अनाहिता इन रसायनी

मितान's picture
मितान in जनातलं, मनातलं
20 Apr 2015 - 7:25 pm

मागचा कट्टा होऊन तीन चार महिने होऊन गेले. सर्व अनाहितांना पुन्हा भेटण्याचे वेध लागले. मग प्रस्ताव आला. निमंत्रक मुंबईकर अनाहिता. चर्चा झाल्या. ठिकाणं चाळली गेली. तारखांसाठी पानं फडफडवून झाली. कुठून कोण कोण येणार याची यादी झाली. आणि शेवटी कट्टा ठरला. बहारीनहून विशाखाताई आणि जर्मनीहून स्वातीताई याच काळात पुणे मुंबईत येणार होत्या. त्या दोघींनीही यायचं नक्की केलं. उत्साह अजून वाढला. ठिकाणाच्या बाबतीत अजून गोंधळ होते. त्या चर्चांचा कंटाळा येऊन अजयाने तिचं घर हे ठिकाण फायनल केलं !
आणि काउंटडाऊन सुरू झाला. तेवढ्यात ते मेलं अनाहिता बंद पडलं. मग कसंकाय वर भागवलं. तिथल्या ग्रुपवर, व्यनि तून संपर्कात राहिलो. पहिली यादी २० जणींची होती. प्रत्यक्षात काही ना काही अडचणी येऊन १६ जणी भेटलो.
हा आमचा पुणेकर अनाहितांचा वृत्तांत...

तर पुण्यातून मी, त्रिवेणी, मीता, सुचेता, मोनू आणि विशाखाताई असं जायचं ठरलं. शाळांच्या सुट्या असल्याने यष्टीला गर्दी होती. उगाच घोळ नको म्हणून निघताना आपापल्या ठिकाणाहून न निघता एकत्रच निघायचे ठरले. स्वारगेटाहून जुन्या हायवेने जाणारी बस घेऊन दांड फाट्याला उतरून रिक्शा करून रसायनीत अजयाच्या घरी एवढा साधा मार्ग होता !

अती उत्साहात मी आदल्यादिवशीच त्रिवेणीकडे मुक्कामी गेले. तिच्या हातचे मसाल्यातले मोदक खाऊन तृप्त झाले. कसंकाय वर दुसर्‍या दिवशीसाठी उत्साह फसफसत होता. खरडफळ्यावर सगळं उतू जात होतं. पहाटेच्या गाडीनं जायचं असल्याने आम्हा पुणेकरणींना भल्या पहाटे उठवण्याचा चंग परदेशस्थ अनाहितांनी बांधला होता. कॅनडातून स्रुजा, यु के तून प्रश्नलंका,सानिका,हाहा, जर्मनीतून मधुरा, स्लोव्हाकियातून मृणालिनी आणि ऑस्ट्रेलियातून स्पंदना स्काइपवर हजर असणार होत्या. त्याची जुळवाजुळव खरडी व्यनि तून सुरू होती. हे सगळं बघत त्रिवेणीशी गप्पा मारत झोपायला २ वाजले. ४ वाजता उठून आवरून मीताला पिकप करून ५:४५ ला स्वारगेटला पोहोचायचं ही उजळणी करत झोपच येइना ! कसाबसा डोळा लागला तर ३:४५ ला युकेतून प्र्श्नलंकीचा फोन... उठा तयार व्हा! कट्ट्यला जायचंय !!!!!! कट्ट्याला जाणार आम्ही आणि जीव खातेय ही! फोन बंद करून झोपले तर ४ ला त्रि ने लावलेला गजर ठणाणा करायला लागला. त्रि हे फार वाईट मुलगी आहे. मी अजयाकडे जाऊन आंघोळणार होते. पण ही बाई आंघोळ केल्याशिवाय चहाच देईना :)) चहा पिऊन निघालो एकदाचे. विशाखा न मोनुला फोन झाले. बसस्टँडवर बरोब्बर ५:५० ला भेटलो. गळाभेटी झाल्या. बस आली नि बसलो.

आता जुन्या हायवेने जाऊ म्हटलं तर बस नव्या रस्त्याला लागलेली ! या रस्त्याने दांड फाटा येतो की नाई माहीतच नाही! चालक वाहक म्हणाले तुम्ही सांगाल तिथं उतरवतो ! मला दांड फाटा माहीत नाही ! आता काय या काळजीत पडण्याआधीच अचानक मीताला एक शोध लागला. फॉरेनची पाटलीण या अद्वितीय सिनेमाचा विश्वविख्यात हीरो शेजारच्या आसनावर बसलाय !!!! मांजराच्या कुतुहलानं दांड फाटा चिंता मागे टाकून निरीक्षण करण्यात आले! त्याचं नाव काही आठवेना! कसंकाय वर रिपोर्टिंग झालं. नाव कोणालाच आठवेना. "बिचार्‍याला नंतर कामच मिळालं नसेल " असा प्रकट सुस्कारा सोडला गेला. त्या हीरोने आम्हाला ऐकू येईल असं " कालच्या शिवनेरीचं तिकिटच नाही मिळालं म्हणून पांढर्‍या डब्यात जावं लागतंय.." असं शेजारच्या काकूंना सांगून टाकलं. आणि घरून आणलेला डबा खायला सुरुवात केली.

इकडे विशाखाताई साहित्यविश्वातचे तिचे अनुभव सांगत होती. ते संपलं की मिपावरच्या गप्पा सुरू झाल्या. नव्या खरेदीची वर्णनं सुरू झाली. बडबड वाढली. ८ वाजता दांडफाटा येणार असं नेट वर वाचलं होतं. पुन्हा चालकदादाला साकडं घालायला मीता गेली तर ते येडपट पूर्ण मागे बघत मीताशी बोलायला लागलं. बरोबरच्या ४० प्रवाशांच्या जिवाच्या काळजीनं मीता पळतच जागेवर आली :)) तेवढ्यात रसायनीला रस्ता जातो तिथे आम्हाला सोडायचं हे चालकाला कळलं असं आम्हाला वाटलं ! पुन्हा गप्पा. हास्याचे फवारे ! अचानक बस थांबली आणि आम्हाला उतरवले गेले !!!!! :))

