फेसबुकी रंगे
पोस्टच्या संगे
लाईक कमेंट
रेलचेल !!
फोटोंच्या डोळा
लोक होती गोळा
अन मुक्ताफळा
उधळती !!
एकटेच यावे
गुज पोस्टावे
लाईक ठोकावे
इतरांना !!
परी काय सांगू
नशीब हे पंगू
कोणी भिंतीवर
फिरकेना !!
पाहुनीया वाट
लागलीय वाट
अधिक काहीही
बोलवेना !!
शशि म्हणे देवा
ऐसा मित्र ठेवा
आम्हांला सदा
अप्राप्य
- जय जय फेसबुक समर्थ