माहिती हवीय कोल्हापूरविषयी.

नूतन सावंत's picture
नूतन सावंत in जनातलं, मनातलं
4 Jun 2015 - 2:27 pm

शुक्रवारी रात्री कोल्हापूरला पोचून रविवारी दुपारी निघायचे आहे. ११ जणी सोबत आहेत. हॉटेल साठी सुचवण्या हव्यात सकाळी महालक्ष्मीचे दर्शन घेऊन खिद्रापूर करता येईल का? नेहमीची ठिकाणे सोडून काय पाहता येईल? कृपया मदत करा.

जीवनमानमाहिती

प्रतिक्रिया

अन्या दातार's picture

4 Jun 2015 - 2:51 pm | अन्या दातार

५,६ आणि ७ तारखेचा प्लॅन बनवत आहात असे वाटते.
सध्या कोल्हापुरात पर्यटकांची खूपच गर्दी असल्याने हॉटेल बुकिंग करणे गरजेचे आहे. कोल्हापुरातील चांगली हॉटेल्स सांगायची झाली तर लिस्ट अशी -
प्रिमियम हॉटेल्स -
१. अ‍ॅट्रिया - बिझनेस हॉटेल असलेने दर्जा उत्तम असावा असा कयास. भाडेही जरा जास्तच असावे. प्रत्यक्ष अनुभव माझ्या माहितीत कुणालाही नाही.
२. पंचशील - उत्तम दर्जा.
३. रायसन्स रिजन्सी - अ‍ॅट्रियाचे जुळे भावंड.
४. सयाजी - नवीनच चालू झाले आहे.

बजेट हॉटेल्स -
१. सह्याद्री - नेहमी गजबजलेले लॉज. अनेक मिपाकरांना चांगला अनुभव आहे.
२. रणजित - परिख पुलाजवळ.
३. हॉटेल ओपल - ऑल टाईम हिट
४. रजत एक्झिक्युटीव
५. सम्राट - सह्याद्री हॉटेलच्या बाजूला

खिद्रापूरला जायला स्वतःचे वाहन नसल्यास टाळलेलेच बरे. नेहमीच्या ठिकाणात महालक्ष्मी मंदिर, पन्हाळा, ज्योतिबा, रंकाळा इतकेच अपेक्षित असेल तर नवा राजवाडा यादीत हवाच.
नृसिंहवाडीला जाऊन येता येईल. तिथे गेलात तर बासुंदी ओरपायला विसरु नका.

अमितसांगली's picture

4 Jun 2015 - 8:08 pm | अमितसांगली

बासुंदी खाण्यासाठी तरी वाडीला जाऊन या..

हाॅटेल ओपलची जेवायची सोय छान आहे.पण रुम्स दोन वर्षापूर्वी मला कळकट वाटल्या होत्या.

Maharani's picture

4 Jun 2015 - 10:00 pm | Maharani

ओपल खोल्या जरा कळकट आहेत..ओपल च्या जवळ हॉटेल विक्टर पैलेस आहे..ते चांगले वाटले..तिथे राहुन जेवायला ओपल ला जाऊ शकता..

त्रिवेणी's picture

4 Jun 2015 - 8:20 pm | त्रिवेणी

हो टे ल ओ प ल बी ग नो. फा र च बो ग स.़जे व ण ही ठी क.
अ यो ध्या चा अ नु भ व चां ग ला हो ता. बे फा प ण च्जां ग ला हो ता.

यसवायजी's picture

4 Jun 2015 - 8:35 pm | यसवायजी

हे असं लिहिताना त्रास नाही होत का तुम्हाला?
( वाचणार्‍याचा त्रास दुय्यम आहे. )

लिहीताना कसला आलाय त्रास? सगळं लिहून घ्यायचं आणि एकेक स्पेस द्यायची. गुर्जी स्टाईल प्रतिसाद लिहीताना मी पण तेच करतो. ;)

नूतन सावंत's picture

4 Jun 2015 - 10:48 pm | नूतन सावंत

१२ ते १५ चा बेत आहे दातारसाहेब.

संदीप डांगे's picture

5 Jun 2015 - 12:15 am | संदीप डांगे

हॉटेल पवेलिअन चांगलं आहे. http://hotelpavillion.co.in/

२०१२ मधे सहकुटूंब गेलो होतो. लोकेशन, टॅरिफ, रुम्स, जेवण आणि सर्विस चांगली होती. एकदा फोन करून खात्री करून घ्या. पावसाळ्यात जाताय. वातावरण धुंद असतं तिथे. लेटेस्ट फोटो बघून निर्णय घ्यावा ही विनंती.

दौर्‍यासाठी शुभेच्छा!

लई भारी's picture

5 Jun 2015 - 12:25 am | लई भारी

कावळा नाक्याजवळ 'के ट्री' नावाचे नविन हॉटेल सुरु झाले आहे. अनुभव चांगला आहे लोकांचा.
तिकडून जवळच 'वॄषाली' आहे, ते पण चांगले आहे असे ऐकिवात आहे.
कणेरी मठाला भेट देउ शकता. तिथले 'सिद्धगिरी वॅक्स म्युझियम' चांगले आहे. कोल्हापूर पासून १५-२० कि.मी. होईल.

खिद्रापुर साठी एक दिवस काढलेला उत्तम. प्रवासात वेळ जाईल. वाडी आणि खिद्रापूर एकत्र करता येईल. बासुंदी-पेढे याबद्दल अधिक सांगणे न लगे :)

भवानी मंडपात 'गंधार' मांसाहारी रेस्टॉरंट चांगले आहे.

शाकाहारी जरा वेगळे म्हणजे 'वूड हाऊस' - स्टॅण्ड वरून दाभोळकर चौकातून ताराबाई पार्क कडे जाताना डाव्या हाताला. मेथी-बेसन, भाकरी, फोडणी-भात मस्त असते.

खासबाग मैदाना जवळ(केशवराव भोसले नाट्यगॄहाशेजारी) खाउ गल्ली मध्ये 'राजाभाऊ भेळ'. किंबहुना बर्याच(जवळपास सर्व) ठिकाणी मिळणारी 'भडंग' भेळ मस्तच!

[[[मूळ प्रश्नात एवढी माहिती अपेक्षित नसावी पण विषय निघाला म्हटल्यावर राहवेना]]] :-)

नूतन सावंत's picture

16 Jun 2015 - 10:25 am | नूतन सावंत

सगळ्यांचे आभार.आम्ही पंचशीलमध्ये दोन दिवस राहिलो.कणेरी मठ पहिल्यांदाच पाहिला.लई भारी. तुमची सविस्तर माहिती देण्याची पद्धत आवडली.पण बासुंदीला फिशने आणि समुद्राने टक्कर दिल्याने मालगुंडला भेट दिली त्यासाठी गणपतीपुळ्यालाही भेट दिली आणि एक दिवस मुक्कामही केला. येतानाचा प्रवास रोमहर्षक झाला त्याबद्दलचा लेख टाकतेच आहे.

प्रचेतस's picture

16 Jun 2015 - 10:27 am | प्रचेतस

खिद्रापूरला नाही गेलात?

स्पंदना's picture

16 Jun 2015 - 11:25 am | स्पंदना

लय येळान धागा बगितलो!!

हरकत नाही. इतरांना फायदा होईल. (पक्षी: आम्हांला).

येवंद्याजी.