वटवृक्षाला बहर आला होता.
लाल लाल कळ्यांचा गंध वातावरणात दरवळत होता.
कित्येक भ्रमर त्या गंधाला हुंगत कळ्यांपर्यंत पोहोचायचे.
शेवंता त्या वटवृक्षाखाली बसायची. जमीनीवर पडलेली एखादी कळी ऊचलायची. कधी डोक्यात सजवायची, कधी पुस्तकात ठेवायची, तर कधी त्याला खाऊनच टाकायची.
एक म्हातारा शेजारच्या मंदिराच्या पायरीवर बसुन येणाऱ्या-जाणाऱ्याला चहा-पानाला पैसे मागायचा.
शेवंता खेळत हुंदडत या म्हाताऱ्यापाशी यायची. म्हातारा तिला बिडी-काडी आणायला पैसे द्यायचा, तिच्या गोळ्या-बिस्किटांचा हिस्सा त्यात ठरलेला.
म्हाताऱ्यानं तिला लळा लावलेला. तिला जवळ बसवुन घ्यायचा, पाठीवरून हात फिरवायचा, त्याच्या अंगावरची शाल तिच्यावरही पांघरायचा, मांडीवर बसवुन तिचे पापे घ्यायचा.
एके दिवशी त्याचा हात नको तिथे पोहचला.
शेवंताला शरीर नावाच्या विषयाची जाणीव झाली.
कधी मधी एखादा पोक्त इसम तिची छेड काढायचा.
"म्हाताऱ्याला दिलं , आम्हाला कधी?" म्हणुन हिणवायचा.
शेवंता त्याला डोळ्यांनीच आव्हान द्यायची.
नकळत्या वयातील उफाळत्या वासनांना खुलेआम ऊधळायची.
वैरान रानात तिला नागवले गेले.
तिच्या यौवनावर कित्येक घोडे आरूढ झाले.
या स्पोटक प्रणयांनी कित्येक माळराने हादरून गेली.
वासनेच्या या खेळात शेवंता पराभुत झाली.तिला दिवस गेले. घराबाराची छी थु झाली. गावात चर्चेच्या मैफिली रंगल्या.
तिच्या बापानं उध्वस्त मनानं जुन्या जाणत्यांकडं न्याय मागितला.
तर त्याच्याच उघड्या अंगावर भर चौकात चाबकाचे फटकारे मारले गेले.
त्याच्या पाठीवरच्या रक्ताळल्या वळांत शेवंताचे सर्वस्व वाहुन गेले.
तो वटवृक्ष अजुनही ऊभा आहे. अजुनही त्याला बहर येतो.
त्याच्या कित्येक कळ्या कोमेजुन जातात, तर कित्येक खुडल्या जातात.
कित्येक भ्रमर त्याच्या कळ्यांभोवती अजुनही गुंजारव करत राहतात.
प्रतिक्रिया
16 Sep 2015 - 2:19 am | एक एकटा एकटाच
छान नाही म्हणवत......
पण व्यथा पोहचली
16 Sep 2015 - 10:21 am | प्रचेतस
कथा म्हणून खूपच अपुरी आणि घाईघाईत लिहिल्यासारखी वाटली.
साधारण ह्याच पार्श्वभूमीवरच्या हमोंची 'काळेशार पाणी' आणि श्रीनांची ' यशोदा' ह्या कादंबरिका डोळ्यांसमोर आल्या.
17 Sep 2016 - 5:15 pm | टर्मीनेटर
जव्हेर भाऊ आज तुमची कथा वाचून कॉलेज जीवनात घडलेला एक प्रसंग आठवला.
आमच्या कॉलेज जवळच्या एका फार गर्दी नसलेल्या देवळाच्या पायरीवर एक रिटायर्ड म्हातारा रोज संध्याकाळी एका मतिमंद मुलीला शेजारी घेऊन तिला गोळ्या, चॉकलेटं किंवा बिस्किटं भरवत बसलेला असायचा. आधी आम्हाला वाटलं होतं असेल त्याची नात वगैरे, पण एके दिवशी त्याला अंधारात त्या मुलीच्या शरीराशी चाळे करताना बघितला, आणि असा काही बडवून काढला होता कि बस...
17 Sep 2016 - 5:58 pm | जव्हेरगंज
प्रतिसादाबद्दल धन्यवाद टर्मीनेटर, प्रचेतस, आणि एक एकटा एकटाच.
हि कथा काय तशी जमली नव्हती. घाईघाईतच लिहीली होती.
असो.
19 Sep 2016 - 1:22 am | गामा पैलवान
उगाच आठवली ! एक आईविना वाढलेली पोर !!
-गा.पै.
20 Sep 2016 - 8:46 am | नूतन सावंत
बाईपणाचं सत्य,जे ९०% पुरुषांना आधी दिसतं आणि बाईवर कोसळतं.मग ती आणि तो वयाने केवढा असो.जाव्हेरभाऊ,इतक्या छोट्या कथेत संपवलंत.