चित्रपट

जा री जा री ओ कारी बदरीया.......

विशाल कुलकर्णी's picture
विशाल कुलकर्णी in जनातलं, मनातलं
23 Jan 2015 - 10:26 am

कधी कधी कसं होतं ना? एखादा संगीतकार , एखाद्या चित्रपटात एका वर चढ एक सुंदर गीते देवून जातो. मग प्रेक्षकाची - श्रोत्याची अवस्था "देता किती घेशील दोन कराने" (इथे "ऐकता किती ऐकशील दोन कानाने" असे वाचायलाही हरकत नाही ;) ) अशी होवून जाते. पण या सगळ्या आनंदात बरेच वेळा असेही होते की अत्युत्तम असे काही ऐकताना त्याच चित्रपटातील एखादे साधेच पण नितांत सुंदर असलेले गाणेही नकळत दुर्लक्षीत होऊन जाते.

संगीतचित्रपटआस्वाद

मेरा सुंदर सपना बीत गया.....

विशाल कुलकर्णी's picture
विशाल कुलकर्णी in जनातलं, मनातलं
22 Jan 2015 - 2:48 pm

पूर्वप्रकाशित ...

ती एक न उलगडलेलं कोडं होती. एक अधुरी राहून गेलेली कविता होती. तीन दशक..., जवळजवळ तीन दशके तीने आपल्या नजाकतभर्‍या , मादक स्वरांच्या जोरावर रसिकांच्या मनावर अनभिषीक्त साम्राज्य गाजवलं.

संगीतचित्रपटआस्वादलेखमाहितीप्रतिभा

बावन्नकशी अभिनयाचा राजकुमार ’फारुक शेख’ !

विशाल कुलकर्णी's picture
विशाल कुलकर्णी in जनातलं, मनातलं
21 Jan 2015 - 1:16 pm

नववी - दहावीचा काळ , खासकरून दहावीचा काळ थोडा विचित्रच होता, किंबहुना तो तसा असतोच. विचित्र एवढ्यासाठी की बरोबरच्या कुठल्याही मित्राला अगदी सुटीच्या दिवशी जरी विचारले,"चल बे, पिक्चर टाकु आज" , तर एकच उत्तर मिळायचे ...

"नाही बे, दहावीचे वर्ष आहे. अभ्यास कसला डेंजर आहे. आई-बाबा हाणतील धरुन पिक्चरला जातो म्हण्लं तर."

कलाचित्रपटआस्वादमाहितीप्रतिभा

नवे संस्थळः पाहावे मनाचे! तुमचे स्वागत आहे

पाहावे मनाचे's picture
पाहावे मनाचे in जनातलं, मनातलं
16 Jan 2015 - 11:22 am

मराठीत अनेक प्रकारच्या लेखनाला वाहिलेली काही संस्थळे अस्तित्वात आहेत. त्यावर उत्तमोत्तम ललित लेखन, माहितीपूर्ण लेखन, चर्चा, पाककृती, कथा, कविता इत्यादी अनेक गोष्टींची रेलचेल असते. मात्र एखाद्या विशिष्ट चौकटीत किंवा विषयाला धरून लिहिले जाणारे लेखन, ब्लॉग्जच्या स्वरूपात विखुरलेले आहे.

कलानाट्यचित्रपटमाध्यमवेधबातमीसंदर्भप्रतिभा

बॅक टु द फ्युचर

पगला गजोधर's picture
पगला गजोधर in काथ्याकूट
15 Jan 2015 - 7:36 pm

युनिव्हर्सल पिक्चर्स स्टुडियोचे 'बॅक टू द फ्युचर' सेरिजचे भन्नाट चित्रपट मध्य ८० च्या दशकात आले होते. कि ज्याची संकल्पना काळाची/चौथी-मितीवर बेतलेली होती. मोटाररुपी टाइम मशीनमध्ये चित्रपट आपल्याला थेट भविष्याचा वेध घेत काळाच्या पुढे घेवून धावायचा. भविष्यामधील जग कसे असेल? याची चुणूक पाहत असतानाच कथा पुन्हा एकदा त्यावेळच्या 'चालू वर्तमानात' यायची. प्रेक्षकांना मनात माहिती असायचं की, हे सारे खोटे आहे,पण ते सारे इतक्या परिणामकारक रीतीने चित्रपटात समोर यायचंकी ते नुसते पाहत न राहता त्याचाच एक भाग बनून अनुभवायचे. हे आज आठवण्याचं कारण कि त्या चित्रपटातील भविष्यकाळ, आज आपल्यासाठी वर्तमान आहे.