उत्साहात लगेच उतरलो. बस चटकन निघून गेली. आणि बघतो तर काय ??? आगे भी.......जाने न आ तू.....पीछे भी.....जाने ना तू....जो भी है ..... बस यही एक पुल है !!!! नजरेच्या टप्प्यात रिक्षा सोडा पण हायवे सोडून आत जाण्यासाठी रस्ताही नव्हता. वर एक पुल होता. एक कसल्याशा कारखान्याची चिमणी होती !! त्या बसवाल्याचा राग यायचा सोडून सगळ्या एकमेकींकडे बघत खोखो हसायलाच लागलो !!! :)) अजयाचा फोन...कुठे उतरलात?? तर सांगायला त्या चिमणीशिवाय एकही खूण नाही ! तिच्याशी बोलतानाही खोखोखोखो सुरूच ! कोणाला रस्ता विचारायचा ! आजुबाजूला एकही माणूस नाही! वर पुलावर एक गुराखी दिसला. पण ते लैच्च लांब होतं. शिवाय तिथे चढायला जी टेकडी होती तिच्यावर जायला रस्ताच नव्हता ! एक दो एक दो करत रस्ता शोधत निघालो. तेवढ्यात एक बाईकवाला येताना दिसला ! पाचही जणींनी १० हात दाखवत त्याला थांबवलं. तो पोलीस निघाला. आता आम्हाला मदत करणे त्याचे कर्तव्यच होते ;) त्याला रस्ता शोधायला पिटाळले. तोवर हायवे ओलांडून कुंपणावरून उड्या मारून एका गोठ्यात उतरून तिथून टेकडीवर जाणार्‍या पायवाटेला लागू असा प्रस्ताव मी मांडला. हायवे अशा पद्धतीने क्रॉस करायचा या कल्पनेनेही त्रि सोडून इतरांचे डोळे मोठे झाले :)) तोवर तो पोलीस दादा आला. म्हणला रस्ताच नाही ! हायवे क्रॉस करा ! :)) विशाखाताई म्हणे पण ते नियमाविरुद्ध आहे नं?? त्यावर कसनुसं हसत...चलतंय अशा वेळेला ! असं पुटपुटत तो निघून गेला. आता चौघीजणी माझ्याकडे बघू लागल्या !

मग समोर रस्त्यावर रोडरॅश खेळल्यासारख्या बुंगाट गाड्या चाललेल्या असताना आम्ही सगळ्या दुडक्या चालीने डिवायडरवर पोहोचलो ;) कोणी वरून तर कोणी खालून सरपटत मधले कुंपण ओलांडले. फोटो काढले :) पुन्हा दुडक्या चालीने उरलेला रस्ता, पुन्हा कुंपणाच्या कठड्याचा घोडा घोडा खेळत पलीकडे थेट काट्याकुट्यात !!!! ;)) बिचारी अजया एवढ्या जंगलात राहत असेल असे वाटत नाही हो... असं म्हणत निघालो. पलीकडे एक गोठा न त्याच्या पलीकडे पायवाट. टेकडी न पुलावर जाणारी. अजून एक मोठं कुंपण साहस करत एकमेकींना हात देत चढलो. एकदम प्रहार सिनेमातल्या " मैने डिसाइड किया है सर..." या पाण्यात उड्या मारण्याच्या प्रसंगाची आठवण यावी अशा गमती झाल्या. एकजण भिंतीवर चढायला तयार नाही. दुसरी त्यावरून पलीकडे उडी मारायला तयार नाही :)) शेवटी मी वर चढून ढकलून देईन अशी धमकी दिल्यावर ती खरी वाटून तिने टुणकन उडी मारली :)) कोण ते मी नै सांगणार ! मार बसेल !

शेवटी पायवाटेला लागलो. कारखान्याला पोहोचलो आणि रिक्षा दिसल्या !!! नाचत नाचत रिक्षात बसलो. त्याला अजयामॅडमचा वाडा माहीत होता ;) आम्ही कसं चुकीच्या ठिकाणी उतरलो यावर एक शिकवणी घेऊन त्याने अल्प पैशात घरासमोर सोडले.
आता कुठे विशाखाताईच्या जिवात जीव आला. मनातल्या मनात तिने जन्मात कधी आमच्यासोबत कट्ट्याला येणार नाही असं ठरवूनही टाकलं असेल ;) बसमध्ये पोर्णिमा ट्रेकला येण्याच्या गप्पा मारणार्‍या 'त्या' दोघींना मी डिसक्वालिफाय असं सर्टिफिकेट दिलं !
अजयाताईंच्या वाड्याचं काय वर्णन करावं ! दारात झोपाळा. मधुमालती नि बहावा फुललेला. समोरच्या व्हरांड्यात एका झुंबरावर बुलबुलने संसार थाटलेला. घरात गेल्यावर गारेगार वाटलं. घामाच्या धारांनी हैराण झालो होतो. सर्वांना स्नान करायचे होते. पण पोह्यांचा वास आला नि घोटाळत राहिलो :) पोहे आले. सरबत आलं. आमच्या पिशव्यांम्धून आंब्याचे चिरोटे, बाकरवड्या, खोबर्‍याच्या वड्या, चकल्या निघाल्या आणि मनसोक्त पहिली खादाडी झाली.

आम्ही सुस्नात होऊन बडबडत असताना मुंबैचा पहिला जत्था आला. स्वातीताई, कविता, उमा, मीच मधुरा,सौ मुवि, मनिमाऊ आणि हेमा यांचे आगमन झाले. गळाभेटी, चेष्टामस्करी आणि सोबत आलेल्या पिलांच्या किलबिलाटाने आणि आमच्या कलकलाटाने घर भरून गेलं. अजयाचा लेक संकोचून्,वैतागून आत गडप झाला :)) ( इथले डिटेल्स स्पे वृत्तांतात तिकडे देण्यात येतील. मुद्दे - सासू सून भेट....कविता....दीक्षा....पातेलं....हंडे इत्यादी ;)) ) पुन्हा खादाडी झाली. अखंड गप्पा चालल्या होत्या. मग सुर तिच्या दोन्ही कन्यांसह आली. आता एकूण ४ बालवानरे बागडू लागली. अजयाने सुंदर बाग केली आहे. ती फिरून बघितली.

आणि वरच्या मजल्यावरील हॉलमध्ये कविता वाचूया असं म्हणत गेलो. याविषयी स्वतंत्र लेख होईल. इथे थोडक्यात सांगते.
वर मस्त बैठक तयार केली होती. तिथे आम्ही आधीपासून निवडलेल्या कविता वाचू लागलो. मनिमाऊने 'कणा' म्हटली. मग सुचेताने तिच्या काही कविता वाचल्या. त्यातली खूप दिवसांनी भेटलेल्या मैत्री ची कविता विशेष दाद घेऊन गेली. उमा, अजया, मोनू, विशाखा, स्वातीताई, मी कविता वाचत होतो. कविता आणि उमा रेकॉर्डिंग करत होत्या. करंदीकर, इंदिरा, कुसुमाग्रज्,ग्रेस्,पाडगावकर, बोरकर, शाळेतल्या कविता, नलेश पाटलांच्या पावसाच्या कविता अशी मैफल रंगत असताना अजयासुत स्काइप वर सानिका वाट बघतेय असं सांगत वर आला. वरच्या मजल्यावर रेंज येत नसल्याने सगळ्याजणी उठून खाली गेलो. आता खरा इंटरनॅशनल कट्टा सुरू झाला. सानिकाचा दीर्घ कॉल झाला की स्पंदनाताई आली. तिला सगळ्यांचं मुखदर्शन घडवलं आणि आनंदाच्या भरात अतिशय फालतू बडबड केली :)) जर्मनीतून मधुरा कनेक्ट व्हायला धडपडत होती पण मेलं नेट नीट काम करत नव्हतं. थोड्यावेळानी मृणालिनी स्लोवाकियातून फोनवर आली. तिच्याशी सगळ्यांच्या गप्पा झाल्या.

