विरंगुळा

चेनै (मद्रास) मध्ये किंवा १५-२० किमीच्या आसपास कुणी मिपाकर आहेत का?

मुक्त विहारि's picture
मुक्त विहारि in जनातलं, मनातलं
2 Jul 2015 - 11:24 pm

प्रिय मिपाकरांनो,

बहुदा पुढच्या आठवड्यापासून , कदाचित सोमवारपासून, मी चेनै (मद्रास) येथे काही कामा निमीत्त जाणार आहे.

मुळात आमही कट्टेकरी, त्यामुळे जिथे जावू तिथे आम्ही "मिपाकर" शोधतो आणि कट्टा करतो.

आत्ता पर्यंत आम्ही बरेच कट्टे केले.

पार अगदी दुबई पासून ते थेट कळवा व्हाया जिजामाता उद्यान.

यान्बूत तर बरेच कट्टे केले.

ते असो.

तर एखादा कट्टा चेनैत पण करायचा विचार आहे.(काम तो सिर्फ बहाना हय.)

कळावे,

लोभ आहेच तो चेनैच्या कट्ट्याच्या निमित्ताने वाढावा ही चेनैच्या मिपाकरांना विनंती.

मौजमजाविरंगुळा

माझं करीयर मार्गदर्शन (!)

चिनार's picture
चिनार in जनातलं, मनातलं
1 Jul 2015 - 5:27 pm

परवाच एक नात्यातला मुलगा भेटला. त्याने नुकतेच इंजिनियरिंग पूर्ण केले होते. भारतीय परंपरेप्रमाणे इंजिनियर झाल्यावर तो पुढे आयुष्यात आपण काय करायच ह्याचा विचार करत होता. बऱ्याच मुलांना इंजिनियरिंग हे आपलं क्षेत्र नाही ही जाणीव शेवटल्या वर्षपर्यन्त होते. पण इथपर्यन्त आलोच आहे तर शेवट बघूनच घेऊ, या विचाराने ते पदवी पूर्ण करतात. कारण इंजिनियरिंग हे मुंबई लोकलच्या गर्दीसारखं असते. लोकल मध्ये चढणं हेच एक आव्हान आहे. आणि एकदा चढलं की नक्की कुठे उतरायचं हे माहिती नसलं तरी आसपासची गर्दी आपल्याला तिथे उतरवतेच. मग स्टेशनचं नाव वाचल्यावर आपण चुकीच्या ठिकाणी आलो हे लक्षात येते.

मुक्तकविरंगुळा

“मिपा वाचकांनो थोडीतरी खाज बाळगा!

नाखु's picture
नाखु in जनातलं, मनातलं
30 Jun 2015 - 10:37 am

नेतागिरी नेते मा. यशवंतराव चव्हाणांचा राजकीय वारसदारचा उदय होण्यापूर्वी म्हणजे १८ जुलै १९७६ पूर्वी नेता पित्त्यांची संघटनाच अस्तित्वात नव्हती. "कुत्र्याची शेपटी सरळ होईल पण नेता पित्त्यांची संघटना होणार नाही" असे त्या काळी म्हटले जायचे. पण या राष्ट्रीय धुरंधर नेत्याने गाव-गुंड पुंडांच्या पाठीवर हात ठेवला आणि चमत्कार झाला. हजारो वर्षापासूनचा कायद्याला घाबरणारा नेता समाज गावात सोडलेल्या बेफाम वळूसारखा उधळू लागला. नुसताच उधळू लागला नाही तर साध्या पोलिसाला भिणारा नेता चक्क मूठ आवळून त्यालाच दिमतीला बोलावू लागला. विधायक विचारवंतांशी दोन हात करायला सज्ज झाला.