तुमच्या घराण्यातील अथवा परिचयातील कतृत्ववान अथवा दखल घेण्याजोग्या व्यक्तींची माहिती द्या

माहितगार's picture
माहितगार in जनातलं, मनातलं
15 Jan 2015 - 1:45 pm

नमस्कार,

आपल्या (तुमच्या) चालू अथवा मागच्या पिढीमध्ये अथवा परिचयात कतृत्ववान अथवा दखल घेण्या जोग्या व्यक्ती असू शकतात पण काही ना काही कारणाने त्यांच्या बद्दल लिहावयाचे, दखल घ्यावयाचे राहून जाऊ शकते. तर दुसर्‍या बाजूस अगदी प्रसिद्ध व्यक्तीबद्दलसुद्धा प्रत्यक्षात पुरेशा माहितीचा अभाव आढळून येतो अथवा माहितीत गॅप्स राहून जातात. या धाग्याच्या निमीत्ताने अशा आपल्या परिचयातील व्यक्तींबद्दल लिहिते करण्याचा हा छोटासा प्रयत्न. लगेच वेळ नसेल तर भविष्यात तरी लेखन करू इच्छित असाल अशी आपल्या परिचयातील नावे किमान नोंदवून ठेवावीत.

संस्कृतीकलानृत्यनाट्यसंगीतधर्मसाहित्यिकसमाजनोकरीविज्ञानक्रीडाअर्थकारणराजकारणशिक्षणचित्रपटप्रतिभा

मिपा मराठी डायलॉग......

पगला गजोधर's picture
पगला गजोधर in काथ्याकूट
11 Jan 2015 - 3:50 pm

मध्यंतरी जालावरती ऐक पिंक टाकलेली पहिली, गमतीशीर वाटली. इंग्रजी चित्रपटांचे जगप्रसिद्ध डायलॉगस गुजरातीत भाषांतरित केल्यास, किती मनोरंजक होतात हे जाणवले, इथे व्याकरण, भाषांतराचे नियम, वैगरे गद्य गोष्टींना स्थान न देत, केवळ मनोरंजनात्मक हेतू ठेवून, पडलेल्या जिलब्या होत्या. त्याच/ तशाच प्रकारे आपण मराठीत हे जगप्रसिद्ध डायलॉगस भाषांतरित केले तर ? मला गुजराती तसूभरही येत नाही, तरीही अंदाजे याचा अर्थ उमगून मजा वाटली.

लोकमान्य - एक युगपुरुष

मंदार दिलीप जोशी's picture
मंदार दिलीप जोशी in जनातलं, मनातलं
5 Jan 2015 - 8:01 am

लोकमान्य बाळगंगाधर टिळक. काही भारतीयांची नावे घेतली की माझे मस्तक आपोआप आदराने झुकते, त्यातलं हे महत्त्वाचं नाव. लोकमान्य. दुसरं काहीही नाही. संत नाही, महंत नाही, महात्मा नाही, देवमाणूस नाही, किंवा तत्सम काहीही नाही. लोकमान्य. लोकांना मान्य असलेला तो लोकमान्य. बास्स.

चित्रपटआस्वादसमीक्षा

कोटीच्या कोटी उड्डाणे !!!!

चिनार's picture
चिनार in जनातलं, मनातलं
4 Jan 2015 - 5:56 pm

मनोरंजन" या शब्दाची व्याख्या प्रत्येक माणसागणिक बदलते.कोणाला काय आवडेल किंवा कोणाचे कशाने मनोरंजन होईल ह्याला काही नियम नाही.मराठी किंवा हिंदी सिनेमांच्या बाबतीत तर ही गोष्ट तंतोतंत लागू पडते. 

चित्रपटप्रकटन

"दि इन्टरव्ह्यू"

विकास's picture
विकास in जनातलं, मनातलं
28 Dec 2014 - 2:45 am


​भारतात "पीके"च्या निमित्ताने तुरळक टिका चालू आहे. तो चित्रपट अजून पाहीलेला नसल्याने त्यावर भाष्य करण्याचा प्रश्न नाही. पण जे काही संतुलीत व्यक्तींकडून ऐकले त्यावरून असे दिसते की (हिंदूंच्या विरोधात आहे वगैरे) टिका अनाठायी असावी. ती असोत अथवा नसोत, एक स्वागतार्ह दिसले ते म्हणजे नुसतेच ओरडणे चालू आहे. कोणी या चित्रपटावर बंदी घाला असे म्हणल्याचे वाचनात तरी आले नाही. हे नक्कीच पुढचे पाऊल आहे. असो.

चित्रपटसमीक्षा