माणुसकी
लहान असताना आयुष्य म्हणजे काय ते माहीतही नव्हतं
आजूबाजूचे सगळे करतील तेच आणि तसंच करायचं
कधी कौतुक व्हायचं कधी दटावणी ….
रोज खूप वेगवेगळी स्वप्न बघायचो
कधी डॉक्टर तर कधी भाजीवाला ….
कोण होणार तू? ह्या प्रश्नाला माझं ठरलेलं उत्तर…."कारकून"
अंदाज नव्हता तेव्हा त्याच्या अर्थाचा …आवडायचे म्हणून म्हणायचं !
मग म्हणायचे आधी माणूस हो ….
वय वाढतच होतं…. आजूबाजूचे तेच पण त्यांच्या अपेक्षा बदलू लागल्या
लहान मुलाचं रुपांतर स्पर्धेच्या घोड्यात झालं होतं …
पाठीवर दप्तराच खोगीर आणि डोक्यावर लादलेल्या अपेक्षा