लय भारीचा टाइमपास
हा काही लय भारी किंवा टाइमपासचा रिव्ह्यू नाही. तसेही या शिर्षकाचा आणि खालील लेखाचा काही संबंध नाही.
हा काही लय भारी किंवा टाइमपासचा रिव्ह्यू नाही. तसेही या शिर्षकाचा आणि खालील लेखाचा काही संबंध नाही.
तर बरं का, एकदा एका बाप्याची पतंग कटली! म्हणजे कुणी काटली नाही. तर कणीला जिथे मांजा बांधतात ना, तिथेच निसटली. आता लोंबणारा मांजाच नाही, त्यामुळे ती काय टपरी पोरांना भेटली नाही. ती गेली उडत उडत आधीच्या उडवणार्याकडे! तिला वाटलं, आपल्याला बघून त्याला आनंद होईल. पण त्याच्याकडे तर कोर्या पतंगांची थप्पीच होती! आणि एका सुंदर पतंगीला तो कणीच बांधत होता. त्याने कटलेल्या पतंगीला पाहिलं आणि छदमीपणे म्हणाला, तू कशाला आलीस परत? आता तुझा नंबर ही सगळी चळत संपल्यावर! कटलेली पतंग फार निराश झाली. एकदम दिशाहीनपणे उडायला लागली. एका अंबॅसॅडर चालवणार्या डायवरला मिळाली.
"सून-मुलगा अति नालायक आणि वाईट असतात पण आई-वडील-नणंद-जावई ही माणसे देवापेक्षाही श्रेष्ठ आणि आदर्श माणसं असतात" असा संदेश देणारे मराठी चित्रपट बंद होत आहेत आणि मराठी निर्माते-लेखक-दिग्दर्शक प्रगल्भ होत आहेत असे मला वाटायला लागले असतांनाच मध्यंतरी एक "स्वातंत्र्याची ऐशी तैशी" हा चित्रपट आला आणि वाटलं की कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडंच राहाणार म्हणजेच मराठी चित्रपट हे सून-मुलगा द्वेष्टेच राहाणार!! असे हे चित्रपट नाण्याच्या केवळ एकाच बाजू साठी बनवले जाणारे चित्रपट असतात. नाण्याला दुसरी बाजू असते हेच मुळी त्यांना मान्य नसतं.
हो हो, 'हमशकल्स' हा एक मैलाचा दगडच आहे. 'हमशकल्स'ला नाके मुरडणार्या तमाम अभिजनांच्या चित्रपटीय जाणीवांची मला अक्षरशः कीव येते. अहो, असं धाडसच कसं काय करू शकतात ही लोकं? 'हमशकल्स' हा चित्रपट म्हणून उच्च दर्जाचा तर आहेच परंतु माणसाच्या अंतरंगाचा इतका तपशीलात धांडोळा घेणारी, माणसाच्या मनाच्या बहुपेडी जडण-घडणीची नुसतीच दखल घेणारी नव्हे तर इतक्या सुबक पद्धतीने ती जडण-घडण दुनियेसमोर निर्भीडपणे मांडणारी ही कलाकृती अजरामर आहे यात शंकाच नाही. कल्पनाविलास ही संकल्पनाच तोकडी पडेल अशी कल्पनाउड्डाणांची आणि कल्पनाभरारीची विस्मयकारक किमया 'हमशकल्स' या चित्रपटात अनुभवायला मिळते हे कसं विसरू शकतो आपण?
बापू सदावर्ते (अशोक सराफ) एक निवृत्त विधुर. एका मोठ्या बंगल्यात तो आपल्या रंगा (अनिकेत विश्वासराव) नावाच्या तरूण अविवाहीत मुलाबरोबर राहतो. बापू स्वतः अत्यंत काटकसरी व प्रचंड भांडकुदळ. भांडणात कोणालाही हार जात नाही.
शांती चिटणीस (वंदना गुप्ते) आपल्या वयात आलेल्या पण अत्यंत पोरकट असलेल्या राधिका (मृण्मयी देशपांडे) नावाच्या
मुलीबरोबर एकटीच राहणारी विधवा. ती सुद्धा प्रचंड भांडकुदळ. राधिका जराशी पोरकट, काहीशी अर्धवट.
नमस्कार मिपाकरहो...
मिपावरील माझ्या मित्रानो (कौतिक करणारे माझे मित्र आणि मला शिव्याशाप देणारे सुद्धा माझेच मित्र ), मी इथे मिपावर काय टंकतो, त्यामागचं पगालापन इथे देत आहे, ते तुम्ही नेहमीप्रमाणेच खेळीमेळीने, कोणताही पूर्वग्रह न बाळगता, संयमाने समजून घ्यालच, असा मला तुमच्यावर विश्वास आहेच.
मराठी जालावरील जुने व्यक्तिमत्त्व, मिसळपावचे पहिल्या दिवसापासुनचे सदस्य, बे एरियातील मुरलेले कट्टेकरी आणि माझे परममित्र श्री बेसनलाडू सद्ध्या मुंबईत आले आहेत.
येथील गँगचा आणि त्यांचा परिचय व्हावा म्हणून शनिवार दि. 24 रोजी दादर पुर्व स्थानकासमोरील ऋषी हॅाटेल येथे सायंकाळी ६ वाजता भेटण्याचे ठरवले आहे.
तुर्तास मी, रामदास काका, प्रास, सुड, किसन आणि कस्तुरी इतके मेंबर इन्न आहेत. इतरांना कळावे म्हणून हा धागा.
समन्वयासाठी मोबाईल क्रमांक हवा असल्यास व्यनी करावा.
चोरी चोरी चित्रपटातील सगळीच गाणी गाजली. त्यातले कोणते एक निवडायचे ठरवणे हे खूप अवघड आहे. चोरीचोरीतील प्रत्यक गाण्याचे स्वतःचे असे एक वैशिष्ठ्य आहे. अर्थात लता मंगेशकर हा प्रत्येक गान्यातील कॉमन फॅक्टर आहे.
एक पे एक फ्री ही मार्केटिंग मधली हमखास यशस्वी होणारी युक्ती आहे. चित्रपटाच्या रंगीत दुनियेतही ती वापरली जाते पण नेहमी यशस्वी होईलच असे नाही. असं बघा पहिले फरहा आली दोन चार चित्रपट करून विंदू कुमार बरोबर लग्न करून स्थिरावली. पण तिच्या पावलावर पाउल टाकून तब्बू आली. आणि पहिला प्रेम सोडा,( पहिला डाव भुताच असतो ना... ) पण प्रत्येक चित्रपटाद्वारे उत्तम काम करून तिने आपला असा क्लास निर्माण केला. सनी देवलच्याच घरातून बॉबी आला. तो बेताब आम्ही थेटरात जाउन बघितला होता हे कबूल करणे ही आता तरुणपणी केलेली एंबरासिन्ग कामे ह्या फोल्डर मध्ये टाकून डिलीट करायची बाब झाली.