पावभाजी आली. खमंग वासाने आणि सकाळचे पोहे जिरल्याने पुन्हा भूक लागली. मग फटाफट पाव कापले. लोणी लावून खरपूस भाजले आणि खायला बसलो. तोंडी लावायला दोनाच्या तिनाच्या गटात 'स्पेशल' गॉसिप सुरू झाले. त्याचे सगळेच मुद्दे इथे देऊ शकत नाही ;) विशाखाताईच्या प्रकाशित दोन आणि येऊ घातलेल्या पुस्तकाबद्दल कुतुहलाने चर्चा झाली. स्वातीताइशी माझ्या तिच्या घरच्या हुकलेल्या दोन चार कट्ट्यांविषयी हळहळ झाली. पण आज शेवटी आम्ही भेटलो याचा फार आनंद होत होता. स्वातीताई उत्साहाचा झरा आहे. तिच्यासाठी तशा बर्‍याच जणी नवीन होत्या पण ती अगदी सहज सर्वांमध्ये मिसळून गेली होती. जेवणं झाली. अजयाने सर्वांना पोटभर ताक पाजले. सगळ्याजणी पहाटेपासूनच्या दगदगीने आणि पोटात गेलेल्या सुग्रास जेवणाने सुस्तावल्या. जागा मिळेल तिथे पसरल्या. चिल्लीपिल्ली त्या बुलबुलाच्या मागे नि त्यांच्या आई त्यांच्या मागे अशी पळापळ सुरू होती एवढ्यात आरोही आली. खरं तर पाहुण्यांमुळे तिला जमेलसं वाटत नव्हतं पण काहीतरी जुगाड करून एवढ्या दूर आली पठ्ठी ! अनाहितांची ओढच अशी :)

घड्याळाने ३:३० वाजलेले दाखवले. अजयाने सगळ्या सुस्तावलेल्या अनाहितांना भरपेट आइस्क्रीम खाऊ घालून ताजेतवाने केले. एक सून एका सासूच्या पायाशी लोटांगण घालतेय आणि सासू खुनशी नजरेने तिला झिअडकारतेय असा विशेष फोटू एका महत्वाच्या रेकॉर्ड साठी काढला गेला ;) :))

आता जायचे वेध ! कोण कुठे जाणार, कोणती बस, कोणती ट्रेन.... सगळ्यांच्या गाड्या पनवेलहून होत्या. त्यासाठी टमटम सांगून ठेवल्या होत्या. हे बोलत असताना ढाराढुर झोपलेली हेमा दिसली. असं देखवतंय व्हय ! तिला उठवलं. आणि गप्पा सोडून झोप काढण्याची शिक्षा म्हणून राजस्थानी डान्स ची शिक्षा फर्मावली ! तिनेही आनंदाने ती मान्य केली. आणि तिच्या सुरेख नृत्याने कट्ट्याची सांगता झाली.
कधी नव्हं ते टमटमवाले भाऊ पण वेळेवर आले ! निरोपाच्या गळाभेटी झाल्या. पुढच्या पुणे कट्ट्याची बोलणी झाली आणि मुंबैकरणींना आम्ही निरोप दिला.
पाठोपाठ आम्ही पुणेकरणीही निघालो. कोणत्याही स्नेहमिलनानंतर येणारा उदास रिकामपणा आला होता. पनवेलला पोहोचून मिळेल त्या बसमध्ये बसलो. येतानाही कट्ट्याबद्दल, मैत्रिणिंबद्दल, येऊ न शकलेल्या अनाहितांबद्दल भरभरून बोलत होतो. सगळ्यांची खूप आठवण येत होती.
पुणं आलं. सर्वात आधी वाकडला मी आणि मोनू उतरलो. त्रि आणि मीता चांदणी चौकात. घरी येऊन बघते तर सर्वांनी कसंकाय कट्टा पुन्हा सुरू केला होता ! ३४० मेसेजेस आणि फोटू आणि रेकॉर्डिंग शेअर झाले होते. त्यावर गप्पा झडत होत्या. मनात म्हटलं..अभी तो पार्टी शुरू हुयी है :))

मी गप्पा आणि कविता आणि खादाडीत लैच्च व्यस्त असल्याने फोटूबिटू काही नाही. ज्यांनी काढले त्यांनी इथे टाका !!!

रेखाटनविरंगुळा

प्रतिक्रिया

एस's picture

20 Apr 2015 - 7:41 pm | एस

झकास!

अजया's picture

20 Apr 2015 - 9:04 pm | अजया

.
.
.
.
.
.
.
.
.
.

.
.
.
.
.

जुइ's picture

20 Apr 2015 - 9:46 pm | जुइ

झक्कास आहेत फोटो!!!

अजया's picture

20 Apr 2015 - 11:15 pm | अजया

.
.
.
.

पुणेकरांनी खरच असा काय ट्रेक केलाय... काय गं तुम्ही अशा. मी असायला पाहिजे होते. त्या हाईअवेच्या मधेच बसुन मी हास्यलोळासन केले असते आणि माझे बघुन तुम्ही पण. ;)
मी काल वेड्यासारखी एकटीच हे आठवुन आठवुन हसत होते. आता आज हे फोटो बघुन तर बहुतेक रात्री झोपेतही हसेल आता. :D :D

मस्त झाला आहे कट्टा!! सुरेख वर्णन. :)

सौन्दर्य's picture

20 Apr 2015 - 7:52 pm | सौन्दर्य

खूप छान डिटेल्ड वर्णन. अनाहितांच्या कट्ट्याला मी पण होतो असे वाटायला लागले आहे. फोटू नावासकट आले तर तेव्हढीच ओळख होईल. ऑल द बेस्ट फॉर द नेक्स्ट कट्टा !!

जेपी's picture

20 Apr 2015 - 7:56 pm | जेपी

चांगलय..

रेवती's picture

20 Apr 2015 - 7:59 pm | रेवती

आईग्ग! मिसला कट्टा मी!
भारी वर्णन. आता फोटूंची वाट बघते.
मज्जा वाटली.

भाते's picture

20 Apr 2015 - 8:00 pm | भाते

सविस्तर (अनाहिता) कट्टा वृत्तांत आवडला.
एखादी लघुकथा वाचल्यासारखे वाटले. बारिकसारीक तपशिल लक्षात ठेऊन लिहिले आहेत. :)

स्रुजा's picture

20 Apr 2015 - 8:01 pm | स्रुजा

वा वा.. सूंदर झाला गं कटटा. एवढ्या खरडी करून आणि व्यनि करून ऐन वेळी झोपेने दगा दिला आणि मला रात्री एक वाजता झोप लागलीच :( फोटो बघून नुसतंच समाधान मानून घेतलं. कवितांच्या रेकॉर्डिंग ने जरा बरं वाटलं पण आता कसं वृत्तांत आल्यावर गार गार वाटलं , स्नेहा ताईच्या आईसक्रीम सारखं.

दिक्षा दिलीत ते बरं केलं पण एक मेंबर नव्हता ना दिक्षा ड्यु.. इशा आपली. कविताची दिक्षा झाली त्यामुळे आनंद मनात माझ्या माईना ...

