विरंगुळा

काही किस्सेमय वाक्प्रचार !

म्हया बिलंदर's picture
म्हया बिलंदर in जनातलं, मनातलं
24 Feb 2015 - 11:12 pm

मला नेहेमी वाटायचे कि प्रत्येक म्हणीमागे किंवा वाक्प्रचारामागे काहीतरी संदर्भ, कोणती तरी गोष्ट असणार नक्की.
अशी काय घटना घडली कि "काखेत कळसा…" किंवा "वासरात लंगडी गाय…" जन्माला आले?

तर अशाच दोन घटना माझ्या समोर घडल्या व ज्यावर तिथल्या तिथे काही वाक्प्रचार जन्माला आले.
(खरेतर या आधी मी हे दोन्ही वाक्प्रचार ऐकले नसल्याने मला तरी विशेष त्या घडीलाच जन्मले असे वाटते.तसे नसल्यास भरचूक नो)

वाक्प्रचारविरंगुळा

खुशबू (भाग ५)

पगला गजोधर's picture
पगला गजोधर in जनातलं, मनातलं
23 Feb 2015 - 7:25 pm

भाग १ | भाग २ | भाग ३ | भाग ४

'अरे हरदीप आज नयी बाइक'

'हा पाजी, आज वो कनद्दा से आई सुसान, मेरे नाल आई, अपनी बाइकको ग्राउंड पे छोड, उपरसे अपनी टीशार्ट, जीन्स, सारे कपडे उतार कर ग्राउंड पे फेक देके, बोली, हरदीप- I am offering you ANYTHING you want !'

'तो तुने क्या किया'

'क्या करता पाजी, बाइक उठाके चला आया '

वाङ्मयकथाविरंगुळा

खुशबू (भाग ४)

पगला गजोधर's picture
पगला गजोधर in जनातलं, मनातलं
20 Feb 2015 - 5:11 pm

भाग १ | भाग २ | भाग ३

'मुस्लिम व भारतनिष्ठा याबाबत तुझं काय मत आहे मुली ?'…

कॉफीचा घुटका घेता घेता अडखळत ती म्हणाली 'एक्सक्यूज मी … ?' रागाची ऐक सूक्ष्म छटा तिच्या चेहेर्यावरती उमटून गेली …
'सर माझ्या मुस्लिम असण्याबद्दल, हा टॉन्ट होता का ?'

'अजिबात नाही पोरी, तुला माहित नसेल, पण तुझ्या बापाला जवळून ओळखायचो मी, ऐक सच्चा सपूत होता तो मातीचा'

वाङ्मयकथाविरंगुळा

खुशबू (भाग ३)

पगला गजोधर's picture
पगला गजोधर in जनातलं, मनातलं
19 Feb 2015 - 2:48 pm

भाग १

भाग २

कॅप्टन, मला मिळालेल्या इंस्त्रक्शननुसार, तुम्ही व तुमचे दाढीवाले रोमिओची युनिट आजपासून डिसमेंटल करण्यात येत आहे,
तुम्ही आता १६ ग्रेनेडीअर च नेतृत्व करायचं आहे, तुमचे दाढीवाले रोमिओज, G (घातक) प्लाटून म्हणून ग्रेनेडीअरस मधे विलीन होतील.
बराच वेळ तो अधिकारी कॅप्टनला सूचना देत राहिला … संभाषणाचा शेवट करणार वाक्य त्याचा तोंडी आलं …
कोई शक ?
नो सर, अंडरस्टुड सर !
जयहिंद
जयहिंद

वाङ्मयकथाविरंगुळा

चटपटीत

खटासि खट's picture
खटासि खट in जनातलं, मनातलं
18 Feb 2015 - 11:45 pm

जालावर लंबुळक्या लेखात / भाषणात हमखास आढळणारी चटपटीत वाक्ये (काही घासून गुळगुळीत झालेली) यांचं संकलन इथे करूयात.

उदा.
वर्गीकरण एक

१. अर्धा ग्लास रिकामा आहे की अर्धा भरलेला आहे हे पाहणा-याच्या दृष्टीवर अवलंबून असतं.
२. सिस्टीम बदलू शकत नसेल तर सिस्टीमचा भाग व्हावे.
३. देश तुम्हाला काय देतो यापेक्षा ...
४. आपल्याला जे म्हणायचे आहे ते न म्हणता ते कसे "दिसेल" याची काळजी घेतली जाते.
५. आपल्यासाठी लोकशाही ही चैन आहे... ( अगागागा)

वर्गीकरण दोन

मौजमजाविरंगुळा

खुशबू (भाग १)

पगला गजोधर's picture
पगला गजोधर in जनातलं, मनातलं
17 Feb 2015 - 7:28 pm

'पाकिस्तानविरोधात क्रिकेट सामना जिंकणं म्हणजे युद्ध जिंकण्यासारखं आहे. माझा मुलगा पाकिस्तानविरुद्धच्या 'या' युद्धात शूर सैनिकासारखा लढला. त्यानं दाखवून दिलं की भारतीय मुसलमान हा आधी भारतीय असतो, मग मुस्लिम असतो!' हे उद्गार आहेत भारतीय क्रिकेट संघातील उद्योन्मुख वेगवान गोलंदाज मोहम्मद शामी याचे अब्बाजान मोहम्मद तौसिफ यांचे. गेल्या रविवारी पाकिस्तानविरुद्ध झालेला विश्वचषक स्पर्धेतील पहिला सामना भारताने मोठ्या फरकानं जिंकला.-----पेपरातली ही बातमी वाचता वाचता, खुशबूचे मन भूतकाळात मागे गेलं.
----------------------------------------

वाङ्मयकथाविरंगुळा

ह्युमन शॅडो ऑन डिव्हाईन ब्युटी'......एक लघूकथा. स्पर्धेसाठी नाही.....

जयंत कुलकर्णी's picture
जयंत कुलकर्णी in जनातलं, मनातलं
16 Feb 2015 - 7:18 pm

Human Shadow on Divine Beauty...

या गोष्टीचे नाव इंग्लिशमधे का आहे याचे उत्तर फार सोप्पे आहे. ज्या चित्रामुळे ही गोष्ट घडली त्या तैलचित्राचे नाव ब्रुनो फर्नांडिसने, म्हणजे ज्याने हे चित्र रंगविले होते, इंग्लिशमधे ठेवले होते. जे झाले ते लिहिले आहे त्यामुळे अलंकारिक भाषेला वाव नाही.....असो....

कथाविरंगुळा

'ति'ची गोष्ट

ज्योति अळवणी's picture
ज्योति अळवणी in जनातलं, मनातलं
14 Feb 2015 - 6:09 pm

तो.....
शनिवार

नेहमीच्या सवईने घरी येताना बागेतल्या नेहमीच्या वळणावर उभा होतो. त्या वळणावरचा काळ माझ्यासाठी गेली कित्तेक वर्ष तसाच थांबला आहे. आणि त्याची आता सवयही झाली आहे. रोज जस गणपति-मारुती स्त्रोत्र म्हणतो; तस रोज त्या वळणावर मी काही क्षणांसाठी फ़क्त माझा उरतो.

पण आजचा दिवस वेगळा आहे. आज ती दिसली. तोच जुना वड... तेच जुन बाक... आणि ती देखिल तशीच! काळजाचा ठोका चुकला. गडबडलो... आणि तिच्याशी बोलायची उफाळून आलेली उर्मि दाबून घरी आलो.

ती
शनिवार

कथाविरंगुळा