चित्रपट
दिल धडकने दो
खूप दिवसांपासून झोया अख्तर ह्यांच्या चित्रपटाच्या प्रतीक्षेत होते. ‘दिल धडकने दो’ चित्रपट आला आणि आम्ही ठरविले की सगळी कामे बाजूला ठेवून चित्रपटाला जायचे.
कॉमेडी-ड्रामा जानरा असलेल्या ह्या चित्रपटाने तगडी स्टार कास्ट घेउन प्रेक्षकांच्या हृदयाचा ताबा घेतला आहे.
झोया अख्तर ह्यांचे दिग्दर्शन आणि एकाहून एक दिग्गज कलाकार अशी सुरेली महफिल जमल्यावर उत्तम चित्रपट तयार होणार हे सांगणे न लागे!
प्राधिकरण कट्टा २९ मे २०१५
लेख लिहायच्या सगळ्यात आधी मुविंचे कट्ट्याच्या आयड्याच्या कल्पनेबद्दल आभार मानतो. कट्ट्याच्या निमित्ताने का होईना मिपामंडळी आपल्या व्यस्त वेळापत्रकामधुन वेळ काढुन आली. हा संपुर्ण वृत्तांत नाही. कारण मी कट्ट्याची सुरुवातीची पंधरा मिनिट आणि शेवटचे दोन-तीन महत्त्वाचे तास नव्हतो. त्यामुळे संपुर्ण वृत्तांताची जबाबदारी नाखु'न'काका आणि वल्ली धरलेणीकर ह्यांच्यावर सोपावण्यात येत आहे.
तनू वेड्स मनू रिटर्न
मित्रांनो काल तनू वेड्स मनू रिटर्न पाहिला, पहिला असा चित्रपट जो मला अगदी पहिल्या फ्रेम पासून शेवटच्या फ्रेम पर्यंत आवडला. साधी आणि सुंदर कथा, मोजक्याच व्यक्तिरेखा, चांगले कलाकार, नैसर्गिक अभिनय, साधे संवाद, साधी लोकेशन्स, प्रसंगानुरूप गाणी आणि योग्य सादरीकरण. चित्रपटाची कथा सांगावी अशी नाही ती प्रत्यक्ष चित्रपटगृहात जाऊन अनुभवावी अशी आहे. चित्रपटात कुठेही ओढून ताडून केलेले विनोद नाहीत किवा प्रेक्षकांच्या भावना पिळवटून रडवाणूक नाही. शेवटचा प्रसंग तर अतिशय उत्कृष्ट रित्या हाताळला आहे. संपूर्ण चित्रपट एक नितांत सुंदर अनुभव देऊन जतो.
कॉफी, समुद्र, कोर्ट, आणि बरंच काही...
गेल्या दीड-दोन महिन्यात जरा चंगळच केली. तशी नाटक-सिनेमाच्या बाबतीत आम्ही ती नेहमीच करत असतो पण गेल्या दीड-दोन महिन्यात जरा जास्तच केली. सिनेमा-नाटक माझं पहिलं प्रेम! कुठल्याही वेळेला चित्रपटगृहात जाऊन चित्रपट बघणे किंवा नाट्यगृहात जाऊन नाटक बघणे हा माझा सगळ्यात आवडता छंद. प्रत्येक चित्रपट किंवा नाटकाच्या बाबतीत लेख लिहिणे शक्य नाही म्हणून काही नाटक-चित्रपटांविषयी थोडं लिहिण्याचा हा एक प्रयत्न.
कॉफी आणि बरंच काही...