आजानुकर्ण's picture

20 Apr 2015 - 8:05 pm | आजानुकर्ण

अय्या! छानच झालेला दिसतोय बाई कट्टा!!

मितान's picture

20 Apr 2015 - 8:09 pm | मितान

कविता वाचनात एक विशेष कविता होती...
मुविंनी सौ मुविंना लिहिलेली !!!! अतिशय सुंदर !

ती कविता आम्हाला ऐकवलीच आहे तर मेन बोर्डावर आलीच पाहिजे अशी मागणी काव्यप्रेमी मंडळ दोघांनाही करत आहे :)

आदूबाळ's picture

20 Apr 2015 - 8:11 pm | आदूबाळ

भारी वृत्तांत!

कविता१९७८'s picture

20 Apr 2015 - 8:14 pm | कविता१९७८

मस्तच, फोटु टाकते लवकरच

पियुशा's picture

20 Apr 2015 - 8:17 pm | पियुशा

वा वा आला बायो एकदाचा व्रुतांत! आता लगोलग फ़ोटुही येऊ दयात कस कायवर ट्रेलर पाहिलाच आहें फुल्ल पिक्चर ईथे येऊ दयात

मितान ताई, भन्नाट झालाय वृत्तांत अगदी. परत एकदा कट्टा मिसला आम्ही.
तुमचे हाईवेवरचे प्रताप वाचुन वेड्यासारखी हसतीये मी. बरे झाले घरीच आहे, नाहितर ऑफिसमधे परत एकदा खात्री झाली असती मी वेडी असल्याची. ;)
तुझी मांजरीची कविता ऐकली...खुप मस्त गातेस. आवडली. :'*

सानिकास्वप्निल's picture

20 Apr 2015 - 8:28 pm | सानिकास्वप्निल

भारी लिहिले आहेस, वृत्तांत एक नंबर :)

अनाहितांचे कट्टे दरवेळेस असे दणक्यात होतात, खादाडी, गप्पा, मज्जा सगळीच धमाल असते. कट्ट्याला ऑन्लाईन का होईना सहभागी होता आले ह्याचा आनंद वेगळाच.

कविता वाचनाचे रेकॉर्डिंग (मांजरीची आणि आईची कविता खुप्प्प्प्प्प आवडली ) , खादाडीचे फोटो, स्काईपवर येण्याची धडपड सगळेच लई भारी!!

हायवेचा अनुभव तर जबराट ;)

t

हाच ग तो विश्वविख्यात हिरो ज्याला माझ्या rucksack चे फटके बसले .

सानिकास्वप्निल's picture

20 Apr 2015 - 8:28 pm | सानिकास्वप्निल

गिरीश परदेशी आहे हा .

यष्टीच्या मानानी बरा आलाय फोटू.

वृत्तांत वाचून परत एकदा कट्टा केल्यासारखा वाटला . खूप मस्त लिहिलंय.

जुइ's picture

20 Apr 2015 - 8:29 pm | जुइ

सुरेख खुसखुशीत वर्णन केले आहेस मितान. आता फटुची वाट पाहणे आहे.

मनुराणी's picture

20 Apr 2015 - 8:34 pm | मनुराणी

वाह. एकदम मस्त व्रुत्तांत. कट्ट्याला हजेरी न लावता अाल्याची जळजळ व्रुत्तांत वाचुन पुष्कळ कमी झाली.

सस्नेह's picture

20 Apr 2015 - 8:36 pm | सस्नेह

प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट..
कट्ट्याहून वृत्तांत भारी !

प्रीत-मोहर's picture

20 Apr 2015 - 8:40 pm | प्रीत-मोहर

Hahaha ....jeev gela hasun...
Kay kay misla yar ...pan vachtana mipan he sagla kela asa vatla.
Pune kattyala hajeri pakki.
Sucheta tai n mitan kavita awesome

झककास वृत्तांत..मला तिथेच हजर असल्या सारख वाटल

प्रीत-मोहर's picture

20 Apr 2015 - 8:50 pm | प्रीत-मोहर

सासू सून भेट....कविता....दीक्षा....पातेलं....हंडे =)) याच्यावर लैच आहे बोलण्यासारख... कांता अनाहिता लौकर अप कर रे बाबा!!!

सतिश गावडे's picture

20 Apr 2015 - 8:53 pm | सतिश गावडे

भन्नाट वृत्तांत. कट्टाही असाच भारी झाला असणार यात शंका नाही.

"फॉरिनच्या पाटलिन" चित्रपटाच्या हिरोचा फोटो इथे दिल्याबद्दल अनेकानेक धन्यवाद. चित्रपट पाहिला होता मात्र स्मरणशक्तीला ताण देऊनही हिरोचा चेहरा नजरेसमोर येत नव्हता.

मनिमौ's picture

20 Apr 2015 - 8:56 pm | मनिमौ

मी आणी सौ मुवि बरोबर 7:55 च्या पनवेल गाडीत चढलो. हेमा आणि कविताने आमचे स्वागत केले.एकत्र बसता यावे म्हणुन बाकी लोकांना विनंती करून जागा मिळवली. सगळ्या जणी भुकेल्या असल्याने समोसा ईडन आणि चहा वर आडवा हात मारला.9 वाजता पनवेल स्टेशनवर उमा तिची लेक आणी स्वाती ताई भेटल्या. अजया ने अतिशय सुरेख व्यवस्था केली होती.टमटम वाले दादा एकदम वेळेवर हजर होते. माझी लेक आणी उमा ची लेक यांची लगेच गट्टी जमली.साधारण 40 मि मधे अजया कडे पोचलो. फुलापानात लपलेले घर छानच. त्यातुन घरभर मांडले ले छोटे शो पीस लक्ष वेधून घेत होते. गप्पा कविता आणी खाण्यात दिवस कसा सरला समजलच नाही.

प्रीत-मोहर's picture

20 Apr 2015 - 9:04 pm | प्रीत-मोहर

आणि काय हे आज्जीबै तिळ्यांबद्दल एक शब्दही नसावा वृ म्हधे?

खटपट्या's picture

20 Apr 2015 - 9:13 pm | खटपट्या

हम्म, चांगलाय व्रुत्तांत...
फोटू टाका लवकर....

अस्मी's picture

20 Apr 2015 - 9:38 pm | अस्मी

व्वाह...मस्त झाला कट्टा!!
वृत्तांत एकदम सूंदर. अगदी कट्टयाला हजर असल्यासारखं वाटलं :)

कवितानागेश's picture

20 Apr 2015 - 9:41 pm | कवितानागेश

जळ जळ होतेय......

