जडण-घडण...1
एक-एके-एक काम करण्याचा मला भयंकर कंटाळा. त्यामुळे व्यावसायिक आयुष्यात वेगवेगळ्या क्षेत्रांत मुशाफिरी केली. ती आजही सुरूच आहे म्हणा. या मुशाफिरीमध्ये खूप माणसं भेटत गेली, खूप अनुभव मिळत गेले आणि बरंच काही शिकता आलं. या प्रवासात शाळा हा महत्वाचा टप्पा आणि त्यानंतर पुढचे टप्पे. पण फारसं ठरवून काही केलं नाही. समोर आलं, ते स्वीकारत गेले. म्हणजे बारावी झाल्यानंतर त्यातल्या त्यात जवळच्या मैत्रिणीला डी.एड्. चा अर्ज भरायचा होता, म्हणून मी पण भरला. त्यातल्या त्यात जवळची, म्हणजे इयत्ता सातवी आणि त्यानंतर दुसऱ्या शाळेत आठवी ते दहावी अशी साधारण चार वर्षं आम्ही दोघीही एकाच वर्गात होतो.