"काही नाही… "
मनात गोंधळ घालणाऱ्या बहुतेक भावनांना आपल्या जवळील स्त्री-वर्ग, मग तो कोणत्या पण नात्याने जोडलेला असो "काही नाही " या दोन शब्दात सगळी भावना गुंडाळून टाकतो…
त्या पैकी काही खालीलप्रमाणे…
कधी कधी… इशश्य…
कधी कधी… काही तरीच काय हो…
कधी कधी… आता शांत बसा…
कधी कधी…खाऊ कि मारू आता…
कधी कधी…अरे बापरे!!! काय करून ठेवलाय हे…
कधी कधी…जवळ येउन अस्सा……… घ्यावा… (मधला शब्द प्रत्येकाच्या विचार शक्तीनुसार टाकावा.)
कधी कधी…आई शप्पथ…इथेच नाचव…
कधी कधी…संपल सगळ…