चित्रपट

आणि रजनीकांत रडला - धूम ३

मृत्युन्जय's picture
मृत्युन्जय in जनातलं, मनातलं
22 Dec 2013 - 10:57 pm

१८ मे १९७४ भारतीय इतिहासात एक अतिशय क्रांतिकारक घटना घडली. पोखरण मध्ये पहिली अण्वस्त्र चाचणी घेण्यात आली आणि भाभा अणुसंशोधन केंद्राच्या प्रमुखांनी डॉ. होमी सेठनांनी पंतप्रधानांच्या सचिवांना दूरध्वनीवरुन ही रोमांचकारक बातमी देताना सांकेतिक भाषेत सांगितले "आ़णि बुद्ध हसला. काही लोकांच्या मते "आणि बुद्ध हसला" वगैरे असे काही सांगितले गेले नाही. ही नंतर बुद्धजयंतीचे निमित्त साधुन काही लोकांच्या डोक्यातुन निघालेली सुपीक कल्पना असेल.

कलाबालकथाऔषधोपचारमौजमजाचित्रपटसद्भावनाशुभेच्छाप्रतिक्रियाआस्वादसमीक्षालेखअनुभवमतशिफारससल्लामाहितीविरंगुळा

टेरीचा बाश्शाखान : रोमांचकारी अनुभव !

सुधीर मुतालीक's picture
सुधीर मुतालीक in जनातलं, मनातलं
8 Dec 2013 - 9:06 pm

असे माझे होते कधी कधी ! मित्राच्या आग्रहाखातर एखादी गोष्ट केली जाते किंवा बघितली जाते. माझ्या दृष्टीने ती गोष्ट फारशी दखलपात्र नसेल, माझी रुची नसेल. पण झाल्यावर वा बघितल्यावर असे वाटते की आपण हे केले नसते तर आयुष्यातल्या केवढ्या मोठ्या आनंदाला मुकलो असतो.…. गेल्या आठवड्यात असेच घडले. ज्येष्ठ पत्रकार, भास्कर समूहाच्या दिव्य मराठीचे मुख्य संपादक पद्मश्री कुमार केतकर माझे स्नेही आहेत. "खास एवढ्यासाठी यावे लागले तरी ये तुझी मुंबई वारी व्यर्थ जाणार नाही हे निश्चित." निमंत्रण होते एका माहितीपटाच्या सादरीकरणाचे.

इतिहासचित्रपटप्रकटनप्रतिक्रियासमीक्षाअनुभवमाहितीप्रतिभा

ज्येष्ठ अभिनेते- दिग्दर्शक - श्री. विनय आपटे यांचे मुंबईत दु:खद निधन*~*~*~*

मृगनयनी's picture
मृगनयनी in जनातलं, मनातलं
7 Dec 2013 - 8:57 pm

रंगभूमीवरील, नाट्य-सिनेसृष्टीतील ज्येष्ठ कलाकार- दिग्दर्शक- "विनयजी आपटे" यांचे अन्धेरी येथील अंबानी हॉस्पिटल'मध्ये दीर्घ आजाराने दु:खद निधन झाले... खरोखर या हरहुन्नरी अभिनेत्याचे असे 'जाणे' चटका लावून गेले.
*~*~*~*~*~*~* भावपूर्ण श्रद्धांजली...*~*~*~*~*~*~*

समाजचित्रपटबातमी

कथा

मृत्युन्जय's picture
मृत्युन्जय in जनातलं, मनातलं
3 Dec 2013 - 4:08 pm

ससा आणि कासवाची गोष्ट आपण सगळ्यांनीच कधी ना कधी ऐकली वाचली असेल. "Slow & Steady wins the race". हे कथेच तात्पर्य. याच कथेच्या पुढचा भाग असा की सश्याला उपरती होते की तो जर कुठे लोळत पडला नसता तर जिंकला असता. ससा परत एक शर्यत ठरवतो आणि यावेळेस आळस न करता पळत राहतो. जिंकतो. कासवाला समजते हे काही त्याचे डोमेन नाही. अशीच शर्यत लावली तर तो हारत राहिल. तो परत एक शर्यत ठरवतो. फक्त वेगळ्या मार्गाने. यावेळेस त्यांच्या शर्यत मार्गामध्ये एक नदी असते. ससा पळत पळत पुढे जातो मात्र नदी ओलांडता येत नसल्याने अडखळतो. अखेर एका फार दूरच्या मार्गाने पळायला लागतो.

