विरंगुळा

अत्युच्च साहसी सायकलिंग...

डॉ सुहास म्हात्रे's picture
डॉ सुहास म्हात्रे in जनातलं, मनातलं
6 Mar 2015 - 11:34 am

सायकल चालवणे ही काहींच्या सर्वसामान्य जीवनातली आवश्यकता आहे तर इतरांसाठी आरोग्यदायक व व्यायाम आहे. काहींसाठी ते स्वतःतील धमक आणि त्राण सहन करण्याची सीमा (stamina) सिद्ध करण्याचा आनंददायक खेळ आहे. काही थोड्यांनी या वरवर साध्या व सोप्या वाटणार्‍या आणि केवळ मानवी ताकदीवर चालवल्या जाणार्‍या दोनचाकी वाहनाला आपल्या साहसाची भूक भागविण्यासाठी एका उच्च स्तरावर नेऊन ठेवले आहे... तो खेळ, छंद अथवा वेड साहसी सायकलिंग (adventure cycling) या नावाने ओळखला जातो. ह्या खेळाची आवड असणारा काहीसा वेडा असलाच पाहिजे !

क्रीडाआस्वादविरंगुळा

वाडा (भाग 2)

जयंत माळी's picture
जयंत माळी in जनातलं, मनातलं
6 Mar 2015 - 11:20 am

दुसर्या दिवशी सकाळी रामरावांचे लक्ष त्या खोलीकडे गेले तर त्यांच्या लक्षात आले की कोणीतरी ती खोली उघडली आहे. ते चौकशी करायला विकासकडे गेले असता त्यांना सर्व समजले.
दुसरीकडे पोलिसांची चोकशी चालु होती.
रामरावांनी लगेचच त्या मांत्रिकाला बोलावून ती खोली बंद केली पण त्याचा आता काहीच उपयोग झाला नाही.
त्या मांत्रिकाने सांगितले की तुमच्या वाड्यात पहिली घटना घडली ती पोर्णिमेदिवशी घडली होती आणि या दुष्टचक्राचा शेवट येणार्या अमावस्येला होईल
सचिनला मांत्रिकाचे बोलणे पटले त्याने मांत्रिकाला मदत मागितली पण मांत्रिकाने त्या वाड्यात क्षणभरसुद्धा थांबण्यास नकार दिला.

समाजविरंगुळा

तपकिरी डोळे

म्हया बिलंदर's picture
म्हया बिलंदर in जनातलं, मनातलं
3 Mar 2015 - 6:04 pm

"काय रे? काय करतोस ईथे?" एका रांगड्या आवाजाने विचारले.
मी हबकलो, घाबरलो. काहीतरी बोलायचं म्हणून, "म्म..म..मी.."
"अरे तू इथे कसा? काही शोधतोयस का? बाबा हा माझ्याच वर्गातला आहे."
रांगडा आवाज "हूं " म्हणून नाहीसा झाला.
हलके कुरळे केस सावरीत तिने पुन्हा विचारले, "काही शोधत होतास का?"
माझ्या तोंडून चटकन निघालं "तूलाच" ती थोडी आश्चर्याने "काय?" "अं.. तूलाच सपना तायडेने ईंग्लीशच्या नोट्स दिल्यात ना! त्या हव्या होत्या" मी कसा बसा हे सगळं बोललो असेन.
ती "हो दिल्यात. हव्या आहेत का?"
मि "हो."
ती "ये ना. ईथेच घर आहे."

मौजमजाविरंगुळा

दुलई.......

जयंत कुलकर्णी's picture
जयंत कुलकर्णी in जनातलं, मनातलं
3 Mar 2015 - 3:31 pm

परवा दोशी फाऊंडेशनच्या नाट्यमहोत्सवाला जाण्याचा योग आला. त्यात शेवटच्या दिवशी नासिरुद्दीन शाह, रत्ना शाह व हिबा शहा यांनी सादर केलेल्या इस्मत चुगताईंच्या कथाकथनाचा कायम लक्षात राहील असा कार्यक्रम झाला. या तिघांनी त्या कथा त्यांच्या अभिनयाची जोड देऊन इतक्या बहारदारपणे सादर केल्या की बस ! अर्थात नासिरुद्दीन शाहच्या दिग्दर्शनाचा त्यात मोठा वाटा होता हे नाकारण्यात अर्थ नाही. पण सगळ्यात मोठा वाटा होता त्या कथांचाच.

कथाविरंगुळा

विज्ञान कथा: "शापित श्वास!"

निमिष सोनार's picture
निमिष सोनार in जनातलं, मनातलं
3 Mar 2015 - 12:47 pm

पृथ्वीवरचा निसर्ग-बिंदू वेगाने आकाशात चालला होता. तो काळोख्या अनंत आकाशात एका अज्ञात ठिकाणी खूप दूरवर पोहोचल्यावर त्यापासून पाच बिंदू वेगळे झाले- पृथ्वी, अग्नी, वायू, पाणी आणि आकाश! ही पंचमहाभूते एका महत्त्वाच्या चर्चेसाठी आणि निर्णय घेण्यासाठी एकत्र आले होते. ते पाचही बिंदू तरंगत होते.

कथाविरंगुळा