अर्धवटराव's picture

20 Apr 2015 - 9:48 pm | अर्धवटराव

जीना इसीका नाम है :)

मधुरा देशपांडे's picture

20 Apr 2015 - 10:08 pm | मधुरा देशपांडे

असे अनेक कट्टे नेहमीच चुकतात आणि हे झक्कास वृत्तांत आणि फोटो मनाला थोडा दिलासा देतात. :) अजयाताईने मला स्काईप वर अ‍ॅडवले नाही अन मला कॅमेर्‍यातुन कुणाला भेटता आले नाही म्हणुन तिचा णिषेध. पण या सगळ्यांनी मिळुन तिला किती त्रास दिला असेल याची कल्पना आहेच त्यामुळे समजु शकते. अधमुरं दही, पुलाव, इंद्रायणीचाच तांदुळ नि अजुन काय काय फर्माइशी पुरवता पुरवता नाकी नऊ आल्याने तिने बहुधा माझ्याकडे दुर्लक्ष केले. मग शेवटी फोनवरच समाधान मानले. तरी सगळ्यांना एकत्र व्हिडिओ चॅट करता यावे यासाठी तिने तिचा पीसी/स्काईप अपग्रेड करुन घ्यावे अशी मी समस्त अनिवासी अनाहिता मंडळातर्फे तिला विनंती करते आहे.
विशाखाताईच्या 'आम्ही ट्रेक करत आलो' चा अर्थ आता वृत्तांत वाचुन कळला. स्वातीताईने आपली जर्मनीतील पोलन्स आणि वसंतागमनाची चौकशी केली आणि मनोमन बहुधा तेवढा वेळ ती इकडे पोचली. नावात कल्लोळ असला तरी भावनाताईशी छान बोलणे झाले. पण बाकीच्या सगळ्यांचा जो काही मागे कल्लोळ सुरु होता की त्यात काहींशी बोलायचे राहिले. त्यानिमित्ताने माझे नि सानिकाचे थोडा वेळ स्काईपवर बोलणे झाले आणि रसायनीला फोनवर हजेरी लावता आली याचा आनंद मात्र अवर्णनीय. आता तिकडच्या स्पेशल वृत्तांताची वाट बघणे आले.

अगं इतके कॉल एका वेळी सुरू होते,त्यात राहिलं बहुतेक.स्काईपवर सानि आणि अपर्णा यांनाच बोलता आलं!आता जर्मनीला कट्टा करुन कसर भरुन काढुया पुढच्या वर्षी!

मधुरा देशपांडे's picture

20 Apr 2015 - 10:55 pm | मधुरा देशपांडे

होहो. नक्की. :)

जुइ's picture

20 Apr 2015 - 11:04 pm | जुइ

त्यावेळी फक्त अजयाशी बोलणे झाले. तिने सांगितले की नुकतेच सगळ्यांनी आइसक्रीम खाले होते. सगळ्या तृप्त होवून हसत होत्या. तो आवाज ऐकून मजा वाटली :-)

मितान's picture

21 Apr 2015 - 3:30 pm | मितान

अधमुरं दही, पुलाव, इंद्रायणीचाच तांदुळ नि अजुन काय काय फर्माइशी पुरवता पुरवता नाकी नऊ आल्याने तिने बहुधा माझ्याकडे दुर्लक्ष केले >>>>> कप्पाळ !

या मुंबैकर दिसणार्‍या पुणेरी बाईने काही हट्ट पुरवले नाहीत. तुला कारण सांगायला हे सगळं ! तुला अ‍ॅड करण्यात गप्पा मिसल्या असत्या नं ;)
नशीब हाती करवंटी नाही दिली ;) :)) संदर्भासाठी व्यनि करावा :)) :))

करवंट्या सर्वाना मिळतील संक्रातीचं वाण म्हणून!तेव्हा घ्या आपल्या आपल्या पसंतीच्या आणि..जाऊ दे=))

Maharani's picture

21 Apr 2015 - 4:20 pm | Maharani

कहर

कविता१९७८'s picture

21 Apr 2015 - 5:05 pm | कविता१९७८

चला एक करवन्टी कट्टा होउन जाउ द्या

त्रिवेणी's picture

21 Apr 2015 - 5:14 pm | त्रिवेणी

सु न बा ईं ना स्पे श ल क र वं टी दे णा र अ स ती ल ना सा सु बै.

अजया's picture

21 Apr 2015 - 5:47 pm | अजया

हो.भोकवाली

त्रिवेणी's picture

21 Apr 2015 - 7:38 pm | त्रिवेणी

अ य्यो का य हे.
सा सु सा सु च अ स ते हे च ख र.

उमा @ मिपा's picture

22 Apr 2015 - 9:01 am | उमा @ मिपा

अरारा... सुसाट

भाग्यश्री कुलकर्णी's picture

20 Apr 2015 - 10:18 pm | भाग्यश्री कुलकर्णी

मस्त....तिकडे कसंकाय वर ट्रेलर बघीतलेला...इथं पिक्चरच दाखवलाय जनु.....

पैसा's picture

20 Apr 2015 - 10:21 pm | पैसा

कट्ट्याच्या निमित्ताने ट्रेक पण झाला तर! ;) करा धमाल! पुढचा कट्टा कधी आहे?

भिंगरी's picture

20 Apr 2015 - 10:29 pm | भिंगरी

इनोची किती पाकीटं खाऊ?

टवाळ कार्टा's picture

20 Apr 2015 - 10:35 pm | टवाळ कार्टा

भेंडी....भन्नाट कट्टा झालाय (अथपासून ईथपर्यंत)

स्वगत - इतक्या अनाहितांमध्ये सगळ्या मिळून माझे भजे, भरीत, खीमा, कै कै कर्तील

अत्रुप्त आत्मा's picture

20 Apr 2015 - 10:41 pm | अत्रुप्त आत्मा

घरी येऊन बघते तर सर्वांनी कसंकाय कट्टा पुन्हा सुरू केला होता ! ३४० मेसेजेस आणि फोटू आणि रेकॉर्डिंग शेअर झाले होते. त्यावर गप्पा झडत होत्या. मनात म्हटलं..अभी तो पार्टी शुरू हुयी है :))

http://www.sherv.net/cm/emoticons/yes/yellow-okay-hand-smiley-emoticon.gif http://www.sherv.net/cm/emoticons/yes/ok-sign-smiley-emoticon.gif http://www.sherv.net/cm/emoticons/yes/yellow-okay-hand-smiley-emoticon.gif http://www.sherv.net/cm/emoticons/yes/ok-sign-smiley-emoticon.gif http://www.sherv.net/cm/emoticons/yes/yellow-okay-hand-smiley-emoticon.gif http://www.sherv.net/cm/emoticons/yes/ok-sign-smiley-emoticon.gif
एंडिंग नोट ला सुप्परलाइक करनेत येत आहे...!

