जडण-घडण 11
माझ्या या पहिल्या-वहिल्या ऑफीस जॉबमध्ये मला लाभलेले रिपोर्टींग बॉस अर्थात कंपनीचे मालक सुद्धा छानच होते. कुटुंबवत्सल गुजराथी गृहस्थ. फक्त एकच तक्रार होती यांच्याबद्दल. साधारण वर्षभर काम केलं असेल मी तिथे. त्या संपूर्ण काळात किंवा त्यानंतरही त्यांनी मला माझ्या योग्य नावाने हाक मारली नाही. माधुरी ऐवजी माधवी म्हणायचे. मला व्यक्तीश: कोणीही माझ्या नावाची मोडतोड केलेली किंवा ते बदललेलं रूचत नाही. पहिल्यांदा त्यांनी मला माधवी म्हणून हाक मारली, तेव्हा त्यांना थांबवत मी नावातली दुरूस्ती लक्षात आणून दिली. त्यानंतर पाच-सहा वेळा हा प्रकार झाल्यावर मी काहीशी वैतागलेच.