शाळेचा पहिला दिवस!
तीच ती शाळा, तीच ती शाळेची इमारत, तेच शिक्षक आणि तेच सवंगडी. सारे काही तेच असुनसुध्दा पुन्हा एकदा नविन वाटणारे!
नविन कपडे, नविन दप्तर, नविन वह्यापुस्तके, आणि नविन वर्ग शिक्षक/शिक्षिका!
शाळेचे रम्य दिवस!
मार्च महिन्यात कधीतरी (एकदाची) परीक्षा संपल्यावर लागलेली सुट्टी. एप्रिल महिन्यात परीक्षेचा आणि आमचाही लागलेला निकाल! मग खऱ्या अर्थाने सुट्टी सुरु!
उन्हाळी शिबिर, केबल टिव्ही, मोबाईल, इंटरनेट, इ-मेल, फेसबुक, व्हॉट्स अॅ्प हे काहिही नसताना अनुभवलेले ते रम्य दिवस.
सकाळी जाग येईल तेव्हा उठायचे. मग खादाडी करून (भर उन्हात) सायकलवर टांग मारून, आईचा ओरडा खाऊन, मनसोक्त भटकायचे. घरी आल्यावर फ्रिजमधले थंडगार पाणी आणि पुन्हा एकदा आईचा ओरडा.
दिवसभर मनसोक्त खाल्लेले आंबे. जेवण झाल्यावर, दुपारची झोप? माहितच नाही! दुपारी, बैठे खेळ. पत्ते, कॅरम खेळत केलेली धमाल आणि मारलेल्या मनसोक्त गप्पा, भुताच्या गोष्टी!
संध्याकाळी पुन्हा एकदा धम्माल! डबाइसपाइस, लगोरी, लपंडाव, नाहीतर (अंडरआर्म) क्रिकेट! वाइड बॉल, नो बॉल, रन आऊट… काय असत हे! माहित नाही. आणि एक टप्पा आऊट!
मग रात्री जेवण झाल्यावर वाचन! (दुपारचे खेळ खेळुन झाल्यावर, संध्याकाळी हुंदडायच्या आधी) वाचनालयातुन आणलेली पुस्तक! कुठलीही, कोणाचीही. (चांदोबा, चंपक, फा.फे. पासुन ते अगदी पु.ल.… वि.वा. पर्यंत)
एखादी भयकथा किंवा गुढकथा असेल तर रात्री उशिरापर्यंत केलेले वाचन आणि घरच्यांचा ओरडा, झोप आता!
सायकलवरून पडुन कितीही खरचटले, लागले तरीही, माघार अजिबात नाही!
सुट्टीत केलेली हि सगळी गंमत आणि धमाल शाळेच्या पहिल्याच दिवशी मित्रांना सांगायची धडपड आणि अर्थातच शिक्षकांचा ओरडा आणि शिक्षा.
संध्याकाळ जवळ आली की माझं असं होतं… तुझी आठवण दाटून येते आणि मन पिसं होतं
सांज गारवा मधली मिलिंद इंगळेची वाक्य.
२० वर्ष झाली शाळा सोडुन… तरीही,
१३ जुन तारिख आली कि माझं अस होतं… जुन्या आठवणी दाटुन येतात आणि…
डोळ्यात टचकन पाणी येतं.
प्रतिक्रिया
12 Jun 2015 - 12:49 pm | गणेशा
मस्त .. असच होत... जून महिना म्हंटले की शाळेची आठवण हमखास येतेच ... तो नविन वर्ग.. सर्व मित्रांना पुन्हा भेटण्याची ओढ.. मराठीचय पुस्तकातील शेवटच्या कडील कुठला तरी धडा .. किंवा कविता वाचुन पण छान वाटते..
हे सगळे नविन ... त्यात पुन्हा पाऊसाची रिमझिम .... ते शाळेत जाताना लागणारे महादेवाचे मंदिर.. शाळेच्या पटंगणात पुन्हा आपारपी खेळण्याची सुरुवात.. वा वा.. काय काय आठवुन जाते ना ...
जून आणि नोव्हेंबर हे माझे वर्षातील सर्वात आवडते महिने आहेत.. खास असे..
12 Jun 2015 - 6:27 pm | एक एकटा एकटाच
अगदी मनातलं बोललात
12 Jun 2015 - 7:03 pm | अत्रुप्त आत्मा
डिक्टो!
12 Jun 2015 - 7:11 pm | मुक्त विहारि
सहमत
12 Jun 2015 - 7:20 pm | जेपी
+15
12 Jun 2015 - 8:10 pm | जुइ
रम्य त्या जून महिन्यातील शाळेच्या आठवणी. नवीन वह्या पुस्तकांचा वास खूप छान येतो
.