किती दिवस झाले कट्टा होउन चला एप्रिल कट्टा करुया असं ठरवून अनाहितात काथ्या कुटायला घेतला! कुठे अंतर जास्त तर कुठे गप्पांना निवांतपणा नाही असं काय काय चाललं होतं. अनाहिता कट्टा ज्या हॉटेलात होतो त्या होटेल मालकांचे आम्ही निघेपर्यंत कावलेले चेहेरे पाहुन तेही नको वाटत होतं.मग ठरलं गड्यानो आपला गाव बरा! खायचंप्यायचं गॉसिप करायचं,आरामात लोळायचं यासाठी घरच बरं!
माझ्या अडनिड्या ठिकाणच्या घरी खरच किती जणी येतील मला शंकाच वाटत होती! पण त्या आल्या !!टेकड्या चढून,हायवे क्रॉस करून ,कोणी तीन तास प्रवास करून तर कोणी दुपारच्या उन्हात टमटममध्ये झळा खात्,लहान मूल घेऊन.
सर्वात आधी पुणेकर मंडळी आली,हाफ्हूफ करत! त्यांना वाटंत होतं मीच पूणेरी माज उतरवायला यस्टीच्या डायवरसायबाला रस्त्यात टाकून द्यायला सांगितलं की काय ;
कविता वाचन झाल्यावर जगाच्या निरनिराळ्या कोपर्यर्‍यातून फोन मधुन एक एक अनाहिता कट्ट्यात सामिल व्हायला लागल्या.सुरुवात झाली सानिकाच्या फोनने.मग मधुरा,मृ,प्रश्नलंका ,जुइ,अपर्णा असे एकेकीचे कॉल घेताना धांदल सुरु झाली!.
मग गप्पांना रंग चढला!(( !@@#$$%%^अनाहिता सुरु करा हो सगळं लिहिता येत नाहीये कोणाबद्दल काय बोलणे झाले;० काही फोटो पण इथे देता येत नाहीत्,आमची रेवाक्का पाहणार कसे ते.चांगल्या सासवा,वाईट्ट सूना याबद्दल तसेच त्यांना बिघडवणार्‍या आया(अपर्णा !@#$%^)आणि झोपाळ्यावरचे हंडे कळशा याबद्दल अत्यंत गुप्त असे व्य नि केले जातील.त्यात दिक्षा आदीबाबत महिती मिळेल;)))
तर पुढे काय झालं कट्ट्याला! मनिमौ ची लेक्,सुर च्या दोघी आणि उमाची या सर्वजणींनी त्या पुढे अनाहिताच होणार याची जबरदस्त झलक दाखवली!त्यांच्यातला एकमेव मुलगा अद्वेय शांत बसुन होता!आणि माझा मोठ्ठा असुन लपुन बसला होता अनाहितांच्या अखंड हसण्या बोलण्याला घाबरून.यातच सर्व आलं!!
या सर्व छोटू कंपनीने बुलबुलशी एवढी दोस्ती केली की जरा वेळाने बुलबुल झोपाळ्यावर आणि त्याला सगळे छोटे झोका देत होते आणि तोही न उडता मजेत बसला होता!!
काही अनाहितांनी नगिण डॅन्स झोपुन करुन पाहिला.(त्याचे पुरावे आहेत)इच्छुकांनी व्य नि करावे.आपली कट्टाहित!
दुपारी सगळ्या जणी गेल्या तर घर रिकामं रिकामं झालं.मग एकेक क्षण रिवाइंड करत बसले.स्वातीताईने म्हणलेली शांताबाईंची आजीची पैठणी,मितानचं तुला पाहिले मी नदीच्या किनारी, मनीने तोंडपाठ म्हंटलेली कणा कविता,सुचेताचा चौथा कमरा,उमाची छानशी कविता ,मोनुचा कविता वाचनाचा पहिलाच पण मस्त प्रयत्न्,विशाखाने म्हंटलेली शेतकर्यावरची कविता .मग वातावरणातलं गांभिर्य घालवायला म्हन्टलेला साठीचा गझल्,पाडगवकरांची मस्त 'रोमांचिक' कविता!!!
सगळ्या जणीनी आणलेला खाऊ,त्यातही मितानने घरी केलेले अंब्यातले चिरोटे!(हे लिहिण्यासाठी मितानने मला डॉक्टर्स घेतात तो कट दिलाय ;)सून बाईनी आण्लेल्या बाकरवड्या,विशाखाची बर्फी (पूण्याहून्,चितळ्यांची आणि चक्क एक किलो!शोभते का ही बाई पुण्याची;) सगळं समोरच आहे अजून...लवकर गेलात, पुढच्या वेळी रहायलाच या,लिहिता येत नाही आता!

अत्रुप्त आत्मा's picture

20 Apr 2015 - 11:09 pm | अत्रुप्त आत्मा

@या सर्व छोटू कंपनीने बुलबुलशी एवढी दोस्ती केली की जरा वेळाने बुलबुल झोपाळ्यावर आणि त्याला सगळे छोटे झोका देत होते आणि तोही न उडता मजेत बसला होता!!>> हायला! हे इतकं कसं हो पाळीव? http://www.freesmileys.org/smileys/smiley-confused002.gif

@(त्याचे पुरावे आहेत)इच्छुकांनी व्य नि करावे.आपली कट्टाहित! >>> http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing004.gif

@(पूण्याहून्,चितळ्यांची आणि चक्क एक किलो!शोभते का ही बाई पुण्याची>>http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing007.gif काय माप काढलय पण!
पुण्यावरचे दगड णोंदवून घेनेत आले हायेत.. दू..दू...दू... http://www.freesmileys.org/smileys/smiley-taunt010.gif

उमा @ मिपा's picture

21 Apr 2015 - 12:39 am | उमा @ मिपा

ट्रेनमध्ये स्वातीताई, माझी लेक आणि मी शब्दांच्या भेंड्या खेळत होतो तर मला सारखी अनाहितांची नावंच आठवत होती, न राहवून एकदा र साठी रेवाक्का असं म्हटलंच. बुलबुलला झोका दिला याचा केवढा अभिमान वाटतोय माझ्या लेकीला. मितानने तिला उंच उचलून पिल्लू बुलबुल दाखवली याची भरपूर फुशारकी मारली तिने घरी आल्यावर. दिवसभर एवढी दमलेली असूनही कविता (सर्वात लांब राहणारी अनाहिता) घरी पोचेस्तोवर अजयाताई जागी होती, कविता ट्रेनमध्ये कंटाळली होती म्हणून तिच्यासोबत कसं क्काय वर गप्पा करत होती. लहानग्यांसाठी अजयातैने इतकी पुस्तकं काढून ठेवली होती, किती छान जपून ठेवलेली पुस्तकं आणि जाताना आम्हाला सांगितलं, यातली जी हवीत ती पुस्तकं आनंदाने घेऊन जा.

कविता१९७८'s picture

21 Apr 2015 - 5:34 pm | कविता१९७८

उमे माझा प्रवासच येउन जाउन ८ तासाचा झाला , थकलेही होते मग माझ घर येईपर्यन्त कन्टाळले

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

20 Apr 2015 - 11:06 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

वा वा वा!!! भारी एकदम. एकदा असा एक मोठ्ठा सामायिक कट्टा अटेंड करायची विच्छा आहे. बघु जमतयं का ते.

बुंगाट वर्णन. आवडल्या गेले आहे!

