नशीब - भाग १
कावेरी एक खेडेगावात राहणारी सामान्य मुलगी, वयात आलेली, गहुवर्णी, मैत्रीणीसारखा कुणी राजकुमार शहरातुन यावा आणि आपल्याला त्याच्या राजमहालात घेउन जावा अशी स्वप्न बाळगणारी. मागे तीन बहीणींचा गोतावळा असलेली. कावेरीचं शिक्षण दहावीपर्यंत झालं होतं, त्यानंतर ती आईला घरकामात मदत करत होती. वडील शेती करत होते तसेच त्यांनी थोड्या जागेत पालेभाज्या लावल्या होत्या, ते गावात विकण्याचे काम कावेरी बरेचदा करत असे.