कलाकथाचित्रपटआस्वादसमीक्षाशिफारसविरंगुळा

अनुराग कश्यपचे सेन्सॉर बोर्डाला आव्हान

हुप्प्या's picture
हुप्प्या in काथ्याकूट
27 Nov 2013 - 10:58 am

सिनेमात धूम्रपान दाखवले तर तिथे धूम्रपान हानीकारक असल्याचे बंधन सेन्सॉरने घातले आहे ते व्यक्तीस्वातंत्र्याला मारक आहे असे अनुराग कश्यपचे मत आहे.
असले डिसक्लेमर्स दाखवल्याने रसभंग होतो असे मलाही वाटते. लोकांना अशा व्यसनापासून मुक्त करण्याची जबाबदारी सिनेमा निर्मात्यांची आहे का? असाच आचरटपणा आणखी वाढवायचा असेल तर स्मगलिंग, भ्रष्टाचार, चोरी, खून, बलात्कार अशी दृश्ये दाखवताना तिथेही असे करणे बेकायदा आहे अमुक एक शिक्षा होऊ शकते असे डिस्क्लेमर्स दाखवा असा सेन्सॉर आग्रह धरू लागला तर काय?

खरोखरच हे इतके जीवघेणे असेल तर सरकार ते थेट बेकायदेशीर का नाही ठरवत?

चित्रपटांचे शेवट/ट्विस्ट कितपत पटतात?

दिपक.कुवेत's picture
दिपक.कुवेत in काथ्याकूट
18 Nov 2013 - 5:01 pm

धाग्यास कारण कि अगदि अलीकडेच "एक दुजे के लिये" (परत) बघत बसलो होतो. त्यात शेवटि सपना-वासु मरुन पिक्चर संपतो. पुर्वी असंहि एकलेलं कि हा चित्रपट बघितल्यावर म्हणे बर्‍याच पेमी युगुलांनी आत्महत्या केली होती. तसचं "हम आपके है कौन" चं सगळं सुरळित/चांगलं चालू असताना रेणुका शहाणेला जिन्यावरुन पाडुन मारायची काय गरज होती का? गोडिगोडित चित्रपट संपवता आला असता कि! बिचार्‍या त्या टफिला ती गेल्यावर कित्ति कित्ति वाईट्ट वाटलं. ह्रुतिकला अगदि त्याच्या पहिल्याच चित्रपटात मारुन मग परत जिवंत केलं.

तर तुमचं मत काय? हे असे शेवट्/ट्विस्ट कितपत योग्य?

"नो स्मोकिंग" समजलेला प्रेक्षक ?

मराठी कथालेखक's picture
मराठी कथालेखक in काथ्याकूट
14 Nov 2013 - 7:04 pm

मिपा वरील काही धागे म्हणजे त्यातले प्रतिसाद बघताना असा दाट संशय मनात आला की "नो स्मोकिंग" सिनेमा समजलेला प्रेक्षक अस्तित्वात असावा, आणि त्यातही तो मिपावर आहे अशी शंका मनात आली.

एखाद्या धाग्यावर विषयांतर करणे वा झालेल्या विषयांतराला खतपाणी घालणे (वा काडी लावणे ?) हे तत्वात वगैरे फारसे बसत नसल्याने "नो स्मोकिंग" या अचाट सिनेमाबद्दल नवीन धागा काढावा असा विचार मनी आला.

चित्रपट समीक्षा: क्रिश ३

निमिष सोनार's picture
निमिष सोनार in जनातलं, मनातलं
4 Nov 2013 - 5:13 pm

चित्रपट समीक्षा - क्रिश ३
दर्जा- * * *
चित्रपटाचा प्रकार - वैज्ञानिक कल्पना, फॅण्टसी आणि ऍक्शन
कलाकार -
निवेदकाचा आवाज - अमिताभ बच्चन
क्रिश आणि रोहित मेहेरा - हृतिक रोशन
प्रिया - प्रियांका चोप्रा
काया - कंगना राणावत
काल - विवेक ऑबेरॉय

सुरुवातीला थोडक्यात कथा पाहू :

चित्रपटविचार