बालकथासमाजप्रतिक्रियासमीक्षाविरंगुळा

गुरुजिंचे भावं विश्व! भाग- ४९

अत्रुप्त आत्मा's picture
अत्रुप्त आत्मा in जनातलं, मनातलं
28 Jun 2015 - 7:19 pm

मागिल भाग..
मग मि ही फार विरोध न करता , 'एकदा आणू हिला आणि पोरांना त्या महाराजाच्या मांडवाखालून . मी असल्यावर करणार काय तो लबाडी? अहो महाराज असला ,तरी आमच्याच शेजारच्या मांडवातला..सांगुन सांगुन सांगेल काय??'...असा विचार करुन हिच्या आणि मामा गोडश्याच्या सह जायला तयार झालो....
पुढे चालू...
=========================

संस्कृतीसमाजजीवनमानविरंगुळा

मला आवडलेले संगीतकार :- ६ हंसराज बेहल

शशांक कोणो's picture
शशांक कोणो in जनातलं, मनातलं
25 Jun 2015 - 9:26 am
कलासंगीतसमाजजीवनमानचित्रपटप्रकटनआस्वादसमीक्षामाध्यमवेधलेखमाहितीसंदर्भप्रतिभाविरंगुळा

गुरुजिंचे भावं विश्व! भाग- ४८

अत्रुप्त आत्मा's picture
अत्रुप्त आत्मा in जनातलं, मनातलं
24 Jun 2015 - 9:56 pm

मागिल भाग..
असं म्हणून काका त्या आनंदाश्रूंसह बाजेवरून उठून माझ्यापाशी आला... आणि माझ्या पाठीवर थोपटत लहान मुलासारखं मला झोपवून..,शांत मनानी स्वतःही निद्रीस्त झाला.
पुढे चालू...
==========================

संस्कृतीसमाजविरंगुळा

(खरा) इनर पीस

टवाळ कार्टा's picture
टवाळ कार्टा in जनातलं, मनातलं
23 Jun 2015 - 1:08 pm

आम्ची पेर्णा - http://www.misalpav.com/node/31745
कमुंची माफी मागून
--------------------------------------------------------------------------------------------

"तुला निवड करावीच लागेल, हे शेवटचं सांगतोय" त्याच्या पोटाच्या घेराने कच्चकन आवळून सांगितलं आणि टीव्हीवर "ये तो बडा टॉइंग है" बघत असलेल्या त्याला इलॅस्टिक काचत गेली. तो सुन्न होऊन स्वतःच्या पोटाकडेच पाहत होता.

वावरविडंबनविनोदमौजमजाअनुभवविरंगुळा

हे हृदय कसे बापाचे......!

शिव कन्या's picture
शिव कन्या in जनातलं, मनातलं
20 Jun 2015 - 5:32 pm

(उद्या जगभरात माणसांच्या दुनियेत Father’s Day साजरा होईल. पण पक्ष्यांच्या मुक्त जगातला हा रोजचा Father’s Day वाचकांसाठी....)

मांडणीवावरसंस्कृतीसमाजजीवनमानराहणीभूगोलविज्ञानप्रकटनप्रतिसादसद्भावनाशुभेच्छाअभिनंदनप्रतिक्रियाआस्वादमाध्यमवेधलेखसंदर्भविरंगुळा

१३ जून

भाते's picture
भाते in जनातलं, मनातलं
12 Jun 2015 - 12:33 pm

शाळेचा पहिला दिवस!

तीच ती शाळा, तीच ती शाळेची इमारत, तेच शिक्षक आणि तेच सवंगडी. सारे काही तेच असुनसुध्दा पुन्हा एकदा नविन वाटणारे!

नविन कपडे, नविन दप्तर, नविन वह्यापुस्तके, आणि नविन वर्ग शिक्षक/शिक्षिका!

शाळेचे रम्य दिवस!

मार्च महिन्यात कधीतरी (एकदाची) परीक्षा संपल्यावर लागलेली सुट्टी. एप्रिल महिन्यात परीक्षेचा आणि आमचाही लागलेला निकाल! मग खऱ्या अर्थाने सुट्टी सुरु!

उन्हाळी शिबिर, केबल टिव्ही, मोबाईल, इंटरनेट, इ-मेल, फेसबुक, व्हॉट्स अॅ्प हे काहिही नसताना अनुभवलेले ते रम्य दिवस.

मुक्तकविरंगुळा