माहिती
डोमिसाईल हवंय.... ? ?
आता म्हणाल हे डोमिसाईलचं काय नवीनच फ्याड? तुम्हाला एक वेळ ''पी.एस.पी.ओ. '' माहीत नसेल तरी क्षम्य आहे . पण डोमिसाईल - महाराष्ट्रातल्या रहिवासाचं प्रमाणपत्र माहीत हवंच. मागची दहा वर्षे तुम्ही महाराष्ट्रात रहात असल्याचा पुरावा. तुम्ही म्हणाल इथंच तर असतो तीस वर्षं झाली - दुसरीकडे कुठं जाणारे? तुम्ही राहिवासी असालही महाराष्ट्राचे - पण तुमच्या पाल्याला प्रमाणपत्र मिळालंय का तसं?
बीएमएम २०१५ - नावनोंदणीकरता शेवटचे ५ दिवस
नमस्कार मंडळी,
२४ वर्षानंतर दक्षीण कॅलीफोर्नियात भरणारं बृहन्महाराष्ट्र मंडळाचं १७ वं अधिवेशन काही दिवसांतच सुरू होईल. नावनोंदणीसाठीची अंतीम तारीख २१ जून आहे. तेव्हा त्वरा करा.
अधिवेशनाच्या भोजन समितीने तुमच्यासाठी मेजवानीची तयारी केली आहे, ती तुम्ही या दुव्यावर पाहू शकता.
तुमची लिफ्ट किती सुरक्षित...?
दोनेक वर्षं झाली असतील या गोष्टीला .
सावंतकाका तसे मूळचे विदर्भातले . पण निवृत्तीनंतर पुण्यात स्थायिक झालेले. आमच्या संकुलात पाच मजली पंधरा इमारती आहेत - त्यातल्या एका इमारतीत रहात असत. जातायेता कधीतरी दिसत, पण ओळख अशी नव्हती.
लेणी
श्री. शशिकांत ओक यांनी पाताळेश्वरवरील लेखात बर्याच गोष्टींचा उहापोह केला आहे. त्यातील एक भाग म्हणजे "लेणी" या विषयावर मागितलेली माहिती. दुसरा बौद्ध धर्माचा भारतातील र्हास.. आज लेण्यांबद्दल थोडी माहिती बघू.
मी भारतातील मंदिरे या लेखमालेत "गिरिशिल्पे" या नावाखाली लेण्यांवर एक लेख लिहला होता. त्याची लिन्क
http://www.misalpav.com/node/16437
या लेखात आपल्याला लेण्यांविषयी बरीच माहिती मिळेल. त्या ठिकाणी लेणी ही मंदिरांचा एक प्रकार म्हणून पाहिली होती. आज श्री. ओकांना माहिती पाहिजे आहे ती जरा निराळी आहे म्हणून हा लेखनप्रपंच
ये दोस्ती ......
( १८ एप्रिल २०१५ रोजी या http://www.bbc.co.uk/news/blogs-ouch-32325809 संकेत स्थळावर दोन मित्रांची एक प्रेरणादायी कहाणी वाचनात आली. तिचे मराठी कथेत रुपांतर करताना, केवळ आणि केवळ एकच हेतू मनात आहे – लिहिणाऱ्या/वाचणाऱ्या सर्वांनी ‘एक तरी झाड लावावे, जगवावे, वाचवावे!’ )
हेग्झिया आणि वेंकी. उत्तर चीन मधील येली या छोट्याशा खेड्यातील दोन शाळूमित्र. दोघांत एखाद वर्षाचा फरक. पाठच्या भावंडासारखे सोबत वाढले. हसले. खेळले. ..... आणि दोघांच्या वाट्याला आलेले दुर्दैव आणि त्यावर केलेली मातही जगावेगळी!
निकाल (शतशब्दकथा )
आज धाव्वीचा निकाल लागला.
श्यात्तर टक्के पडले. आबांनी पेडे वाटले .
मला बरं वाटलं, निकालात नाव बरोबर छापलंय म्हणून !
''स्मिता गजानन यादव''
दादाच्या पाठीवर मी झाली त्यवाबी आज्जीला पोरगाच पायजेल व्हता .
पन मी झाली. माजीच चूक जनु !
आज्जी रडली. माज्यावरच चिडली. म्या तिला फशिवलं म्हनं .
नाव ठ्येवलं फशीबाई !
समद्या पोरी हासायच्या शाळंत.
* * *
माहिती हवीय कोल्हापूरविषयी.
शुक्रवारी रात्री कोल्हापूरला पोचून रविवारी दुपारी निघायचे आहे. ११ जणी सोबत आहेत. हॉटेल साठी सुचवण्या हव्यात सकाळी महालक्ष्मीचे दर्शन घेऊन खिद्रापूर करता येईल का? नेहमीची ठिकाणे सोडून काय पाहता येईल? कृपया मदत करा.
शेअरबाजार- बस्स 02 मिनिट्स...आपण काय करावे??
सध्या गाजत असलेल्या 'मॅगी' प्रकरणामुळे आज नेस्ले ईडिया कंपनीच्या शेअरने जवळजवळ 10% ची गटांगळी खाल्ली. हे प्रकरण मिडियात आल्यापासुन म्हणजेच गेल्या पंधराएक् दिवसांत हा शेअर सधारण 1000 रुपयांनी (म्हणजे जवळजवळ 14% घसरला) आपण, एका सामान्य गुंतवणुकदाराने या बाबत काय करावयास हवे असे आपणास वाटते??..
कर्मधर्मसंयोगाने मी याच विषयावर् अर्थपुर्णच्या येत्या मासिकात एक लेख लिहिला आहे. जरुर वाचावा. आपल्या प्रतिक्रिया, सुचनांचे स्वागत आहे. - प्रसाद भागवत
प्राधिकरण कट्टा २९ मे २०१५
लेख लिहायच्या सगळ्यात आधी मुविंचे कट्ट्याच्या आयड्याच्या कल्पनेबद्दल आभार मानतो. कट्ट्याच्या निमित्ताने का होईना मिपामंडळी आपल्या व्यस्त वेळापत्रकामधुन वेळ काढुन आली. हा संपुर्ण वृत्तांत नाही. कारण मी कट्ट्याची सुरुवातीची पंधरा मिनिट आणि शेवटचे दोन-तीन महत्त्वाचे तास नव्हतो. त्यामुळे संपुर्ण वृत्तांताची जबाबदारी नाखु'न'काका आणि वल्ली धरलेणीकर ह्यांच्यावर सोपावण्यात येत आहे.