बनलो असतो दादा, मज साहेब भेटला नाही
पेरणा सांगायलाच पाहिजे का?
पेरणा सांगायलाच पाहिजे का?
(मिपा बंद असताना मिपाला चरफडत खूप शिव्या दिल्या. अर्थात प्रेमाने! मग शनिवारी रात्री हे विडंबन सुचले आणि खफवर सोमवारी मिपा परत आल्यावर टाकले. तिथल्या आमच्या हितचिंतकांनी -कोण म्हणाले रे कंपू कंपू ते! - वा वा! वा वा! बोर्डावर पण टाकून बाकीच्यांनाही छळा, असे आम्हांस भरीला पाडल्याने - दू दू कुठले - खफवरच्या पुरात वाहून गेलेली आमची रचना महत्प्रयासाने वर काढली आणि इथे डकवायचे धारिष्ट्य करत आहे... नमनाचे तेल संपले...!)
प्रेमात, युद्धात आणि विडंबनात सारे काही क्षम्य असते असे मानून खालील भेळ तिखट मानून घेणे -
('खरे' कवी यांची माफी मागून...)
मित्रहो, मिपावर सुंदर कवितांचा एवढा पाउस पडतो आहे की सारे वातावरणच बदलले. त्यातच संमं ने पण छायाचित्रकलास्पर्धेचा विषयपण पाउस निवडला आणि मग हे कवी लोक जास्तच पेटले. आमची प्रकृती थोडी नाजुकच. या बदललेल्या वातावरणाचा नाही म्हटले तरी परिणाम होतोच.
काल रात्री शेवटी विडंबनारीष्ट घेउन झोपावे लागले. तेव्हा कुठे सकाळी मोकळे मोकळे वाटले.
फ्रेश झाल्यावर ठरवले की चला पावसाळ्यात थोडी रंगपंचमी खेळूया...
आम्ही पाडलेल्या चकल्या चावायच्या आधी त्या चकल्यांमधले खरे पीठ कोणाचे आहे ते बघावे आणि मग आमच्या चकलीचा आस्वाद घ्यावा...
पूर्वेकडुनीचा सूर्य, चन्द्र हतवीर्य, बुडाले बेट..
रक्तील दिलासे अर्घ्य, काहीना वर्ज्य, यमाची भेट !!
त्या कितीक पडल्या रती, मदन संगती, जीव तो स्वस्त..
युद्धाची वाढे गती, नवे संगती, दुखवले दोस्त !!
केलेच पाहिजे अता, शांत राहता, शेण तोंडात...
जमवून खुळे ठरवता, गिधाडी जथा, घडे आक्रित !!
अणुरेणू फुटाया आले, भरून घेतले, निघाले गगनी...
बोटात वीष साठले, बटन दाबले, थरारे अवनी !!
आकाशी फुलले झाड, मिळेना पाड, सुटेना गुंता...
त्या जहरफुलाचे वेड, जीवाची राड, हलेना चिंता !!
फेसबुकी रंगे
पोस्टच्या संगे
लाईक कमेंट
रेलचेल !!
फोटोंच्या डोळा
लोक होती गोळा
अन मुक्ताफळा
उधळती !!
एकटेच यावे
गुज पोस्टावे
लाईक ठोकावे
इतरांना !!
परी काय सांगू
नशीब हे पंगू
कोणी भिंतीवर
फिरकेना !!
पाहुनीया वाट
लागलीय वाट
अधिक काहीही
बोलवेना !!
शशि म्हणे देवा
ऐसा मित्र ठेवा
आम्हांला सदा
अप्राप्य
- जय जय फेसबुक समर्थ
(मिपावर)
जे झालं ते चांगलंच झालं….(रोज नवीन गोंधळ हो !)
जे चाललय त्यातही आनंदच आहे……. ( डूआयडी म्हणू नका , कट्टे म्हणू नका , लेख रतीब म्हणू नका, धुळवड म्हणू नका …)
जे पुढे होईल तेही चांगलंच होईल (अशी आशा करूया…जय भोलेनाथ ! )
तुमचा असा कोणता आयडी होता, की जो तुम्ही घेणार होतात आणि तो आधीच मिपावर आला म्हणून तुम्ही रडताय ?
तुम्ही मिपावर अशी कोणती लेखमाला लिहिलीत जी कोणीतरी दुसर्याने त्याच्या नावावर इतरत्र खपवली ?
तुमचा असा कोणता आयडी होता जो सं मं कडून उडवण्यात आलाय ?