आपण सारे विक्रम (कथा: पृथ्वीचा अंत)
१५ ऑगस्ट २९४७ रोजी, वेताळाच्या बेताल बोलण्याकडे दुर्लक्ष करीत राजा विक्रमादित्य भराभरा टायटन ग्रहाकडे चालू लागला. वेताळाने राजाला एक गोष्ट सांगायला सुरुवात केली..
१५ ऑगस्ट २९४७ रोजी, वेताळाच्या बेताल बोलण्याकडे दुर्लक्ष करीत राजा विक्रमादित्य भराभरा टायटन ग्रहाकडे चालू लागला. वेताळाने राजाला एक गोष्ट सांगायला सुरुवात केली..
दुपारपासून उकाडा जास्तच जाणवत होता. कुठे जावं तर रस्त्यावरची गर्दी नकोशी वाटत होती. गाडी चालवण्यासाठी किंवा वाट काढण्यासाठी होणारी चिडचिड लक्षात घेता तो बेत रहित केला. उगाच काहीतरी किरकोळ उद्योग करत घरीच बसून राहिलो. घरात कोंदट वाटत होतं म्हणून अनेक दिवसांनी बाल्कनीत जाऊन बसलो थोडी मोकळी हवा मिळावी अशा विचाराने. फोनचा चाळा होताच वेळ घालवण्यासाठी.
नारकोन्डम बेट -- हे अंदमान बेट समूहातील सर्वात दूर आणि पूर्वेकडे असलेले एक छोटेसे बेट आहे. पहा http://en.wikipedia.org/wiki/Narcondam_Island#mediaviewer/File:Narcondam...
अशी खूप वर्षं सरली. दहावी इयत्तेनंतर गावी जाण्याचं प्रमाण हळूहळू कमी होत गेलं. शिक्षण सुरूच होतं. फारसा विचार किंवा प्रयास न करता चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळून गेला. एखाद-दुसरा अपवाद वगळता ओळखीचं फारसं कुणी नव्हतं. कोणाच्या अध्यात-मध्यात नाही, अशी ती अकरावी-बारावीची दोन वर्षं निघून गेली.
बारावीचा निकाल लागला आणि मी आमच्याच कॉलेजमध्ये पुढच्या वर्षासाठी प्रवेश घेतला. त्या छोट्याश्या कालावधीतही लक्षात राहिलेले शिक्षक म्हणजे अनंत भावे सर. मराठी शिकवायचे. हाताच्या बोटावर मोजता येतील, इतकीच त्यांची लेक्चर्स ऐकता आली.
आज जरा निवांत भेटला तो. त्याला म्हणाले ये, बैस जरा. घटकाभर बोलु आपण. किती दिवस झाले बोलले नाही आहे तुझ्याशी मनमोकळेपणाने. तू येतोस आणि जातोस. मी आपली प्रपंच गाढ्यात. तो म्हणाला अग मग बोलू कि त्यात काय. मी आहे आता ४ महिने तरी. जा घेऊन ये एक वाफाळता कप चहाचा म्हणजे गप्पाची लज्जत वाढेल अजुन.
मी : राहु दे, असे म्हणुन दडशील पुन्हा. मग येशील जेव्हा तेव्हा निवांत असेन कि नाही कोण जाणे.
तो : नाही ग, आज असेन मी, तुझ्यासाठी.
मी : खरंच, राहशील माझ्यासाठी, माझे मन हि खूप जड झाले आहे, आज मी हि तुझ्यासोबत बरसेन म्हणते.
गावच्या भटकंतीतला प्रत्येक वर्षीचा पहिला उद्योग म्हणजे वाडीतल्या सगळ्या आंब्याच्या झाडांची पाहणी करायची, मिळतील तितक्या कैऱ्या मिळतील तिथेच खायला सुरूवात करायची आणि परतताना जमतील तितक्या कैऱ्या घरी आणायच्या. पहिले तीन-चार दिवस पडवीत आम्ही जमवलेल्या कैऱ्या टोपलीत पडून राहायच्या. दात पुरेसे (म्हणजे वैताग येण्याइतके) आंबट झाले, करकरू लागले की कैऱ्या घरी आणायचा हा क्रम थांबायचा.
आम्ही ही अनोखी शोधयात्रा अधुरी कदापी सोडणार नाही
मात्र जिथून श्रीगणेशा केला त्या आरंभस्थानी डेरेदाखल होणे
अन त्या गंगोत्रीची पहिल्याप्रथम खरी ओळख करून घेणे
हीच आमच्या सार्या वाटचालीची अंतिम फलश्रुती असेल
मूळ काव्यः
We shall not cease from exploration
And the end of all our exploring
Will be to arrive where we started
And know the place for the first time.
-T.S. Eliot
शाळेतले दिवस, मित्रमंडळी, अभ्यास, स्पर्धा सगळंच मस्त होतं. प्रत्येक वर्षी वर्गशिक्षक आणि विषयानुरूप शिक्षक बदलत असले तरी सगळेच शिक्षक ओळखीचे होते. त्यामुळे पुढच्या वर्गात मित्रमंडळीही तीच आणि शिक्षकही ओळखीचे. अगदी खरं सांगायचं तर पहिली ते सातवी इयत्तेची सात वर्षं वेगवेगळी आठवतंच नाहीत, मोठ्ठच मोठ्ठं लांबलचक एकच वर्षं असावं ते, असंच वाटतं. तसंच आठवतं...
शाळा, परीक्षा आणि परीक्षेनंतरची सुट्टी. मे महिन्याच्या सुट्टीत गावी गेलं की गोंधळात टाकणारा पहिला अनुभव म्हणजे, अरेच्चा, सुट्टी इतक्यात कशी संपली?
नियती कधी कशी वागेल तुम्ही सांगू शकत नाही ती तुमच्या आयुष्यासोबत समांतर चालत असते. वाऱ्यासारख तीच अस्तित्व जाणवत असत. कधी रणरणत्या उन्हात वाऱ्याची झुळूक मनाला तृप्त करून जाते तर कधी सोसाट्याचा वारा
सुटल्यावर घर उध्वस्त करून जातो. नियती पण रंकाला राजा बनवते आणि कधी क्षणात होत्याचे नव्हते करून जाते.