस्ताराचे सम्यक अर्थ सगळ्यांना अवगत असतीलच असं नाही. काही गोष्टी आपल्याभोवती संदेहांचं धुकं घेऊन असतात हेच खरं. विचारांतून विस्तारच हरवला असेल तर लांबीरुंदीच्या व्याख्या केवळ पुस्तकापुरत्या उरतात.

समाजविचारलेख

वात्तड चकली (खरेच) कशी बनवावी?

माहितगार's picture
माहितगार in पाककृती
4 Nov 2021 - 11:05 am

'शेळी जाते जिवानिशी आणि खाणारा म्हणतो वात्तड कशी?' म्हण सुपरिचित आहेच. मेमे व्हायरल करणार्‍यांचे म्हणी बनवणारे पुर्वज असावेत कि काय अशी शक्यता वाटते. या म्हणी वापरण्यास सुलभ असल्यातरी बनवणे आणि व्हायरल करण्याचे कौशल्य सोपे नसावे. 'जाणारा जातो जिवानिशी आणि मास्क न वापरणारा म्हणतो मास्क कशाला' अशी म्हण जाणिव पुर्वक बनवली तरी व्हायरल करणे कठीणच.

दिवाळी विशेष लेख- बोगी-वोगी रेस्टॉरंट

पराग१२२६३'s picture
पराग१२२६३ in जनातलं, मनातलं
4 Nov 2021 - 8:01 am

अगदी काही दिवसांपूर्वीच मुंबईला गेलो असताना तिथे एका नव्या रेस्टॉरंटमध्ये जाऊन पदार्थ चाखण्याचा आनंद घेता आला. यंदाच्या दिवाळीच्या निमित्ताने मुंबईतील त्याच माझ्या वेगळ्या अनुभवाविषयी...

शाकाहारीआस्वादसमीक्षालेखबातमीअनुभवविरंगुळा

आवाज बंद सोसायटी - भाग ५

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जनातलं, मनातलं
4 Nov 2021 - 6:43 am
समाजजीवनमानप्रकटनलेखमाहितीआरोग्य

आठवणीतील दिवाळी !

kvponkshe's picture
kvponkshe in जनातलं, मनातलं
3 Nov 2021 - 10:44 pm

आठवणीतील दिवाळी !
दिवाळी म्हणजे सणांचा राजा !
२१ दिवस सुट्टी, फराळ , फटाके , भरपूर क्रिकेट ... आम्हा बाळ गोपाळांसाठी पर्वणीच !

कलाप्रकटन