श्रीगणेश लेखमाला १: शिक्षणक्षेत्र
मी आज शिक्षणाच्या क्षेत्रात आहे, त्याचं एक अत्यंत महत्त्वाचं कारण म्हणजे 'माझ्या आईकडे सुट्टे पैसे नव्हते.'
मी आज शिक्षणाच्या क्षेत्रात आहे, त्याचं एक अत्यंत महत्त्वाचं कारण म्हणजे 'माझ्या आईकडे सुट्टे पैसे नव्हते.'
मी:
तिचं घर कसं भणंग. एकटं. मुख्य वाड्यापासुन जरासं दुर.
तिचे म्हातारे आईबाप, थोरले भाऊ, त्यांच्या बायका पोरं वाड्यात राहायचे. ही बाहेरच्या खोलीत. एकटीच. बिनलग्नाची.
रात्री जेवणानंतर घरामागच्या झाडीत मशेरी घासत फिरण्याची तिला विचित्र सवय होती.
तिची आणि माझी पहीली भेट इथलीच.
एका रात्री ती मला अशीच एकटी दिसली.
जवळ जावुन मी तिची विचारपुस केली.
घडाघडा बोलली. खरतरं मी तिच्यापुढे एक अनोळखी बाई होते. पण पहिल्या भेटीतच तिनं आयुष्यभराचं रडगाणं माझ्यासमोर सुरु केलं.
माझ्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत कितीतरी वेळ एकटीच बोलतच राहीली. थोडी चक्रमच वाटली.
संध्याकाळी ऑफिस मधून बाहेर पडलो. राजीव चौक मेट्रो स्टेशनच्या दिशेने चालू लागलो. भुरका-भुरका पाऊस पडत होता. भुरक्या पाऊसाचे एक चांगले आहे, आपल्याला पाऊसात भिजण्याचा आनंद हि मिळतो आणि आपण जास्त ओले चिंब हि होत नाही. नजरे समोर एक अंधुक आकृती दिसू लागली. असेच एकदा तिच्या सोबत एका संध्याकाळी भुरका-भुरका पाऊसाचा आनंद घेत नेहरू पार्कच्या हिरवळीवर फिरत होतो.... पण तो पाऊस.... केंव्हाच हवेत विरून गेला.. किर्रर्र बाईक थांबण्याचा आवाज, मी हादरलोच.. अंकलजी कहाँ खोये हो, कम से कम रास्ता तो देख कर पार किया करो. सॉरी, मी पुटपुटलो. हायसं वाटल.
डिस्क्लेमर : मला फोटो काढता येत नसल्याने मी फोटो काढत नाही.
परवा ठरल्याप्रमाणे, कालचा "३८-बँकॉक-स्ट्रीट-घोडबंदर रोड ठाणे कट्टा" सुरळित पार पडला.
मी आणि सौ.मुवि, कळव्याला, मि.ट्का, ह्याच्या कडे गेलो.
टका आणि मोदक, मुंबईच्या वाहतूकीमुळे थोडे उशीराच आले.
मग टकाच्या गाडीतून कट्ट्याच्या ठिकाणी रवाना झालो.
कळवा ते घोडबंदर हा प्रवास मजल-दरमजल करत गाठला.सुदैवाने टकाच्या मातोश्रींनी वाटेत खायला म्हणून काजू दिले होते.आनच्या सौ.ने आणि मि.मोदक ह्यांनी काजू खात-खातच प्रवास पुर्ण केला.
मी आणि टका मात्र गप्पा-गोष्टी करण्यात दंग होतो.
वटवृक्षाला बहर आला होता.
लाल लाल कळ्यांचा गंध वातावरणात दरवळत होता.
कित्येक भ्रमर त्या गंधाला हुंगत कळ्यांपर्यंत पोहोचायचे.
शेवंता त्या वटवृक्षाखाली बसायची. जमीनीवर पडलेली एखादी कळी ऊचलायची. कधी डोक्यात सजवायची, कधी पुस्तकात ठेवायची, तर कधी त्याला खाऊनच टाकायची.
नुकत्याच समजलेल्या बातमीनुसार, मिपाकर मोदक (हे लायन सो-सो, श्री-अमुक-तमुक. अशा चालीवर वाचले तरी चालेल.), सध्या मुंबई परीसरात असून ते कट्टा करायला तयार आहेत असे समजले.
जास्त पाल्हाळ न लावता, कट्ट्या संर्दभात माहिती देत आहे.
तारीख - १५-०९-२०१५
वेळ - रात्रीचे ८
ठिकाण - ३८, बँकॉक स्ट्रीट, ठाणे. (लिंक देत आहे.)
https://www.zomato.com/mumbai/38-bangkok-street-kasarvadavli-thane-west
उत्सवमुर्ती - मिपाकर मोदक
आयोजक - टका आणि मुवि
भुरभुर चिमणी बाळाच्या हातावर जाऊन बसली.
बाळराजे खुश झाले. भुरभुर चिमणीला टकामका बघत राहीले.तान्हुला हात पुढे करून तिला पकडायला लागले. चिमणी भुर्रकन आकाशी ऊडाली. बाळराजे बघतच राहीले.बोबडया बोलांनी च्युव च्युव करत तिला परत बोलवु लागले. चिमणी झाडाच्या फांदीवर बसली. तिथुनच बाळराजेंना न्याहाळु लागली. मधुनच उडायची, वळचणीला फिरायची. बाळराजे दुडुदुडु धावले. चिमणीला पकडायचा पण करून राहिले. चविष्ट अमिषं दाखवुन तिला फशी पाडण्याचा प्रयत्न करू लागले. पण चिमणी बधली नाही. बाळराजेंच्या कचाट्यात सापडली नाही.
मला तुझ्याशी खूप खूप बोलायचं आहे! तुला पत्र लिहिताना प्रचंड आनंद होतोय. अक्षरश: शब्द सुचत नाहीत. काय लिहू, किती लिहू आणि कसं लिहू अशी अवस्था होतेय! खूप भरून येतंय.
तू! तुझ्याबद्दल काय लिहू? लिहून व बोलून जे सांगता येईल ते फार फार थोडं आहे. कणभर आहे. पण तू, तुझं व माझं नातं, तू माझ्या आयुष्यात आलीस तो काळ व तिथून बदललेलं आयुष्य... काय काय आणि कसं सांगू!
( १.यल्लम्माच्या आवारातल्या कथा आता 'शिंदळ' याच नावानं टंकत जाईन, प्रत्येक कथा स्वतंत्र ठेवण्याचा प्रयत्न असेल, अर्थात वाचकांना आवडले तरचं, उगाच मिपाची बँडविड्थ खर्ची नको- आभार
२. केवळ एक पार्श्वभुमी म्हणुन 'शिंदळ' ही कथा वाचा. www.misalpav.com/node/32762 )
शिंदळ : आक्रमकांची नवी फळी
यल्लमाच्या पायऱ्यावर सुनी संध्याकाळपर्यंत बसुन होती.
दिवसभर देवळात भक्तांची रेलचेल होती.
त्यांनी देवीपुढं ठेवलेले पुरणपोळी, शिकरण, नैवैद्य तिनं एका आडबाजुला साठवले होते.
आज दिवसभरं ती तेच खात होती.
अंधारायला आल्यावर सगळा प्रसाद फडक्यात बांधुन घराकडे चालु लागली.