क्या अच्छे दिन आ गये ?
अच्छे दिन आ गये .. ही जाहिरात करत मोदी सरकार सत्तेवर आले. सरकारवर टीका होताच मोदीप्रेमी म्हणायचे अरे थांबा. वाट पहा .
पण आता पाच वर्षातील अर्धे वर्ष संपत आले. या सहा महिन्यात अच्छे दिन कुठे खरोखरच आलेत का ?
१. महागाई कमी करु म्हणणार्या सरकारने महागाई वाढवुनच ठेवली आहे. पेट्रोल डिझेलचे दर सव्वा रुपयाने कमी झाले की मोदी प्रेमी आनंदाने चित्कारतात ! पण रिक्षाचे भाडे मात्र दोन रुपयानी का वाढले कुणी सांगेल का ?
डायलिसिसचे दर जवळजवळ २० % ने वाढले.
रक्ताच्या एका पिशवीचे दर आठशे हजारावरुन दोन हजारात गेले.
प्लेटलेटही महाग झाले. सातशे वरुन एकदम पंधराशे !