सविता००१'s picture

20 Apr 2015 - 11:56 pm | सविता००१

कट्टाही सुरेख आणि मितान चं वर्णन पण.
फोटो कसकाय वर पाहिलेच होते.
झक्कास मज्जा केलीये सगळ्या जणींनी. छानच

प्रश्नलंका's picture

21 Apr 2015 - 12:22 am | प्रश्नलंका

मस्तच कट्टा आणि सुरेख वर्णन. आणि काय गं मी उठवले म्हणून वेळेवर आवरले नाही तर. . तरी मध्ये जरा माझा डोळा लागला तेवढयात केली ना गडबड उतरल्या ना भलत्याच ठिकाणी ;)

अनाहितांच्या एका कट्ट्याच्या समारोपात पुढच्या कट्ट्याची सुरुवात होते. पुण्याला मितानच्या घरी कट्टा झाला, मी, सविता, कविता, हेमा आणि आणखी काही जणींनी तो मिसला आणि तेव्हाच आम्हाला पुढच्या कट्ट्याचे वेध लागले. अगदी आमच्या मनातलं ओळखून की काय अजयाताईने एप्रिलमध्ये कट्टा करायची घोषणा केली. काय, कुठे, कधी अशी बरीच चर्चा करता करता अजयाताईने घरीच बोलावलं. रसायनीला जायचं म्हणजे ठाणे पनवेल ट्रेन हा आम्हा ठाणेकरांसाठी सोपा सरळ मार्ग. पण अनाहितांना भेटण्याची ओढच अशी पार वेडी, बोइसर, वसई, कल्याण, डोंबिवली हून येणाऱ्या अनाहिता बोइसर पनवेल ट्रेनने येणार म्हणून ठाणे ते कोपर आणि कोपर ते पनवेल असा मार्ग ठरला. आमचं अनाहिता बंद पडलं, कट्ट्याची तयारी, अजयातैला वेगवेगळ्या फर्माईशी आणि आणखी बरंच काही (जे फक्त आणि फक्त अनाहितातच सांगितलं जाऊ शकतं) खूप खूप मिस केलं. त्याची भरपाई कसं क्काय वर केली पण अनाहिताची सर त्याला नाहीच. कट्ट्याच्या दिवशी सकाळी चारच्या आधीच जाग आली, आम्ही मायलेक साडेपाचला तयार झालो पण बाहेर उजाडलच नव्हतं. कट्ट्याला जायची उत्सुकता घड्याळाच्याही पुढे धावत होती. बाहेर जरा उजेड दिसला आणि आम्ही दोघी घराबाहेर पडलो. इतक्या सकाळी स्टेशनला जायला रिक्षा मिळणं अशक्य त्यामुळे अर्धा तास चालत जाऊन घोडबंदर रोडवरून बस पकडायची हे पक्कं होतं. पण कॉम्प्लेक्समधेच रिक्षा मिळाली, आम्ही सुटलो स्टेशनच्या दिशेने. तिकडे भेटली स्वातीताई आणि आमचा मिनी कट्टा सुरु झाला. खरंतर आम्ही अनाहितात सुद्धा एकमेकींशी फार कधी बोललेलो नाही पण एका क्षणात लिंक जुळली. उत्साह, आनंद, गप्पा. माझ्या लेकीला स्वातीमौ खूप आवडली. छान रमवत होती स्वातीताई तिला. ठाणे स्टेशनात तिकिटासाठी तोबा गर्दी असल्याने इतक्या लवकर येऊनही पाउण तास रांगेत गेला आणि कोपर ट्रेनला जाण्याच्या प्लानवर पाणी सोडावे लागले. पण स्वातीताई आणि मी कट्टा आधीच सुरु केलेला असल्याने मजा होती. ठाणे पनवेल ट्रेनने पनवेल गाठलं आणि पनवेल स्टेशनात मनिमौ, कविता, हेमा, सौ मुवि यांना भेटल्यावर भर उन्हात जीव गारगार झाला. माझी लेक मनिमौच्या लेकीला बघून खुश, दोघींची गट्टी जमली, त्याप्रित्यर्थ भावी अनाहितांना त्यांच्या आवडीचा खाऊ द्यायचा हे लगेच ठरवून टाकलं. अजयातैने टमटम पाठवली होती, त्या काकांनी पनवेलचा रस्ता रस्ता दाखवतो असा पण केला होता बहुतेक. त्यामुळे आम्हाला पनवेलमधील काही प्रेक्षणीय स्थळे बघायला मिळाली आणि इतकी प्रेक्षणीय स्थळे असल्याचे आम्हाला आजवर न सांगितल्याबद्दल अजयातैचा जाहीर णीशेद करण्यात आला. पुणेकरणी आधीच पोचल्याचे समजले, आता पोहे उरणार नाहीत अशी धाकधूक सुरु झाली. गप्पा, हसणं, खिदळणं यापुढे टमटमचा आवाजही फिक्का पडला. हे आलं म्याडमचं घर असं म्हणत काकांनी एका हिरव्यागार झाडांनी वेढलेल्या टुमदार घरासमोर आणलं. अजयातैचं भरभरून स्वागत, मधुमालतीने सजलेला झोपाळा, छानशी बाग हे सगळं डोळ्यात, मनात साठवून घेत आम्ही आत गेलो. पुणेकर अनाहिता, आमची आठवण ठेऊन उरवून ठेवलेले चविष्ट पोहे, मितानने करून आणलेले छान छान आंब्याचे चिरोटे, विशाखातैंनी आणलेली नारळाची बर्फी, एकमेकींच्या भेटीचा आनंद, मनमुराद गप्पा, कवितावाचनाची बहार, हसणं, खिदळणं . . . . रसायनी कट्टा सुरु झाला. पुढचं सगळं मितानने लिहिलं आहे. त्यातही इतर काही विषय आहेत, त्याची तपशीलवार माहिती देण्यासाठी आमचं अनाहिता सुरु होणं गरजेचं आहे. नीलकांतदादा, वाचताय ना?

झालंय झालंय अनाहिता चालू, या तिकडे लगेच.

ती प्रेक्षणीय स्थळं तुम्हाला दिसली याचंच दुःख झालंय!! ^_~

चैत्रबन's picture

21 Apr 2015 - 1:19 am | चैत्रबन

काय मस्त मज्जा केलीये :)

चुकलामाकला's picture

21 Apr 2015 - 2:10 am | चुकलामाकला

भन्नाट वर्णन आणि फोटो!

फोटू पाहून जीव गारीग्गार झाला. मागल्या कट्ट्यालाच तुमचे प्लॅन्स सुरु झालेले पाहिले होते. आता हाणाहितं सुरु झालय म्हटल्यावर तिकडे पुढील हाणामारी करू.

स्पंदना's picture

21 Apr 2015 - 3:57 am | स्पंदना

कसल्या खिदळत होत्या सगळ्याजणी!! माझ्या घरातले घाबल्ले!
नवर्‍याने डायनिंग मधुन हाकलल मला नोटबुकसह. पोरं लाल्भडक झाली होती आई दंगा करतेय ते पाहून.
आणि कस काय वर माझ्या त्री ला अशी रस्त्यावर पाहून सासरची वाटच वाकडी याचा पुनःरुपी प्रत्यय आला. कुठे जंगलात रहायच आणि शेरातल्या पोरी सूना म्हणुन न्यायच्या (!@$&**^#!&*(**^$@#@) घे@!