टाईमपास २ - बकवास फुल्ल टू
जवळपास २० वर्षांपूर्वीची माझी शोकांतिका सांगतो. देवाच्या दयेने (मार्कांच्या बाबतीत आम्ही अगदीच कंगाल होतो) एका शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात आम्हाला प्रवेश मिळाला. दिल खुश हो गया. महाविद्यालय सुरू होण्याची तारीख जशी जशी जवळ येऊ लागली तसे तसे आमचे निरागस मन कल्पनेच्या उंच उंच आकाशात एखाद्या मोरपीसासारखे तरंगू लागले. ऐन तारुण्याचे दिवस ते. आणि हिंदी सिनेमातल्या तारुण्यसुलभ प्रेमाविष्कारावर पोसलेले आमचे कोवळे मन ते! निष्पाप होते.
एक "टवाळ" संध्याकाळ
बर्याचं दिवसांपासुन व्हॉट्स अॅप गृप वरती किमान ३००० वेळा कट्टा करायच्या गोष्टी चाललेल्या होत्या. गेले २-३ आठवडे हो-ना-हो-ना करता करता शेवटी काल मोदक, मी, कपिलमुनी आणि अनाहितांचा लाडोबा असे चार जणांचा कट्टा ठरला. त्याचा एक वृत्तांत लिहायचा एक माफक प्रयत्न. कट्ट्याचं आयोजनं करतानाचं माझ्याकडुन एक मोठी चुक झाली ती म्हणजे वल्लींना फोन करायचा राहुन गेला :( (वल्ली मनापासुन सॉरी!! ). अन्या दातार कोल्हापुरला गेल्यानी आणि गुर्जीं फुलराणीच्या शोधात मार्केट यार्डामधे असल्यानी येउ शकले नाहीत. ;)
कोर्ट- एक समंजस चित्रभाषा.
चित्रपटात नायक किंवा नायिका किंवा दोघे असतात. चित्रपट आपल्याला त्यांची गोष्ट सांगतो किंवा एखादी गोष्ट त्यांच्या नजरेतून दाखवतो. ’कोर्ट’ मध्ये ’सिस्टीम’ हेच सिनेमाचं मुख्य पात्र आहे. लोकशाहीर, वकिल, न्यायाधीश आणि त्यांच्या आजूबाजूचे सगळेच या सिस्टीमच्या आधारे वावरणारी दुय्यम व्यक्तीरेखा आहेत. हा सिनेमा कोणा एकाची गोष्ट सांगत नाही तर ह्या सगळ्यांचे टेकू असलेली तरिही सगळ्यांच्या जगण्यातला महत्वाचा भाग असलेली सिस्टीम आहे तशी दाखवतो. इथे सिस्टीमच नायक आहे आणि खलनायकही. चित्रपटात जज्ज आहे, कोर्ट आहे तरिही जजमेंटल नसलेला असा हा चित्रपट.
कोर्ट
(ज्यांनी अजून हा चित्रपट पहिला नसेल त्यांनी आपल्या जबाबदारीवर पुढील उतारा वाचावा. )
(मी पहिल्यांदाच चित्रपटाबद्दल लिहित आहे. तेव्हा चूभूद्याघ्या)
_सुखी वैवाहिक जीवनाचा गुरुमंत्र (बायकोचं प्रगतीपुस्तकं)
पेर्णास्त्रोतः सुखी वैवाहिक जीवनाचा गुरुमंत्र
श्री. सौंदर्य ह्यांची माफी मागुन.
(काही तासांपुर्वी 'सुखी वैवाहिक जीवनाचा गुरुमंत्र ' हा लेख वाचला होता. त्या धाग्याचं स्वैर विडंबन म्हणुन आणि बायकोला मार्क्स कसे मिळवावेत ह्याचं मार्गदर्शन म्हणुन हा विडंबनप्रसवप्रपंच)
तुम्ही आयुष्यात खुष राहु इच्छिता? हा घ्या एक विडंबन मंत्र.
आपापल्या नवर्यांना खुश कसे ठेवाल? अगदी सोप्पं आहे. नवर्याला खुश ठेवणं हे बटाट्याची सुकी भाजी करण्यापेक्षा सोप्पं आहे. कसं?????? सांगतो.