चित्रपटांचे शेवट/ट्विस्ट कितपत पटतात?

दिपक.कुवेत's picture
दिपक.कुवेत in काथ्याकूट
18 Nov 2013 - 5:01 pm
गाभा: 

धाग्यास कारण कि अगदि अलीकडेच "एक दुजे के लिये" (परत) बघत बसलो होतो. त्यात शेवटि सपना-वासु मरुन पिक्चर संपतो. पुर्वी असंहि एकलेलं कि हा चित्रपट बघितल्यावर म्हणे बर्‍याच पेमी युगुलांनी आत्महत्या केली होती. तसचं "हम आपके है कौन" चं सगळं सुरळित/चांगलं चालू असताना रेणुका शहाणेला जिन्यावरुन पाडुन मारायची काय गरज होती का? गोडिगोडित चित्रपट संपवता आला असता कि! बिचार्‍या त्या टफिला ती गेल्यावर कित्ति कित्ति वाईट्ट वाटलं. ह्रुतिकला अगदि त्याच्या पहिल्याच चित्रपटात मारुन मग परत जिवंत केलं.

तर तुमचं मत काय? हे असे शेवट्/ट्विस्ट कितपत योग्य?

प्रतिक्रिया

चिरोटा's picture

18 Nov 2013 - 5:29 pm | चिरोटा

ट्वीस्ट पाहिजेत की राव. नुसतेच सरळसोट दाखवले तर काय मजा आहे? डी.डी.एल्.जे.तला 'जा सिमरन जा' वाला ट्वीस्ट कसा होता?

टवाळ कार्टा's picture

18 Nov 2013 - 5:31 pm | टवाळ कार्टा

पुचाट :D

चिरोटा's picture

18 Nov 2013 - 6:57 pm | चिरोटा

आपल्याही तो लक्षात आहे हे पाहून बरे वाटले.

नानबा's picture

18 Nov 2013 - 9:23 pm | नानबा

पुचाट :D

:))

टवाळ कार्टा's picture

18 Nov 2013 - 5:30 pm | टवाळ कार्टा

चान चान ;)

सुहासदवन's picture

18 Nov 2013 - 7:12 pm | सुहासदवन

आलो तेव्हा वाटलं काहीतरी ट्विस्ट असेल इथे पण सरळसोट अगदी.

अग्निकोल्हा's picture

18 Nov 2013 - 9:17 pm | अग्निकोल्हा

.

संचित's picture

18 Nov 2013 - 10:30 pm | संचित

एवढ्यात पाहिलेला murder 3 चा ट्विस्ट मस्त वाटला.

मृत्युन्जय's picture

18 Nov 2013 - 10:54 pm | मृत्युन्जय

आयला माझा. शेवट बघायचा राहिलाय, काय होते शेवटी?

बघा आता! सिनेमात ट्विस्ट नसले तर ह्या धाग्यासारखाच रटाळ नाही का होणार सिनेमा?

काही चित्रपटांच्या शेवटचे ट्विस्ट झेपण्याइतपत असले तर पटतात.
जसा शाहरूख खानच्या पहिल्या डॉन मध्ये फरहान अख्तरने शेवटच्या ५ मिनीटांत दिलेला ट्विस्ट अगदी भन्नाट होता.
त्याउलट डोक्यात गेलेला ट्विस्ट म्हणजे आमीरच्या तलाश चित्रपटाचा. ती करीना भूत असते काय, त्याला ती पाण्याखाली दिसते काय, त्याला वाचवते काय, सगळंच बंडल...

मी-सौरभ's picture

19 Nov 2013 - 8:17 pm | मी-सौरभ

सहमत
मला कहानी आणि भुलभुलैय्या मधले ट्विस्ट आवड्ले ब्वॉ!!

माझा फेवरेट, आवडता, बेस्ट असा शेवटाचा दि एन्ड:-
(मंगलामधे इन मिन तीन प्रेक्षक असताना पाहिलेला पिच्चर.)
विक्रम भट्ट's: 1920 Evil returns

s

मराठी_माणूस's picture

19 Nov 2013 - 8:35 pm | मराठी_माणूस

लंचबॉक्स चा ट्विस्ट नसलेला बकवास शेवट

तिरकीट's picture

20 Nov 2013 - 2:58 pm | तिरकीट

Special 26 आणी A Wednesday चा शेवट सुद्धा मस्त जमून आलाय...

कवितानागेश's picture

20 Nov 2013 - 3:09 pm | कवितानागेश

'गुप्त' सिनेमा आठवतोय का?
त्यावेळेस एक किस्सा ऐकला होता. एकजण त्या सिनेमाला जात होता. उतरता॑ना रिक्षावाल्याशी पैशावरुन काहितरी वाजलं. बराच वेळ भांडण झालं. शेवटी रिक्षावाला वैतागून म्हणाला 'च्यायला जाउ देत पैसे. जा तुम्ही. पण शेवटी काजोलच खुनी असते!! ' :D