खादाडी, मस्ती, त्याहुअनही सुंदर कवितांची मैफील आणि सहज सुंदर नृत्याची मेजवानी!! काय हवं काय आणि जगायला म्हणते मी? एव्हढी शिदोरी पुढचे सहा महिने खुदखुदायला पूरेशी आहे.

खटपट्या's picture

21 Apr 2015 - 6:39 am | खटपट्या

लवकरच फक्त पुरुषांचा कट्टा काढला पायजेलाय....मुवी कुठे आहेत?

स्पा's picture

21 Apr 2015 - 7:45 am | स्पा

हा हा हा

मिटाण इस्टाइल व्रुतांत
लय भारी

इशा१२३'s picture

21 Apr 2015 - 7:49 am | इशा१२३

छान छान फोटो कसकाय वर पाहिलेच होते,वर्णनहि होतेच.आता हा वृतांत वाचुन मजा आली.
पाहुण्यांनी घर भरल्यामुळे येउ शकले नाहि.(त्यात दिक्षा देण्याचा कट शिजत होता ते वेळीच कळल्यामुळे या कट्ट्याला पास दिला.)कविता बरि सापडली.माझ्यावतीनेहि तीनेच दिक्षा घेतल्याने(मी सुटले) मी पुधच्या कट्ट्याला हजर रहाणारच.

माई मोड ऑन- अग अनाहितांनो,प्रतिसादाची हाफशेंच्युरी झाली,अजुन कोणी सत्कार केला नाही.कुणीतरी करा गं!!अस 'हे ' म्हणत होते..बाई..बाई..नसत्या उचापती..मेल्या- माई मोड ऑफ

पियुशा's picture

21 Apr 2015 - 2:44 pm | पियुशा

मी आले पुष्प गुच्छ घेवून !झोपाळ्या वरचे फटु एक नॉम्बर :)) ते शेवट दुसऱ्या फोटुत हेमाच्या डोक्यावर्चा ड्रैगन बघुन बोबड़ी व ळ् ल्या गे ली आहे:))))

बॅटमॅन's picture

21 Apr 2015 - 5:55 pm | बॅटमॅन

या जेप्याला खास माईचे मोड आलेले प्रतिसाद खाऊ घातले पाहिजेत. म्हणजे "कस्सा राव थांबू" अशी स्थिती होईल. =))

श्रीरंग_जोशी's picture

21 Apr 2015 - 8:36 am | श्रीरंग_जोशी

वा वा वा, काय तो कट्टा, काय तो आव्हानात्मक प्रवास, काय ती बाग अन काय ती खादाडी.

सुंदर वृत्तांत व प्रतिसादांतले उप-वृत्तांत. कशेळी महाकट्ट्यातले गंभीर फोटोजमधल्या हास्यरसाचा अनुशेष पूर्णपणे भरून निघाला आहे असे फोटोंतून दिसते.

अनन्न्या's picture

21 Apr 2015 - 11:06 am | अनन्न्या

मेला मोबाईल पण बंद आणि अनाहिता पण, आता पुढच्या कट्ट्याला नक्की! मी काहीच वाचलं नाही फोटो मला दिसतच नाहीत आता इनोच्या ऐवजी आंबे खातेय भरपूर!

टवाळ कार्टा's picture

21 Apr 2015 - 11:39 am | टवाळ कार्टा

बाकी अजयातैंचे घरचे घाबल्ले अस्णार...अजयातैंची एवढी मोठी ग्यांग बघून ;)

ये ह्या वेळेला मी पण मिस केलाय कट्टा पण पुढच्या कट्ट्याला नक्की येइन.

सौंदाळा's picture

21 Apr 2015 - 12:17 pm | सौंदाळा

मस्त
अनाहिताची वाढ आणि जोश मिपापेक्षा जोरात आहे. :)

पिलीयन रायडर's picture

21 Apr 2015 - 12:24 pm | पिलीयन रायडर

मितान मी मरतेय आज हसुन हसुन!!!

तिकडे मी कामाच्या रगाद्ञात पिचुन गेले होते न इकडे तुम्ही असली धमाल केलीत!!!! तुम्हाला कॉल करु म्हणलं होतं पण साधा फोनही दिवसभरात बघणं झालं नाही.. ह्याची हुरहुर होतीच पण खाली पुणे कट्टा वाचुन जरा गार वाटलं.. पण मी आत्तच कही बोलणाअर नाही.. मेरे अरमानोंको हमेशा नजर लगतीच है..

हा आजवरचा सर्वात बेस्ट कट्टा आणि वृतांत आहे!!

बहारदार कट्टा खुमासदार वर्णन आणि हो "अ‍ॅड्व्हेन्चर ट्रेक बद्दल विशेष कवतीक"
==
सरधोपट नाखु

डॉ सुहास म्हात्रे's picture

21 Apr 2015 - 12:36 pm | डॉ सुहास म्हात्रे

लईच भन्नाट कट्टा झालेला दिसतोय ! मस्त खुसखुशित वर्णन आणि फोटो !!

मिपाकट्ट्याला जाण्यासाठी काय काय अडचणी पार करायला लोक (एका पायावरसुद्धा) तयार असतात याचा उत्तम पुरावा म्हणून जपून ठेवावा असा हा वृत्तांत आहे. :)

अनाहीता लवकर सुरु करा रहावत नाहि त्याशीवाय.

प्रीत-मोहर's picture

21 Apr 2015 - 2:26 pm | प्रीत-मोहर

अग झालेय सुरु.

बॅटमॅन's picture

21 Apr 2015 - 3:01 pm | बॅटमॅन

रहावत नाहि त्याशीवाय.

कश्शी गं थांबू....

जोरदार कट्टा एकदम. वृत्तांत लै झ्याक.

श्रेष्ठा's picture

21 Apr 2015 - 2:48 pm | श्रेष्ठा

How do I join anahita group?

पियुशा's picture

21 Apr 2015 - 2:55 pm | पियुशा

Calling Ajaya ,aprna or sampadak mandal:p

स्मिता श्रीपाद's picture

21 Apr 2015 - 3:06 pm | स्मिता श्रीपाद

एक्दम जोरदार वृत्तांत मितान तायडे...
खुप खुप मिसलं ग मी सगळं :-(
आता पुढचं काय ते लवकर ठरवा बाई...

स्मिता श्रीपाद's picture

21 Apr 2015 - 3:06 pm | स्मिता श्रीपाद

पावभाजी , आईस्क्रीम चे फोटो ????????

मितान's picture

21 Apr 2015 - 3:38 pm | मितान

येडीये का तू ?
फोटू काढणार कोण ? माणशी ८ - १० असले तरी मोजून पाव आणले होते बैन्नी ! खायला कमी पडलं असतं तर ???

शेवटी मसाल्याचं गारेगार ताक तर कधी दोनचार लिटर पोटात गेलं कळलंच नै.

आइस्क्रीम चे दोन तीन फ्लेवर होते. हा खाऊ की तो मध्ये फोटूचं पडलंय कोणाला !